चला हसुया अन् हसवूया

लेख
चला हसुया अन हसवूया

मी पत्नीच्या आदेशाचे पालन करणारा,माझी एकुलती एक सुगरण व आज्ञाधारक.....सुविद्य बायको अश्विनी,एकुलता एक कुलदिपक संकेत व माझी लाडकी राजकन्या कु.अनघा अशा चार जणांचं अत्यंत छोटं पण सुखी कुटुंब मराठवाड्याच्या राजधानीत दैनंदिन जीवन जगत असतांना दिवाळीच्या आठ दिवस आधी अश्विनी म्हणाली,
"अहो दिवाळी आठ दिवसांवर आली व यावर्षी घराची साफसफाई कधी करणार.....?
किराणा कधी आणणार.....?
किचन कधी आवरणारं....?
मुलांना नवीन कपडे कधी आणणार.....?
सगळी काळजी मलाचं एकटीला....
फराळाचे साहित्य कधी बनविणार....?".
अश्विनी ची लगबग व न थांबणारी वाक्ये ऐकुण मी तिला म्हणालो,"अगं, मला आता सुट्टी लागली आहे व सर्व कामे मी करतो.तु फक्त आराम कर. सर्व कामे मी, संकेत व अनघा तिघेही मिळून भराभर करतो..
अन् आपल्याला फराळ बनविण्याची काय आवश्यकता......?
हे ऐकून अश्विनीचा पारा आणखीनच चढला
आपल्याला फराळाचे साहित्य काय लोकं आणून देणार आहे.
मी हसलो व अश्विनीचा हात हातात घेऊन,

"तुच माझी बर्फी
मी तुझा खवा
दोघे मिळून खाऊ
आपण सुकामेवा"
हे ऐकून चक्क लाजली व माझ्यातला कवी जागा झाला

"मी आहे लाडू
तु आहेस शेव
आठवणी आपल्या
ही कायमची ठेव"

लाडू प्रमाणे गोड हसली.

शंकरपाळ्यासंगे
घेऊ खमंग भेळ
आयुष्यात घालवू
आता निवांत वेळ

हे ऐकून अश्विनी म्हणाली,मगं कामं कधी करायचे?

करंजीकडे होता कामा नये
दोघांचेही दुर्लक्ष
नाहीतर होईल माझा
खमंग ढोकळा रूक्ष
आमचा गंमतीशीर संवाद ऐकून मुलेही हासायला लागली.

करू मदत एकमेकांना
होईल सुखी जीवन
आपणच फुलवू
आपल्या घरात नंदनवन

दररोज नवनवीन पाककृती
चोचले पुरेल जिभेची
स्वयंपाकघरातच होईल
घट्ट गुंफण आपल्या प्रेमाची

©®श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर,औरंगाबाद