चॅम्पियन्स ट्राॅफी एक अनुभव! टिम - मारवा!

An experience I had during the "Ira Champions Trophy" !

ईरा चॅम्पियन्स ट्राॅफी

टीम :- मारवा!

कधीतरी अशाकाही गोष्टी घडतात ज्यामुळे माणसाला अगदीच इरीटेड होतं अन् नंतर त्याच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला की, मग माझ्यासारखीसाठी तर नुसतंच खीखीखी, हीहीही, हाहाहाहा.... असंच होतं.

असो!

समोर दिसतं तसं नसतं हो!

पण आपला नादच खुळा असं माझे मित्र-मैत्रीणी म्हणतात म्हणूनच मी सगळ्यांना जे दिसलं ते नव्हे तर "जो उन्होने दिख्खाईच नही!... वो दिखाउँगी"... I mean लिखुंगी .....!

तर झालं असं! सरळपणे आपलं माझं सगळं रुटीन चालू होतं. घर, काम, थोडंफार लिखाण बस् इतकंच् वगैरे-वगैरे... आणि एकेदिवशी समजलं की, ईरा ह्या लेखनकला व्यासपीठावर अनोखी अशी स्पर्धा सुरु होणार आहे. त्याकडे आधी फक्त बघून मी कानाडोळा केला. 

"जिस रास्ते जाने का नही उसका पता मै क्यू पुछूँ"?...ह्या टाईप! 

आमच्या ब्लाॅगर कट्ट्याच्या ब-याच मैत्रीणी ह्या स्पर्धेत सहभागी झाल्या अन् एफ बी उघडताच सतत त्याची जाहिरात समोर दिसायची.

अन् अशातच एके दिवशी ब्लाॅगर कट्ट्यावर संजूचा मेसेज येऊन धडकला.

ईराच्या स्पर्धेसाठी दोन जागा आहेत कोणी इन्ट्रेस्टेड आहे का पोरींनो?

बस् तो मेसेज मला दिसला अन् संजूकडून फोनवर थोडक्यात माहिती समजून घेतली.

अन् बस्! 

ठरवलं की, ह्या अनोख्या स्पर्धेचा अनुभव आपणही घ्यायचा.

हे सगळं ठरलं अन् काय सांगू तुम्हाला ?

स्पर्धेच्या ह्या दिड महिन्यात मी येरवड्यात अॅडमीट होते का काय अशी अवस्था झाली.

नुसतंच "खीखीखीखी, हीहीहीही" ....!

आदीती आणि माझ्या गप्पा नव्हे तर; 

नुसतीच "खीखीखीखी"!

उफ्फ! ...

त्या रात्री मला एका गृपमधे जाॅईन करून दिलं गेलं. कोण आहे गृपमधे काहीच माहीत नव्हतं.

आदीती सोडली तर नामदेव पाटील हे थोडंफार माहीत होते अन् बाकी सगळेच मला नवीन होते.

आमच्या टिमच्या कॅप्टन अस्मिता उर्फ स्वामिनी चौगुले ह्या ईराच्या टाॅप ब्लाॅगर !

ह्यांनी मला रात्रीतून स्पर्धा आणि कथामालीकेची थोडक्यात कथा सांगितली अन् त्या दिवशीपासून ह्या स्पर्धेसाठी आमची चॅटींग पार दोन, तिन वाजेपर्यंत चालू असायची.

कथामालीकेची थोडक्यात कथा वाचली. अन् अशी एक तीव्र सणक गेली डोक्यात की काय सांगू! .....

कथा चांगली नव्हती म्हणून नव्हे तर "आईच्या गावात"!  इथे मला प्रेमकथाच लिहिता येत नाही म्हणून मी जाम टेन्शनले ना बाब्वो!

मागे फिरावं का ह्या विचारातच असताना कथामालीका वगैरे सोडून त्याच दिवशी वकृत्वासाठी माझं नाव पक्कंही केलं गेलं. 

"अब तेरा क्या होगा कालीयाँ"!

असं म्हणत, 

"बघू ! जे होईल ते"! ....

आधीच क्लिअर केलं की, मी कथामालीकेचा शेवट करणार .... तेवढीच प्रॅक्टिस हो!.....प्रेमकथा लिहिण्याची वगैरे  ....!

कथामालीका सुरु झाली आणि आमच्या कथेचे एकेक भाग पोस्ट झाले. कथामालीका लिहिताना प्रकर्षाने जाणवलं की, एकच कथा वेगवेगळ्या पद्धतीने जेंव्हा लिहितात तेंव्हाच खरं कसब असतं ते त्या कथेचं. पण इथे झालं वेगळंच ......!पहिले चार भाग आपले सुरळीत चालू होते पण काही केल्या आम्हाला मात्र व्हयूज मिळत नव्हते. त्यात आमची "टाॅप ब्लाॅगर" (कोण ते समजून घ्या) पदोपदी तिच्या मनाची घालमेल आम्हाला जाणवत होती पण आम्ही मात्र तिला हसण्यावारीच घेतलं. 

