विषय: आवडते पुस्तक
चाणाक्ष
लेखक: बाबू गंजेवार
लेखक: बाबू गंजेवार
आचार्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य यांचे नाव घेतले की त्यांची प्रत्येक योजनेत असलेली दूरदृष्टी, वागण्या बोलण्यातील प्रगल्भता, साम दाम दंड भेद यांचा यशस्वी वापर करून प्रत्येक वेळी जिंकलेले युद्ध. आजही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत असलेली दूरदृष्टी, विवेकबुद्धी व राजनीती खरचं खूप काही शिकवून जाते.
चाणाक्ष पुस्तक हातात घेतल्यावर प्रत्येक पान वाचल्यानंतर पुढे काय होणार आहे याची उत्सुकता कायम राहिली. यातच लेखकाने शब्दांच्या जाळ्यात वाचकांना गुंतून ठेवले आहे. आर्यावर्त चंद्रगुप्त मौर्य महाराज यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून एक उत्कृष्ट राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य चाणक्य.
तत्कालीन भारतीय राजकीय अवस्था पाहता सिकंदरास अटकाव करण्याची क्षमता केवळ मगध राज धनानंदजवळ होती, म्हणून मोठ्या उमेदीने चाणक्य मगधराज धनानंद यांच्याकडे येतो, पण नादान राजा त्याचा प्रचंड अपमान करून तेजोभंग करतो. सुडाग्नीने पेटलेला चाणक्य आपली शिखा सोडत नंदाच्या वंशाचा समूळ विनाश करण्याची प्रतिज्ञा भर सभेत करतो. इथून सुरू होते ते महानाट्य. आपल्या भर सभेत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि चंद्रगुप्त महाराज यांना राजा करून या देशाला योग्य मार्गावर आणण्याचे काम चाणक्य यांनी केले.

प्रत्यक्ष रणांगणावरील युद्ध न लढता अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर आणि शह कटशहाचे अहिंसक युद्ध खेळून आचार्य चाणक्य याने मुरवती देवीचा पुत्र मौर्य चंद्रगुप्त यांना कसे महाराज बनवले हे या पुस्तकात बघायला मिळते. कोणतेही युद्ध हे फक्त शस्त्र सैनिक यामध्ये न खेळता बुद्धीचा वापर करून कसे जिंकू शकतो हे चाणाक्ष मध्ये सांगितले आहे.
अनासक्ती, अफाट व्यासंग, चाणाक्ष बुद्धिमत्ता,व्यवहारी कौशल्य, पुरेसे कपट, धोरणी राजकारण, प्रसंगावधान, अचूक निर्णय शक्ती अखंड सावधानता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शुद्ध हेतू. इतक्या सर्व सद्गुणांचा समुच्यय एका चाणक्य नावाच्या व्यक्तीत झाला आहे.
राजनीती ही जिद्द बाणाप्रमाणे असते. वक्राकार वळसे घेणाऱ्या गतीने पण वेगात जाऊन अचूक लक्ष्य भेद करणारा जिद्द बाण. त्याला मार्गक्रमण करताना जी वेडीवाकडी वळणे घ्यावी लागतात ती सापेक्ष असतात. अंतिम लक्ष्य प्राप्ती करण्यासाठी ते गरजेचे असते. आचार्य चाणक्य यांचे रूप म्हणजे धीरगंभीर रूप अशा अथांग सागराची आठवण करून देते. त्यांचे शिष्यत्व पत्करल्यावरच ते किती ज्ञानी हे लक्षात येते. जे सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही ते स्पष्ट दिसते म्हणून त्यांना संभाव्य अरिष्ट आणि घात यांचे अचूक अनुमान लावता येते.
उपलब्ध साधनांचे, माणसांचे आणि वेळेचे किती काटेकोर नियोजन केले होते त्यांनी. वर्तमानात सापडलेल्या दुव्यांचा उपयोग, भविष्यात घडवून आणण्याच्या नाट्यात, अतिशय नियोजनपूर्वक करून घेण्याची विलक्षण कला त्यांना अवगत होती. तसेच धनानंद राजाचे विश्वासू सहकारी अमात्य राक्षस, सेनापती भागुनारायण, युवराज मलयकेतू, चंदनदास यांना चंद्रगुप्त महाराजांचे विश्वासू कसे बनवले हे या पुस्तकात बघायला मिळते.
प्रतिज्ञापूर्ती आणि अपेक्षापूर्ती यांचा संगम म्हणजे चाणाक्ष. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथातून आणि मुद्राराक्षस ह्या नाटकावरून आर्य चाणक्य या व्यक्तिरेखेचा अर्धवट परिचय होतो. चाणाक्ष पुस्तकाद्वारे गुरु जर आपल्या योग्य वेळी मार्गदर्शन करत असेल तर आपल्या जीवनाचे सोने नक्की होईल. त्याचबरोबर जिथे आपण चुकत आहे तिथे आपली चूक लक्षात आणून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्की करता येतो. जसे द्रोणाचार्य आणि अर्जुन यांचे गुरु शिष्याचे नाते सगळ्यांना प्रभावित करते तसे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त महाराज यांचेही नाते चाणाक्ष पुस्तकं वाचल्यावर प्रभावित करते.

श्रद्धा मगर अहमदनगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा