Login

चर्चा तर होणारच: भाग एक

“चर्चा तर होणारच... पण मी चालत राहणारच!”
स्पर्धा जलद लेखन
“चर्चा तर होणार!”भाग एक

“ताई, तुम्हाला सांगते, ती साक्षी ना… तिचं बघितलं का? आठवड्याभरात तिचं लग्न, आणि अजून तोंडावर काही थोडंसं हसू नाही!”बघाना लग्न ठरल कि किती चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो ना? चेहऱ्यावर वेगळच तेज येतं ना..

वाड्याच्या पायरीवर बसलेल्या सगळ्यां,शांता मावशींच्या तोंडात पुन्हा चहाचा घोट गेला, आणि चर्चेचं चाक पुन्हा फिरायला लागलं.कधी कधी चाक फिरत नसतं फिरतच राहत. विषय मग. कोणतही असो.. मग...

“अगं, मी कालच बघितलं. एकदम सोनेरी साडी घातली होती तिने पण त्या रंगात तिचा रंग पांढरट दिसत होता. आणि हो… तिचा होणारा नवरा ना, त्याला लोक म्हणतात की तो मुंबईत कुणा बाईसोबत दिसला होता…”

शब्द वाऱ्यावर उडत होते आणि साक्षीचं आयुष्य त्या शब्दांच्या धुसफुशीत धुरात हरवत होतं.

साक्षी खोलीत बसून ऐकत होती. तिला सवय झाली होती या वाड्यातल्या चर्चांची. तिला माहित होतं, कोणतंही मोठं पाऊल टाकलं, की चर्चा होतेच. लग्न झालं की चर्चा. नवऱ्याने काही म्हटलं तर चर्चा. पोरं झाली नाहीत तरी चर्चा, झाली तरी चर्चा. चर्चा. कशावर होत नाही.

चर्चा… चर्चा… चर्चा.
कधी कपड्यांवर, कधी स्वयंपाकावर, कधी तोंडावरची हसू आणि पायातली पैंजणही चर्चेचं कारण ठरायची.

कधी कधी वाटायचं –
या वाड्यात भिंतींपेक्षा, शब्दांची पाचर अधिक घट्ट आहे.
कशावर होत नाही चर्चा?
श्वास घ्यावा, तरी लोक म्हणतात - किती जोरात घेतलास…!

कधी कपड्यांवर, कधी नात्यांवर, कधी पायात घातलेल्या चपलांवरही चर्चा.

साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते लपवत ती आईपाशी गेली.

“आई, मी काही बोलले नाही कुणाला, तरीही एवढं बोलतात?”का करतात चर्चा?

आई हसली, डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “बाळा, या जगात लोकांचं कामच आहे बोलणं. तू थांबवणार कशी त्यांची बोलण ? लग्न जमतं नाही म्हणून बोलत होतेना.

आता लग्न ठरलंय, तरी गप्प बसलेत का?
नाहीच ना. आता म्हणतायत – ‘हा मुलगा योग्य आहे का?’
लग्न होईल तेव्हा डेकोरेशनवर बोलतील,
पाहुण्यांवर बोलतील…
आणि एक दिवस मुलं झाली, तरी त्यांच्या नाकावर-डोळ्यावर चर्चा करतील.

बोलणं त्यांचं थांबणार नाही… पण तू तुझं चालू ठेव.
कारण आयुष्य ही स्पर्धा नाही गं – ती स्वतःची वाट असते. लोक फक्त बघतात, बोलतात… चालत नाहीत.”


आपल्याला आपल्या मुळाशी प्रामाणिक राहायचं. चर्चा होतील, थांबतील… पण तुझं मन शांत असेल तर त्यांचं बडबडणंही वाऱ्यासारखं उडून जाईल.”

साक्षीने डोळे मिटले. तिला आईचं हे शांत उत्तर फार काही शिकवून गेलं.