भाग दोन2 :चर्चा तर होणारच
दोन दिवसांनी वाड्यात पुन्हा गडबड होती. गोंगाट होता.
संध्याकाळचा वेळ. अंगणात चहा घेणाऱ्या बायकांची बैठक सुरू होती. हातात चहाचा कप, केसात मोगऱ्याचा गजरा, आणि ओठांवर पुन्हा साक्षीचं नाव.
“साक्षीचं लग्न ना, अगदी चित्रपटातल्या सीनसारखं झालं… सुंदर मंडप, सोज्वळ साडी, आणि त्या मुलीचं हास्य – अगदी खळखळाट होत होता.”
“साक्षीचं लग्न कसं सुंदर झालं ना! अगं, तिने होणाऱ्या नवऱ्याच्या बहीणीसोबत मैत्री करून टाकली म्हणे. आणि काल ती साक्षी म्हणे वृद्धाश्रमात जेवण वाढायला गेली होती…”
पुन्हा चर्चा!
पण या वेळी चर्चेचं स्वरूप वेगळं होतं.
आता साक्षी हसत होती. कारण तिला कळून चुकलं होतं – लोक काहीही म्हणोत, आयुष्याचं बटण स्वतःच्या हातात असावं लागतं. चर्चा तर होणारच… पण त्यांच्यावर आपलं आयुष्य चालत नाही!
साक्षी खोलीत होती.
खिडकीतून संध्याकाळचं सोनेरी ऊन आणि गप्पांचा आवाज तिच्या कानावर पडत होता.
ती शांतपणे आरशात पाहत होती – स्वतःच्या डोळ्यांत… आणि पहिल्यांदाच, तिला स्वतःच्या डोळ्यांत भीतीऐवजी ठामपणा दिसत होता.
खिडकीतून संध्याकाळचं सोनेरी ऊन आणि गप्पांचा आवाज तिच्या कानावर पडत होता.
ती शांतपणे आरशात पाहत होती – स्वतःच्या डोळ्यांत… आणि पहिल्यांदाच, तिला स्वतःच्या डोळ्यांत भीतीऐवजी ठामपणा दिसत होता.
ती हसली. एक मधुर, समाधानी हसू.
तिच्या मनात एक स्पष्ट विचार उमटला –
“लहानपणापासून लोक काय म्हणतील याची भीती वाटायची.
आज त्याच लोकांचं बोलणं चालू आहे – पण मी घाबरत नाही.
कारण आता मला कळलंय – आपलं आयुष्य लोकांच्या चर्चांवर चालत नसतं, आपल्याच्या ठाम निर्णयांवर चालतं.”
आज त्याच लोकांचं बोलणं चालू आहे – पण मी घाबरत नाही.
कारण आता मला कळलंय – आपलं आयुष्य लोकांच्या चर्चांवर चालत नसतं, आपल्याच्या ठाम निर्णयांवर चालतं.”
“चर्चा तर होणारच…
पण त्या चर्चांचा सूर कधी बदलतो हे आपण ठरवतो – आपल्याच्या कृतीने, आपल्याच्या संयमाने.”
लग्नाला महिनाभर उलटून गेला होता. साक्षी सासरी स्थिरावली होती, पण चर्चा अजूनही तिच्या मागं सोडत नव्हत्या.
“तिचं ऐकणं कमी आहे म्हणे... सासूबाईंना मोकळं बोलूच देत नाही.” ती तिच्याच मताने वागते. सगळे निर्णय तीच घेते.
“घरातली पद्धत बदलतेय. सकाळी पूजा न करता योगा करते म्हणे.”
“ती ऑफिसलाच जात असते. स्वयंपाक कोण करतो मग?”
“ती ऑफिसलाच जात असते. स्वयंपाक कोण करतो मग?”
सासरच्या गल्लीत नित्य नवी वाक्यं पेरली जात होती.
साक्षीने एकदा नवऱ्याला विचारलं, “तुला त्रास होतो का रे, लोक बोलतात म्हणून?”
तो हसला, “नाही गं... उलट अभिमान वाटतो. तू जे करतेस, ते स्पष्ट करतेस. चर्चांना घाबरून जगायचं तर मग आपलं खरं कोणतं?”
तो हसला, “नाही गं... उलट अभिमान वाटतो. तू जे करतेस, ते स्पष्ट करतेस. चर्चांना घाबरून जगायचं तर मग आपलं खरं कोणतं?”
त्या दिवशी साक्षीचं मन अधिकच निर्धारानं भरून आलं.
आयुष्य आपलं निर्णय आपले. विचार आपले. सुख दुःख. आपले.
आयुष्य आपलं निर्णय आपले. विचार आपले. सुख दुःख. आपले.
मग चर्चा करणारे कोण? असतात.?
सौ तृप्ती देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा