चाळीशीत खुलली ती...भाग 3

Katha tichya sundartechi
चाळीशीत खुलली ती...भाग 3


वर्षोवर्षे उलटली आणि मुलं मोठी झाली.

आता अनु स्वत: कडे लक्ष द्यायला लागलीय.


आधी तिचं मेकप करणं, ब्रँडेड कपडे घालणं, सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं.

आणि म्हणून अचानक ती सर्वांना "गबाळी” भासू लागली होती. तरीही ती त्याकडे लक्ष देत नव्हती कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नव्हतं कारण तिच्यावर मुलांची जबाबदारी असते.


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत.

तिचा साधेपणही खुपायला लागतो.
काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात आणि कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते.

पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करत असते, आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते. 


आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू लागते.

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.

तिचं आधुनिक राहणीमान,
सुरेख केसांची रचना, नितळ त्वचा, मनमोकळं हसणं, वागणं, घरातला सहज सुंदर वावर, विविध स्पर्धा जिंकणं, रेसिपीत आवड निर्माण करणं, सर्वात मिसळणं सारं सारंच सुंदर वाटू लागतं.


पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का? खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते, बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते, टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते, सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते.

अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं.
पुनः तरुण व्हावंसं वाटतं.

ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन्
“ती कात टाकते” इतकं सहज सोपं गणित आहे ते.

स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात. होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल. कॉलेजची अल्लड तरुणी सुंदर नसते का?

पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का? चंदेरी बट सावरत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का?

क्रमशः

🎭 Series Post

View all