चालढकल

Procrastination is very simple now a days but it leads to a different life. We should always avoid the habit of procrastinating the things. This blog helps to understand how to control it?

चालढकल अर्थातच प्रोकास्टिनेशन !

"चिंटू चल खूप झाल तुझं खेळणं आणि बाहेर हुंदडणे....  आता अभ्यासाला बस बघू!"  आई थोडं रागातच चिंटू ला बोलली पण तो खुशालचेंडू मात्र " आई आता नको ना मी खूप दमलो आहे. थोड्या वेळाने बसेल" असे  म्हणत बाहेर निघून गेला.अभ्यास करायचा हे जरी असले तरी, आता नाही, नंतर करतो असे म्हणत  त्याची  जी चालू हाती ती चालढकल!

राजुला कार घेऊन 5 वर्षे झाली होती. आपल्याच नादात राहणारा तो थोडा तापट होताच. बाहेर गेले की कधी कोणाशी वाद होईल सांगता येत नव्हते आणि त्यात त्याच्या कार रॅश चालवण्यामुळे तर त्याने एव्हाना बरेच काही वाद ओढवून घेतले होते पण दरवेळी त्याच्या कार चे डॅमेज हे इन्शुरन्स होता त्यामुळे  मॅनेज होत गेले.  सुरवातीला केलेला त्याचा इन्शुरन्स संपला होता, त्याला बऱ्याच वेळा इन्शुरन्स रिन्युअल्स साठी कॉल्स येत होते. पण आज नाही उद्या , करत करत बराच काळ लोटून गेला आणि त्याने रिन्यूअल करायचा कंटाळा केला. एकदा बाहेरगावी जात असताना त्याने रॉन्ग साईड ने जात दुसऱ्याच्या एका कार ला धडक दिली. दोन्ही कार चे नुकसान झाले होते. जीवितहानी झाली नाही हे नशीब.तो माणूस आणि राजू यांची खूप जुंपली आणि भांडणे झाली, त्याने राजुला नुकसान भरपाई मागितली, पोलीस आले आणि बरेच प्रकरण वाढले.  जी चाल ढकल तो करत होता ते त्याला चांगलेच नडले. स्वतःची कार, आणि नुकसान झालेल्या दुसऱ्या व्यक्तीची दोन्हीची भरपाई करणे हे सगळे कित्येक हजारोच्या घरात गेले. डोक्याला हात लावून बसणे यापलीकडे फक्त बँक अकाउंट ला हात घालणे इतकेच त्याच्याकडे उरले. भयंकर पश्चाताप झाला पण वेळ निघून गेली होती.

 एखादे काम करायचे असले तरी आळशीपणाने आता नको नंतर करूयात, असे म्हणून वेळ मारून न्यायची जी वृत्ती असते तिला म्हणतात "चालढकल" जिने आजवर कोणाचेच भले झाले नाही. झाले ते कायम नुकसानच!

त्याउलट एखादे काम आताच केले पाहिजे किंवा वेळीच केलं पाहिजे ही जी वृत्ती आहे ती फार महत्वाची आहे जी नक्कीच फायदेशीर ठरते आणि यशस्वी बनवते. 

आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो की ही, चाल ढकल करण्याची वृत्ती इतकी फोफावली आहे की त्याने सतत  नुकसानच होते आहे. शालेय मुले असोत की कॉलेजमध्ये शिकणारे ज्याला त्याला फक्त आपल्या मनाला हवे तेच आधी करायचे ही वृत्ती निर्माण झाली आहे. मग ते मनासारखे जे असेल ते योग्य की अयोग्य हे विचारतच नाही. 