शेवटी मला काही गोष्टी पटत नव्हत्या आणि व्ह्यूज मीळावे म्हणून मी अस्मिता आणि आदितीशी बोलून कथेला थोडं वेगळं वळण दिलं.

इथे मला जाणीवपूर्वक हे नमूद करायचंय की, मला माझ्या लिखाणासाठी आमच्या कर्णधाराने म्हणजेच अस्मिताने पूर्ण सूट दिली होती.

"तू लिही डाॅक्टर"!  म्हणत मला लिहितं केलं. पण काय अन् कसं लिहावं?

कथेतला असीम अन् अमृता!  .... त्यांचं भांडण अन् भावना !.....ताटातूट अन् परत मिलन वगैरे!....

कधी लिहिलं नव्हतं हो असं काही ..... प्राॅब्लेम माझ्यातच होता. म्हणूनच त्या असीम-अमृताच्या जीवालाच नव्हे तर ही कथा लिहिताना खरी "कळ" मलाच लागली होती. नको तिथे अन् नको त्या वेळी .....!

असो! 

पण नंतर मात्र आदीतीची अन् बाकी मैत्रीणींची साथ होतीच अन् कथेला वेगळं वळण मिळालं.

पण ह्या सगळ्यात एक भिती ही होती की; ज्यांच्या कथेत मी फेरफार करणार होते ते "सुनील गोबुरे" त्यांचा राग सहन करावा लागणार होता.

'मूळ कथा बदलल्यामुळे आमचे "सुनिलजी"  नाराज होते अन् मला त्यांचा चिडलेला गोलाकार हाप्पू झालेला चेहरा इमॅजीन करून हसून वेड लागणार होतं याचाच परिणाम म्हणून का काय मला बापडीला वाळीत टाकलं गेलं'. 

"हाय रे!  कित्त्त्ती तो अन्याय"! ????

पण मी आपली "गरीब गाय"! 

सगळं कसं दृष्टीआड टाकलं.

"आमच्या कथामालीकेने सुंदर आकार घेतला होता. मुळ कथेत बदल केला पण तरीही ह्या सुंदर कथेचं श्रेय सुनिलजींनाच जातं".

"नामदेवजी! पण गायब आणि जेंव्हा गृपवर यायचे तेंव्हा मात्र इतकं गोड बोलून लिखाणाचं कौतुक करायचे की, वाटायचं डायबेटिस कदाचित गोड बोलण्यानेही होऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीत हा माणूस कोणालाही प्रोत्साहन देऊ शकतो हे पदोपदी जाणवलं". 

कितीही चांगलं देऊनही आमची टिम प्रमोशनला कमीच पडली होती आणि टाॅप ब्लाॅगर अस्मिता चौगुलेला ते कमीपणाचं वाटत होतं म्हणूनच की काय; हात-पाय धुवून आंघोळ करुन ती ह्या स्पर्धेसाठी काम करत होती पण तरीही आम्ही मागेच होतो.

तिची चिडचिड ... होणारी मानहानी हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं. शेवटी मी तिला फक्त एवढंच म्हणाले की,

"अस्मिता!  आपल्याला काॅन्टीटी नाही काॅलीटी द्यायची आहे. स्पर्धा कोणीतरी एकच टिम जिंकणार आहे आणि बाकी हरणार आहेत पण तरीही आपल्या टिमचं काम नावाजलं गेलं पाहिजे ह्याकडे आपण लक्ष देऊ". 

तीलाही नंतर ह्या गोष्टी पटल्या आणि आम्ही आमच्याकडून शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू लागलो.

असो!

थोडीफार तू तू मै मै होत स्पर्धेची दुसरी फेरी चालू झाली.

वैयक्तिक कथेची!

अस्मिता, सुनीलजी, नामदेवजी सगळ्यांच्या कथा तयार पण आमच्या "श्रावणी आक्का"!

अरारारारारा!  

अस्मिता आठवडाभर मागे लागूनही श्रावणी आक्कांनी काय इश्टोरी दिली नाही अन् मग काय माणूस गप्प तरी किती बसेल?

मग ओरडून, कधी गोडीत, कधी रागवून आमच्या अस्मिताने तिच्या कथेचा पाठपुरावा केला अन् आम्हाला कथा मिळाली.

हुश्श्श! म्हणतच होतो पण तोपर्यंत श्रावणी मॅडमच्या कथेवर खुप काम करावं लागलं आणि अजूनही ते अपूर्णच होतं.

पहाटे चार वाजेपर्यंत अस्मिता, मी, अादितिने त्यावर काम केलं. पण अजूनही काम बाकी होतं. 

आता सकाळी कथा अपलोड व्हायची नाही अशी चिन्ह होती अन् अस्मिताचा चिंतातूर न पाहिलेला चेहरा मला दिसू लागला.

पण ऎनवेळी पहाटेतून कथा लिहून आदितीने मारवा टिमची लाज राखली. 

परत थोडे वादविवाद होत श्रावणी मॅडमची कथा रेडी झाली आणि खुप चाललीसुध्दा! ....

