Sep 24, 2020
कविता

चांदवा

Read Later
चांदवा

गर्दनिळ्या रातीवर
पहारा करतो चांदवा
कणकण झिजून
रातीला देतो थंडावा

ढगामधी लपुनी तो
लहानग्यांना रिझवतो
लपाछपी खेळूनिया
हसायला लावितो

कुणाचा हा भाऊ होतो
कुणाचा चांदोमामा
कुणी यात शोधती
गमावलेला प्रियसखा

आपुलेच रुप शशी
निळ्या जळात पाहतो
पाण्याच्या तरंगावरी
अलवार हिंदकळतो

-----सौ.गीता गजानन गरुड.