आजची जनरेशन ही मुख्यतः अडकली आहे ती मोबाईल यामध्येच.मग त्यात व्हाट्स ऍप आले,फेसबुक आले,इन्स्टाग्राम आले नाहीतर तासन तास बघणाऱ्या रील आल्या. काहीही होवो यात व्यत्यय नको मग कोणी मोठ्याने काम सांगितले की तोंड वाकडे करायचे. महत्वाच्या कामाला सुद्धा ढील पडते आणि मग उद्भवतो तो मोठा प्रॉब्लेम आणि मग डोळे उघडतात. याला काहीच अंत नाही जोवर मनावर घेतले जात नाही तोवर सुधारणा ही नाहीच.

जर हीच चालढकल जर आपल्या जिथून काही अपेक्षित असते तिथल्या लोकांनी केली तर चालेल का?

हीच चालढकल जर आईवडिलांनी मुलांच्या करियर घडवण्यासाठी केली तर चालेल का?

एका आळशी माणसाच्या तोंडून मी हे वाक्य ऐकले ... "आज करे सो कल कल करे सो परसो, 

इतनी  भी क्या है जल्दी जब जीना  है बरसो"

हे सोडून "कल करे सो आज आणि आज करे सो अब" हा मंत्र प्रचंड कामात येईल नाही का!

आपल्या हाती असलेल्या कामाचा आढावा घेतला तर पुढे जाता येईल.

आपल्या यशाचा मार्ग कुठून कसा जाऊ शकतो हे जर कळले तर नक्कीच सरतेशेवटी जे समाधान लाभेल ते पराकोटीचे असेल.

खरं तर जे करायचं ते तर करायचेच असते ना? मग वेळीच केले तर काय फरक पडेल? उलट यातून जे होईल ते नक्कीच योग्य निकाल देईल आणि नको ते निकाली लागेल.म्हणजे काय?

 म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत किंवा त्यांची अंतिम मुदत संपेपर्यंत कामांना उशीर करणे किंवा थांबवणे. 

तुम्ही कितीही सुव्यवस्थित आणि वचनबद्ध असलात तरीही, तुम्ही क्षुल्लक कामांमध्ये मध्ये तासनतास वेळ मारून नेत असण्याची शक्यता आहे, 

तुम्ही या कामासाठी तुमची महत्वाची कामे पूर्ण करणे थांबवत असाल, गृहपाठउ किंवा ईतर काही असाइनमेंट टाळत असाल अथवा घरातील कामांकडे दुर्लक्ष करत असाल तर चालढकल करणे  तुमच्या नोकरीवर, तुमच्या ग्रेडवर आणि तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. 

बहुतेक प्रकरणांमध्ये, "चालढकल"  हे गंभीर समस्येचे लक्षण नाही. ही एक सामान्य प्रवृत्ती आहे जी बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या वेळी स्वीकारतात.

कधी कधी "चालढकल" हा नैराश्याचा परिणाम देखील असू शकतो. हताशपणा, असहायता आणि उर्जेची कमतरता या भावनांमुळे सर्वात सोपे कार्य सुरू करणे कठीण होऊ शकते. उदासीनता देखील आत्म-शंका होऊ शकते. 

 या सगळ्याला काही सोल्युशनस अशी सुद्धा असू शकतील जसे,

1.आपल्या कामांची यादी तयार करा, महत्वाची कामे यांना प्राधान्य देऊन त्यावर योग्यपावले उचला. 

2. काही निर्माण होणाऱ्या प्रिकॉशन्स साईन्स ओळखा आणि त्यावर कृती करा. 

 3. विचलित होणे हे खूप सोपे आहे पण या विचलित होण्या पासून स्वतःच्या मनाला नियंत्रित करा: 

 4. जेव्हा काही चांगंले कार्य कराल तेव्हा स्वत:च स्वतःच्या पाठीवर थाप द्या.

5. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा 

हे केल्यावर आपली चालढकल थांबेल आणि आपण अजून उत्तम पद्धतीने वाटचाल करू. 

मग जमेल ना आजपासून नवीन संकल्पाची सुरुवात करायला ?

-अमित मेढेकर