चक्रव्यूह (भाग १०)

चक्रव्यूह


चक्रव्यूह (भाग १०)


इकडे अभी नीरजवर नाखूष होता. त्याच्याशी भांडत होता पण तरी अभीला नीरज वाचून करमत नव्हते. बालपणापासून ची मैत्री दोघांची पण तरुणपणात अगदी खास झालेली. कित्येक गोष्टीत एकमेकांनी एकमेकांना साथ दिलेली. शाळा बरोबर, काॅलेज बरोबर, सिगरेट दारू बरोबर, एकच हाॅस्टेल, खोली ही एकच. चोरी बरोबर, मारामारी ही बरोबर इतकी घट्ट मैत्री. नीरजच लग्न झाले तरी तो अभी बरोबर
असायचा. बायको जवळ असताना ही नीरजला अभी शिवाय रहावत नव्हते. अभीच्या लग्नाचा प्रश्नच नव्हता.

बर्याच दिवसांनी अभी आणि नीरज ला एकांत मिळाला. भरपूर दारु प्यायले. मस्ती अंगात शिरली. दोघे रंगात आले. आणि इतक्यात दिल्या आला.

… .. … … … … … .


आठ दिवस झाले असतील ह्या घटनेला. एक दिवस सकाळी अभीला उठवायला नीरज हा मारू लागला. पण अभी काहीच प्रतिसाद देत नव्हता. काय झाले कळत नव्हते. पण अभी ची नाही लागत नव्हती. त्याला तसेच उचलून डाॅक्टरकडे नेले. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभी ची खून झाला होता दारू मधून वीष पाजून.

सतरा अठरा वर्षाचा क़ोवळा मुलगा, शिक्षणासाठी म्हणून मोठ्या शहरात येतो. आणि वाईट मित्रांच्या संगतीने वाईट नादाला लागतो. एक एक करत चक्रव्यूहात अडकत जातो. फसत जातो. ना त्याला बाहेर पडता येत ना कुणी त्याला बाहेर काढणार असते. शेवटी निराधार काळाच्या दाणे सापडतो.

… … … … … ..

अभीच्या खुनाच्या आरोपावरून नीरज ला जन्मठेपेची शिक्षा होते. त्यावेळी कुणीच त्याच्या मदतीला येत नाही. ना आईवडील ना मित्रपरिवार. अभी बरोबर नीरज ही चक्रव्यूहाच्या गर्तेत खोल खोल जातो.


समाप्त

🎭 Series Post

View all