Login

चाळीशीत खुलली ती...भाग 2

Katha tichya Stritwachi
चाळीशीत खुलली ती...भाग 2

अनुचा पूर्ण वेळ सुरभीचं करण्यात जायचा.
तिचं दूध, शी,सु, रडणं, तिला झोपवणं.
दिवस कसा जायचा कळायचं देखील नाही.


अनुने स्वत:ला विसरून सुरभीला पुर्ण वेळ दिला. या सगळ्यामध्ये तिचं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायचं, कधीकधी तर केसाला कंगवा पण लागत नसे.

सकाळी सचिनचा डबा, नाश्ता, चहा झाला की घर आवरण्यात अकरा बारा वाजायचे, त्यात दोन घास खायला बसलं की सुरभी रडायची, तिला मांडीवर घेऊन ती कसंतरी जेवत असे.

आराम तर अजिबात मिळत नव्हता. रात्रीपण सुरभी खूप रडत असे. अनुला रात्री पण जागावं लागत असे. सचिन तिला मदत करायला पुढाकार घ्यायचा पण तो दिवसभर काम करून थकून जातो म्हणून ती त्याला नकार द्यायची.

दिवस सरकत गेले आणि सुरभी दोन वर्षाची झाली.

अनुच्या जीवनात पुन्हा आनंदाचा क्षण आला, पुन्हा एक कळी फुलायला लागली.

यावेळी घरी वंशाचा दिवा आला.

बाळाच्या रुपात आरवने जन्म झाला.

आता तर अनुची आणखी धावपड वाढली. दोन मुलाचं आणि सचिनचं करता करता पूर्ण दिवस जायचा. अनुला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता.

.................................


"कोणत्या विचारात गढली? चल ना उशीर होतोय आपल्याला."

"तू जा, मी येत नाही आहे."

"अग पण.."

"जा तू.."

ती आत गेली, तो एकटाच पार्टीला गेला.

ती आत जाऊन आरश्यासमोर उभी राहिली, तिने स्वतःचे केस मोकळे केले.

कितीतरी वेळ तशीच आरश्यासमोर बसून होती.