"श्रावणी मॅडम त्यावेळी हाॅस्पीटलच्या चक्रात होत्या म्हणून कदाचित असं झालं असावं. पण राग मात्र निघालाच त्यासाठी आक्का माफ करतीलच". ...!

शेवटची कथा माझी होती आणि प्रामाणिकपणे सांगते मला खुप न्यूनगंड आला होता. 

माझ्याकडून लिहिलंच जाणार नाही असं होत होतं. 

आदल्या दिवशीपर्यंतही माझी कथा झाली नव्हती. 

"अग् ए डाॅक्टर!  कथा झाली का"?

म्हणत अस्मिता पाठपुरावा करत होती. पण तीला सांगू तरी काय?....आदीतीने आणि बाकी मैत्रीणींनी खुप आधार दिला. "तू लिहू शकतेस ! सुरूवात कर"! म्हणत, मी रात्रीला कथा लिहिली. 

कथेत काही फेरफार होते त्यासाठी आदीतीने आणि अस्मिताने मदत केली आणि माझी कथा तयार झाली. 

हुश्श्श्श्श्श् ......

ख-या अर्थाने सगळ्यांनी हुश्श केलं तरी माझं खरं काम आता सुरू होणार होतं. 

स्पर्धेची तिसरी फेरी!

वकृत्व स्पर्धा!

शिवाजी महाराजांवर वकृत्व करायचं हे आधीच ठरलं होतं आणि त्यासाठीचं भाषणंही आपण स्वतः तयार करायचं हे ही ठरलं होतं. 

"डाॅक्टर!  तुला काय लागणारे मला सांग मी सगळं करते" म्हणत; अस्मिता सतत सोबत होती. कथा, चारोळी लिहून देत आमचं भाषण तयार झालं आणि मी विडिओ शुट केला. 

"अस्मिता!  फेटा भाड्याने आणलाय मी ...! तेवढं मला गुगल पे कर असं म्हणाले" !...

"अब्!  इसमें मेरा क्या चुक्या"? .....

खदाखदा हसत आमच्या कर्णधाराने माझा विडिओ बघत सुटकेचा निश्वास टाकला.

काय भारी बनलाय विडिओ ...

मारवाचा झंझावात आला ...

आपल्या टिमचा हुकमी इक्का आला....

खुपच भारी .....

असं भरभरून कौतुक करत अनेक वादविवाद होऊनही आम्ही टिम मेंबर एकत्र आलो.

तिसऱ्या फेरीनंतर स्पर्धा संपली आणि मनात समाधान होतं की, आपल्याला जसं हवं होतं त्याचप्रमाणे आपण केलं, लिहिलं आणि आपल्याकडून शंभर टक्के दिले. 

"कर्णधार म्हणून अस्मिताला आधी खुपच हसलो पण जोपर्यंत एखाद्या गोष्टीची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. नंतर प्रकर्षाने अस्मिताची अस्वस्थता, मनाची घालमेल , टिमसाठी सगळंकाही करणं हे दिसत गेलं आणि तिची मेहनत आम्हाला समजली".

"खरंतर तिच्या टिममधे आम्ही सगळेच अतरंगी होतो आणि ह्या अतरंग्यांकडून काहीतरी करवून घेणं हे किती मोठं काम असेल हे सगळ्यांना समजलंच असेल".

"मी खुप साधी हा !.... मी अज्ज्जीबातच कोणाला त्रास दिला नाहीये ह्याची नोंद घ्यावी".

ट्राॅफी आम्हाला मिळणार नव्हतीच पण आम्ही काॅलीटी नक्कीच दिली होती.

अस्मिताने आमच्याकडुन प्रसंगी ओरडून, रागवून, चिडून सगळंकाही करून घेतलं होतं अन् त्याचंच फलीत म्हणून काल स्पर्धेच्या निकालाच्या वेळी सगळ्यात जास्त पुरस्कार आमच्या टिमकडे आले.

पुरस्कार मिळाला तेंव्हा मागच्या दोन महिन्यातली मेहनत झरकन डोळ्यासमोरून गेली आणि "कर्णधार होणं; ये कोई बच्चो के खेल नही बाबू"! 

हे पुन्हा एकदा जाणवलं. 

सुनिलजी, नामदेवजी, श्रावणी मॅडम, आदीती अाणि कर्णधार अस्मिता ह्या सगळ्यांनी माझ्या सारख्या गरीब,साध्याभोळ्या मुलीला सांभाळून घेतलं त्यासाठी खुप आभार.

अस्मिता आणि आदीती तुम्हाला विशेष धन्यवाद! आणि खुप लब्यू! ...

"ईरा चॅम्पियन्स ट्राॅफीच्या निमित्ताने खुप काही शिकायला मिळालं आणि नवीन लोकांसोबत काम करायला मिळालं म्हणून ईराचे विशेष आभार! तसेच संजना मॅडम आणि योगिता मॅडमला खुप धन्यवाद !

टीम :- मारवा 

©SunitaChoudhari.