चक्रव्यूह (भाग ९)

चक्रव्यूह


चक्रव्यूह (भाग ९)


नीरज आणि अभी आता एकाच खोलीत राहूनही कंटाळले. त्यांना बाहेर जायचे होते. पण त्यांची खोली बाहेरून बंद होती. नीरजने वडीलांशी भांडण करुन बाहेर जाऊन आले. असे रोज थोडे बाहेर जाऊन येत त्यांनी एक दिवस वडीलांना चुकवून पुणे गाठले.

पुण्यात आल्यावर त्यांचे सगळे धंदे परत सुरु झाले. नवीन मित्रही मिळाले. त्यांच्या सारखेच. सगळे मिळून चोरी करत सगळे मिळून मजा करत. रव्या, सध्या, दिल्या असलेच सगळे. सगळे चोरीमारीत पटाईत. व्यसने ही सगळी. आता रहाण्याचा ठिकाणाही सारखे बदलत होता. नीरजच्या वडीलांनी पण आता त्याला सोडून दिले होते. त्यांच्या हातात ही आता काही उरले नव्हते.

आता नुसत पाकिटमारी आणि चेन खेचण्याने काही जमत नव्हते. आता काहीतरी वेगळे करणे जरूरी होते. सगळ्या कंपूत नीरज आणि दिल्या दिसायला चांगले होते. थोडे मॅनर्स पाळणारे, माहिती असणारे होते. त्यांना पुढे करुन, त्याच्या बोलण्याने माणसाना बोलण्यात गुंतवून त्याला लुटायचे हा नविन फंडा त्यांनी शोधून काढला होता. माणसाला पुरते लुटून शिवाय त्याला चाकूच धाक दाखवून गप्प बसायला, रहायला सांगायचे. आणि त्याला पार कफल्ल करुनच सोडायचे. त्याच्या जवळचे सगळे काढून घ्यायचे.

नीरज आणि दिल्या बराचवेळ बरोबर असत, त्यामुळे त्यांची मैत्री खूप वाढली होती. कामात पण दोघे बरोबर काम करत. बरोबर बाहेर जात. दोघे गप्पा मारत. दोघे मिळून सगळी कामे करत.
एकदा अभी आणि दिल्याचा किरकोळ वाद झाला. तर नीरज दिल्याची बाजू घेऊन अभ्याशी भांडला. तेव्हापासून अभ्याचा दिल्यावर राग. आणि दिल्याचेही अभ्यावर राग होता. आता दोघ एकमेकाच्या वाटेला जात नव्हते पण अभ्याची आणि नीरजची मैत्री दिल्याला खुपत होती.

काय होईल ह्या सगळ्याचा शेवट?
पाहुया पुढच्या भागात.


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all