*******************************
"नमस्ते मंडळी...थोडं माझं ऐकून घ्या मग ओळख करून देते. "चांडाळ चौकडी" नाव आमच्या महिला मंडळाच.आता काय करणार आम्हाला दुसरं नाव सुचलं नाही आणि सुचलं असतं तर आमचं एकमत झालं नसतं".
"नमस्ते मंडळी...थोडं माझं ऐकून घ्या मग ओळख करून देते. "चांडाळ चौकडी" नाव आमच्या महिला मंडळाच.आता काय करणार आम्हाला दुसरं नाव सुचलं नाही आणि सुचलं असतं तर आमचं एकमत झालं नसतं".
"चांडाळ चौकडी म्हणजे फक्त चार जणींच महिला मंडळ .अगदी पक्क्या मैत्रिणी बालपणीच्या नव्हे तर लग्न होऊन सासरी आलेल्या सूना आम्ही आणि सासूच्या चुगल्या करता करता सासू बनलो आणि मैत्रिणींही."
तेवढ्यात बाकीच्या मैत्रिणी आल्या आणि म्हणाल्या "श्रीदेवी एकटीच काय बडबड करत आहेस?".
" थांब गं!ओळख करून देते. मी श्रीदेवी,ही जया प्रदा, ही परवीन बॉबी आणि शेवटची मौसमी चटर्जी "
"मंडळी जरा कान इकडे करा.ही काही खरी नाव नाही आमची पण आम्हाला ह्या अभिनेत्री आवडतात म्हणून नाव ठेवली आम्ही. यू नो निक नेम!".श्रीदेवी
"अगदी बरोबर,ते मुलं कुणाला ढोली,कुणाला चवडीची शेंग,कुणाला भोपळा तर कुणाला हवेची उशी म्हणतात त्यापेक्षा हे बरं आहे ना. बरं हे काय होत श्रीदेवी".परवीन
"जस्ट टाईम पास ...अशीच गंमत केली.चला मंडळी आता सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्यात. बाय बाय"श्रीदेवी
"काय आज लेट झाला तुम्ही, हे असं चालणार नाही,मी अर्धा तास झाले तुमची वाट बघितली आणि तुम्ही निवांत आल्या, असं जर परत झालं तर".श्रीदेवी
"असं झालं तर सोप्पं होईल, श्रीदेवी जाईल ग्रुप सोडून".जया
"हमम! तुम्हाला तर तेच हवे आहे...मी कधी जाईल आणि कधी नाही".श्रीदेवी
"नाही गं बाई, तू तो हमारी बहीरी बाई आहे". मौसमी
"काय म्हटली गं मौसमी सांग जरा मला".श्रीदेवी
"अगं काही नाही ती म्हटली तू तो मेरी जान है"...परवीनने डोळा मारला.
"बस चला आता संध्याकाळ झाली कोण कोण दिसेल बघू या आज?...जयाचा अमिताभ? का मौसमीचा राजेश खन्ना?..परवीनचा"...श्रीदेवी
"अगं चूप फक्त नयन सुख घ्यायचं ...नो डिस्कशन प्लिज". मौसमी
चौघी तोंडावर बोट ठेवलं आणि एकमेकींकडे पाहून हसू लागल्या.
"ऐ बायकांनो"...जया
"ए बायका कुणाला म्हटली गं,वुई आर ओनली सिस्क्टीन".. श्रीदेवी
थोडा वेळ गप्पाटप्पा झाल्या आणि मग सर्वजणी घरी गेल्या.
