चंपा - अंतिम भाग

It's A Short Story Of Prostitute Girlखबरी : इन्स्पेक्टर प्रशांत आपल्याला आत्ताच एक खबर मिळाली आहे की ,पुण्यातील बुधवार पेठेत काही नाबालिक मुलींना वेश्या व्यवसाय करायला लावत आहेत.

इन्स्पेक्टर प्रशांत : शी, काय निर्लज्ज लोकं आहेत ही,कोवळ्या मुलींना ज्यांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे त्यांना केवळ काही रात्रींसाठी बरबाद करत आहेत . मान्य आहे की वेश्या व्यवसाय हे लीगल आहे परंतू, इतक्या लहान वयातील मुलींना या व्यवसायात भरती करणे हे एकदम खेदजनक आहे .बघतोच मी कोण हरामी लोकं आहेत ती .नेमके दिवाळीचे दिवस सुरू आहेत या सणासुदीला देखील यांना धंदा करावा कसा वाटतोय.

इन्स्पेक्टर प्रशांत ने सगळ्या टीम सोबत त्याच रात्री बुधवार पेठेत रेड टाकली ..

पोलीस आले म्हणून तिथल्या मावश्या, आक्कानी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला ,लाच देखील दिली पण तो इन्स्पेक्टर प्रशांत होता जो स्वतःवर कोणत्याही हव्यासाला भुरळ पडू देत नाही . लेडीज कॉन्स्टेबलच्या मदतीने त्या मावश्या, अक्काला तिथे पकडून ठेवण्यात आलं.

प्रशांत प्रत्येक खोलीत दार तोडून चेक करत होता, उघडे नागडे लोकं भीतीने आणि अब्रू नुकसान होऊ नये म्हणून तोंड लपवून पटापट तिथून पळून गेले .. एका एका खोलीत तपासात असताना अचानक प्रशांतला ब्लाउज घालत असलेली चंपा दिसली.. त्या खोलीत ती एकटीच दिसली म्हणून त्याने मान खाली घालून पुन्हा दरवाजा लावणारच तोच त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं.. तो तिच्याकडे बघतच
राहिला.. आपोआप नजर तिच्यावर स्थिरावली आणि डोळे भरून आले त्याचे ..पण आता चंपाने मान खाली घातली ,तिला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं.. अहो का नाही वाटणार हा तोच प्रशांत आहे जो तिचा गावाकडील एकुलता एक भाऊ परश्या आहे ..आपल्या भावाने आपल्याला आशा जागी एक वेश्या म्हणून पाहिल्यावर कोणत्या बहिणीला लाज वाटणार नाही ?..दोघे बहीण भाऊ एकमेकांना खूप दिवसांनी बघितल्यामुळे भारावून गेले आणि एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले ..

चंपाने प्रशांतला तिच्या परिस्थितीची वाताहत सगळी सांगितली आणि कशी ती या जाळ्यात फसत गेली हेही सांगितलं.. घर सोडून गेलेल्या प्रशांतने तिला सांगितलं की आई वारली तेव्हा त्याला खबर सुद्धा नव्हती ,जेव्हा पोलिसात भरती झाला तेव्हा कळलं आईबद्दल ..त्याच्या लाडक्या बहिणीला खूप शोधलं पण कुठेच सापडली नाही ..त्याच्या मनात सुद्धा नव्हतं आलं की बहीण इथे सापडेल. नेमकं योगायोगाने आजच भाऊबीज होती त्यामुळे प्रशांतने त्याच्या घरी चंपाला नेलं आणि भाऊबीज उत्साहाने साजरी केली .

समाप्त ..

🎭 Series Post

View all