Login

चला सोन लुटायला

चला सोनू लुटायला आठवणी
चला सोन लुटायला

तेव्हा आम्ही एका लहान खेडे गावात ,गावापासून थोड दूर शासनाने बांधून दिलेल्या काँलनी मधे रहात होतो .आमच्या रांगेत पाच घर होती आणि अजून दुसऱ्या बाजूला असलेली दोन - तीन घर असे मिळून रहात होतो . दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सर्व पुरुष आणि मुल जसे बसले तसे बाईक वर सोन लुटायला जात होतो . सोन लुटायला म्हणजे जवळ असलेल्या जंगलात जाऊन तिथून आपट्याच्या झाडाच्या छोट्या फांद्या तोडून आणायच्या . सगळे मिळून सोबत जंगलात जाऊन सोन लुटून आणायच .

घरी आल्यावर सोन्याची आणि पाटीवर सरस्वती काढून पूजा करायची .

शेजारी सगळ्यांकडे जाऊन सोन देऊन पाया पडायच्या .

लहान असताना सोन लुटून आणत होतो .

सुंदर ते बालपण आणि सुंदर त्या आठवणी .