" अगं उद्याच ठरवा ना!मॉर्निग वाॅकला कोण कोण येईल? नाहीतर मी आपले माझ्या न उचलणाऱ्या शरीराला घेऊन येईल आणि बसेल वेड्यासारखी वाट बघत एक तास...आणि मग घरी जाईलं.तुम्ही आपलं निवात स्वप्न बघत बसणार साखर झोपेत"...श्रीदेवी
"नको! नको! मला यायचं बाई नुसता शरीराचा गुब्बारा झालाय.हवा जायला वेळ लागेल पण सुरुवात तर करावीच लागेल ना". परवीन
"हो! हो! मी पण येईल गं, मी का एकटी राहू मग घरी?"मौसमी
"अगं तू आधीच सुकलेली मेथीची भाजी आहेस उगाच अजून वाळून जाशील".जया
चौघी घरी निघून गेल्या...दोन चार दिवस निघून गेले.जयाची सून गरोदर होती म्हणून सासरी आली . जयाला खूप आनंद झाला.तीने लगेच श्रीदेवीला फोन केला.
"हॅलो अगं ऐकलं का श्रीदेवी?" जया
"हो ऐकेल ना! बोललीस की!"श्रीदेवी
"बहीरी कुठली नीट ऐक...नाहीतर"जया
"माझी सून ममता गरोदर आहे म्हणून ती आली घरी. तिला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. अगं नीट ऐकलं ना!..तिकडे टिव्ही चालू आहे वाटतं "जया
"बापरे!हो गं बाई ऐकलं...चल ठेव आता भेटू उद्या". "काय सिनेमा सुद्धा सुखान बघू देत नाही "श्रीदेवी
"हो, चल ठेवते बाय".जया
दुसऱ्या दिवशी जया आजारी पडली म्हणून ती येत नाही .तेव्हा त्या तिघीच भेटल्या.
"अगं काय झालं? जया दिसत नाही"
मौसमी आणि परवीन
मौसमी आणि परवीन
"अगं,खूप चुकीची घडलं ,टेन्शन घेतलं असेल आणि आजारी पडली ती जया"श्रीदेवी
"का गं काय झालं?"परवीन
"अगं तिच्या सुनेला कॅन्सर झाला म्हणून आली तीअसं जया म्हणाली, जया खूप रडली. जयाने फोन केला होता गं मला" श्रीदेवी
"तू नीट ऐकलंस ना!".परवीन
"तुला वेडी दिसली का मी?" श्रीदेवी
"नाही!!! नाही!!! अजिबात नाही !!! तू बहीरी आहेस... आणि ज्यांना ऐकू आले नाही ते लोक कधीच वेडे होत नाही, दे टाळी". मौसमी
""चूप, उचलली जीभ लावली टाळ्याला"श्रीदेवी
"चल जाऊ तिच्या घरी" परवीन
तिघी जणी जयाच्या घरी गेल्या.दारावरची बेल वाजली टिंग टाँग... टिंग टाँग...जयाच्या सूनने दरवाजा उघडला. तिघी आत गेल्या .
"काळजी करू नको बेटा ...आम्ही आहोत... सगळं नीट होईल".श्रीदेवी
सून पण हो हो म्हणाली आणि आत गेली.
"आई तुमच्या हिरोईन... सॉरी आई तुमच्या मैत्रिणी आल्यात".सून
"हो...हो...आलेच गं बाई...देवघरात बसले की उठताच येत नाही.. असं वाटलं आता नेतो की काय देव घरातून देवाघरी!...अगं काय झालं? तिघींनी असं तोंड का लटकवलयं?"जया
तिघी एकमेकींकडे बघून हळूच बोलल्या.."खूपच धक्का बसलेला दिसतोय हिला सुनेचा...एवढं टेन्शन घरात आहे मात्र हिला गमंत सुचली".
चहा नाष्टा झाला,गप्पा पण झाल्या.पण कुणाची हिंमत झाली नाही विचारायची.थोड्या वेळाने,
"चल माझी काम पडलीत घरी" मौसमी
"आम्ही पण काही मुक्काम ठोकायला आलो नाही.चल येतो आम्ही पण" परवीन
परवीन बाहेर गेली आणि जोरात पाय घसरून पडली...आणि ओरडली
"वाचवा रे!वाचवा! कुणी,मलाच कशाला पाडलं देवा बाकी माझ्या मैत्रिणी नाही दिसल्या का तुला?" परवीन
"जा नाही उचलत तुला?"मौसमी
"अगं उचल बाई लवकर जमिनीला खड्डा झाला तर" परवीन
तिघी जणीने उचललं आणि तिला घरी पोहचवलं.
