चार ओळी

Poem about four lines

                                                                       चार ओळी

काय झाले मला

झोपच येईना आज

खूप प्रयत्न केला

पापणीला पापणी चिकटे ना आज

का कोणी जागवते मना

का कोणी आठवण काढे खास

ना कसली चिंता ,ना विवंचना

तरीही झालाय निद्रानास

पाढे उलटे सुलटे वाचले

दीर्घ  श्वास   घेतले,सोडले

हतबल झाले सर्व प्रयत्न केले

कधी नव्हे ते नामस्मरण पण केले

दोन रात्रीचे वाजले

तरीहि मी  जागी

जशी आत्ताच झोपून उठले

 झालय  मन बागी

 हरले, शेवटी उठून बसले

काय करावे अशा वेळी

जवळच कागद पेन मिळाले

लिहुन काढल्या  या चार ओळी