Aug 18, 2022
सामाजिक

चेंज

Read Later
चेंज
होणारा चेंज हा नेहमी स्वीकारावा !!

जीवन जगताना पावलोपावली बदल घडत असतो. आपण जन्माला आल्यापासून, आपल्या शरीरापासून ते भोवताली सगळ्याच गोष्टींमध्ये बदल दिसून येत असतो. आपलं वय वाढतं, आपण मोठे होतो, आपल्या बौद्धिक पातळीत चेंज येतो तसेच काही वेळा आपला स्वभाव देखील वयानुसार बदलतो. पण या सगळ्या चेंजची आपल्याला सवय असते.
पण आयुष्यात अनपेक्षितपणे येणाऱ्या चेंजची ना आपल्याला सवय असते, ना तो यावा अशी आपली इच्छा असते. आणि त्याचमुळे तो स्वीकारणं एक खूप मोठं चॅलेंज होऊन जातं.
चेंज कितीही गरजेचा असला तरी तो स्वीकारणं सोप्प नसतं. काही लोकांना तो स्वीकारायला थोडा वेळ लागतो आणि काहींना थोड्यापेक्षा जास्त वेळ लागतो. चेंज न आवडण्याचं कारण म्हणजे आपल्याला काही गोष्टींची सवय झालेली असते, आणि सवय म्हणजेच आपण त्या परिस्थितीत खूप comfortable झालेलो असतो. आणि comfort झोन च्या बाहेर येणं हे एक प्रकारचं चॅलेंजच म्हणावं लागेल. आणि त्याचमुळे आपल्याला चेंज नको असतो.
ऋतू चेंज होतात त्यात ही एक मजा असते, नाहीतर १२ महिने उन्हाळा किंवा हिवाळा कोणाला आवडेल?
ऋतूंमधला चेंज , निसर्गातले चेंजेस हे सगळं आपण त्यातली त्यात इसिली स्वीकारतो. पण आयुष्यातले चेंजेस स्वीकारणं मात्र आपल्याला खूप जड जातं. कल्पना करून बघा, की लहानपणापासून तुम्ही एकच आयुष्य जगताय , आणि त्यात आत्तापर्यंत एक ही गोष्ट चेंज झालेला नाही. तुम्ही सेम तेवढेच दिसताय, त्याच शाळेत अजूनही जाताय आणि तुमचं जग म्हणजेच तुमची शाळा, तुमचे मित्र आणि आई वडील एवढंच तुमचं जग अजून ही आहे. त्यात कोणाचीच आणि कशाचीच भर पडली नाही की काही बदललेलं देखील नाही.
किती बोरिंग वाटायला लागेल नाही आपल्याला? सगळं छान असेल मस्त असेल, पण त्यात कसलंच नावीन्य नाही आणि चॅलेंज सुद्धा नाही. त्यामुळे असं आयुष्य जगायला मजा येणार नाही. त्यामुळेच आयुष्यात चेंज महत्वाचा! आणि तो आपल्याला आवडो किंवा न आवडो अपरिहार्य आहे. त्यामुळे जी गोष्ट अपरिहार्य आहे ती लवकरात लवकर स्वीकारून त्यात अड्जस्ट होणं कधीही फायद्याचंच नाही का?.
आपल्याला चेंज न आवडण्याचं अजून एक कारण आहे. आपल्याला बदलाची भीती वाटते. कारण बदल म्हणजे अज्ञात गोष्ट. आणि जे माहित नसतं तिथे जायची किंवा ते अनुभवायची आपल्याला भीती वाटते.
पण एक मात्र नक्की चेंज चांगला असतो. कारण त्यामुळे आपल्याला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात. नवीन परिस्थितीत नवीन प्रॉब्लेमशी सामना करून आपण अजून स्मार्ट आणि स्ट्रॉंग बनत जातो. तोचतोचपणाने आपली प्रगती खुंटली जाते.
आणि चेंज स्वीकारल्याने आयुष्य अजून इंटरेस्टिंग बनतं. कोणताही चेंज स्वीकारणं म्हणजे अर्ध युद्ध तिथेच जिंकण्यासारखं असत. पण जेव्हा आपण चेंज स्वीकारायला तयार नसतो तेव्हा स्वतःशीच सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागतो. आणि स्वतःशी करावा लागणारा संघर्षच सगळ्यात अवघड असतो.
चेंज हा कधी कधी माणसांमध्येही बघायला मिळतो. आपल्या जवळच्या माणसांना काही वेळा चेंज झालेलं पाहून आपल्याला धक्का बसतो, कधी वाईट वाटतं तर कधी चांगलं वाटतं.
पण जो तो स्वतःला आलॆल्या अनुभवानुसार बदलत असतो. त्यामुळेच आपण ही परिस्थितीनुसार आपल्यात चांगले बदल करून घेतले तर त्याने आपल्याला प्रॉब्लेम्स हॅन्डल करायला सोप्प जाऊ शकतं.आपण जसजसे मोठे होत जातो आपले प्रॉब्लेम्स ही तसेच मोठे होत जातात. त्यामुळे एका चेंजमधून आपण जेवढं जास्त शिकू तेवढं नेक्स्ट प्रॉब्लेम हाताळणं सोप्प जातं
‘मी कधीच बदलणार नाही ‘ किंवा ‘ बदलले नाही’ , अशी वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतात. लोकांना अशा वाक्यांचा अभिमान वाटतो. पण आपण जिवंत माणसं आहोत, निर्जीव वस्तू नाही. बदल हा आपल्यासाठी अटळ आहे. आणि बदल घडणं म्हणजे स्वतःला improve करणं, प्रगती करणं.
बदल स्वीकारणे आणि आत्मसात करणे तुम्हाला आयुष्यात अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यास आणि अधिक लवचिक बनण्यास मदत करतो. जी माणसे बदल स्वीकारण्यास तयार नसतात आणि त्याचा विरोध करत राहतात, त्यांना माणूस म्हणून पुढे जाणे कठीण जाते.
जो बदल स्वीकारणं अशक्य असत तो चेंज करायचा प्रयत्न करा. पण जे चेंज करणं शक्य नाही ते स्वीकारण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते. त्यामुळे पर्याय दोनच आहेत, एक म्हणजे चेंज स्वीकारा आणि स्वीकारता येत नसेल तर तो बदलायचा प्रयत्न करा. कारण तक्रार करत बसण्याने हाती काहीच लागणार नाही.
बदल स्वीकारल्याने बदलाला सामोरे जाणे खूप सोपे होते. आपण बदलाचा जितका जास्त सामना करतो, तितकेच आपल्याला त्याची सवय होते, त्याला सामोरे जाणे तितके सोपे होते.. .
चेंज स्वीकारणं अवघड तर नक्कीच असत, पण जेव्हा तो अपरिहार्य आहे हे आपण मान्य करतो, आणि हा चेंज स्वीकारल्याने आपलं आयुष्य सोप्प होऊ शकतं कारण आपण अड्जस्ट करायला, स्वतःला improve करायला तयार आहोत हे लक्षात येत तेव्हा चेंज स्वीकारणं शक्य होतं.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ojaswi Group