"अगं माझ्या सूनेच डोहाळे जेवण आहे परवा या सगळ्यांनी मी विसरले होते सांगायचं"..जया
"हो...येतो ना आता शेवटचे दिवस राहिले..येऊ आम्ही.कशाला दुखवायचं कुणाला".मौसमी
दोन दिवस निघून गेले आणि डोहाळे जेवणाच्या दिवशी सगळ्या मैत्रिणी जमल्या.जयाकडे बरेच पाहुणे आले.
ते सगळं पाहून तिघी एकमेकांत कुजबूजतात.
"यांना काहीच कसं वाटत नाही. तिला एवढा कॅन्सर झाला पण हे लोक मस्त एन्जॉय करत आहे ". परवीन
"यांना काहीच कसं वाटत नाही. तिला एवढा कॅन्सर झाला पण हे लोक मस्त एन्जॉय करत आहे ". परवीन
"अगं शेवटचे क्षण सुखात घालवायचे असतील". मौसमी
"माझ्या तर डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या असत्या बाई".श्रीदेवी
"गप्प बसा.मला तर काहीही असं वाटत नाही की तिला काही झालं!" परवीन
"राहू दे आता तो विषय नको.उद्या बोलू आपा तिच्याशी." मौसमी
कार्यक्रम मस्त आनंदात पार पडला.दुसऱ्या दिवशी त्यांच्या कट्ट्यावर सगळ्या भेटल्या.
"जया अगं आम्हाला खूप आनंद झाला,तू तुझ्या सुनेचा प्रोग्राम खूप सुंदररीत्या पार पाड़ला". श्रीदेवी
"हो,अगं मला काय मुलगी नाही, तीच माझी मुलगी". जया
"हो ना पण... ती सुद्धा!". श्रीदेवी
"ती सुद्धा म्हणजे?"जया
"अगं काही नाही"श्रीदेवी
"बोल ना! तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागली".जया
"तुझ्या सुनेला कॅन्सर झालाय ना?"मौसमी
"काय!"जया
"मला माहित नाही आणि तुला कुणी सागितलं?" जया
हे एकून श्रीदेवी उभीच राहिली.मौसमी आणि परवीन दोघी जणींनी तिच्या कडे बोट दाखवलं
" जया अगं आम्ही तिला म्हटलं ,ती नेहमी \"ध\" चा \"मा\" करते" मौसमी
"तुला ना चप्पलने हाणायला पाहिजे". जया
"अगं... सॉरी सॉरी मला वाटलं.म्हणजे अगं तू नाही का सागितलं फोनवर" श्रीदेवी
"अगं मी म्हणाले ती गरोदर आहे म्हणून इकडे आली डोहाळे जेवणाला. आधीच तुला कमी एकू येत.तू सिनेमा बघत होतीस ना \"आनंद\" खर सांग?".जया
"हो पण... सॉरी,मी ऐकलं तिला कॅन्सर झालाय आणि इकडे आली आहे ट्रीटमेंट करायला". श्रीदेवी
"खरच बहिरी आहेस तू....हिचा वाढदिवस कधी आहे गं...हिला ना आपण कानाला लावायचे मशीन घेऊन देऊ म्हणजे ती चुकीचं ऐकणार नाही". जया
आणि सगळ्यांचे सहमत झाले. खरचं तिच्या वाढदिवसाला सर्व मैत्रिणींनी मिळून श्रवण यंत्र दिले.
माझी कथा कशी वाटली ते जरूर कळवा.धन्यवाद!
©® कल्पना सावळे.
©® कल्पना सावळे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा