चक्रव्यूह (भाग ८)

चक्रव्यूह


चक्रव्यूह (भाग ८)


अभी लग्नाला गेला नाही पण मनात नीरजचा विचार करत बसला. त्याला नीरज हवा होता. काहीही झाले तरी. लग्नाला पंधरा दिवस होऊन गेले तरी नीरज आला नाही. इकडे अभी तडफडत होता तिकडे नीरज. बायको जवळ असताना नीरज सारख अभी चे कौतुक करत होता. सारख अभी अभी करत होता. इकडे अभी रोज नीरज ला फोन लावायचा प्रयत्न करत होता. पण नीरज च्या वडीलांनी त्याचा फोनच गायब केला होता.


एक दिवस न राहवून नीरज घरी कोणालाही न सांगता पुण्याला निघून आला. पुण्यात आल्यावर दोघे, अभी आणि नीरज अक्षरशः एकमेकाच्या गळ्यात पडून रडले. मग तीन चार दिवस दोघांनी अगदी मजा केली.
इकडे नीरजची बायको काळजी करत होती. नीरज नक्की कुठे गेला असावा तिला काही कळत नव्हते. सासू सासरे तिची कशीतरी समजूत काढत होते. त्यांना खात्री होती तो पुण्याला अभीकडेच गेला असणार. तो चार दिवस आला नाही म्हंटल्यावर नीरजचे वडील त्याला अभीकडे शोधायला गेले तर दोघेही तिथे नव्हते. ते दोघे त्यांना मिळणार कसे? ते दोघे मजा करायला गोव्याला गेले होते. नीरज च्या वडीलांनी भरपूर ठिकाणी चौकशी केली. शेवटी काहीच पत्ता लागेना तेंव्हा अजून एखादा दिवस वाट पाहून पोलीस कंप्लेंट करायचे ठरवले. इकडे अभी आणि नीरजने जेवढे पैसे होते तेवढे सगळे उडवून गोव्यात मजा केली. शेवटी हाॅटेल चे बील भरायला पैसे उरले नाहीत तेव्हा गोष्ट हातघाईवर आली. हाॅटेल च्या मालका बरोबर वादावादी झाली. गोष्टी मारामारी पर्यंत गेल्यावर मालकानी पोलीस कंप्लेंट केली व दोघांना जेल मधे जावे लागले. तिथे पोलीसांनी माहिती काढली तेव्हा हे दोघे पुण्याहून आल्याचे समजले. गोवा पोलीसांनी पुणे पोलीसांशी संपर्क साधून त्यांच्या घरच्यांना कळवले. नीरजचे वडीलांनी ताबडतोब गोव्याला जाऊन नीरज ला सोडवले. पण अभीला सोडवल्या शिवाय नीरज तिथून यायला तयार झाला नाही. नाईलाजाने अभीला पण सोडवून दोघांना घेऊन नीरजचे वडील गावी पोचले. नीरज आणि अभी आता थोडावेळ ही एकमेकांशिवाय रहात नव्हते. ते दोघे सतत नीरज च्या खोलीतच असत. खाण्यापिण्याची व्यवस्थाही त्यांच्या खोलीतच करावी लागे. आता नीरज च्या बायकोला ही सगळे समजले होते. ती माहेरी जायचे म्हणून मागे लागली होती. शेवटी नाईलाजाने तिला माहेरी सोडून यावे लागले. नीरज आणि अभी आता नीरज च्या आईवडीलांसाठी डोकेदुखी झाली होती.

काय होणार पुढे अभी आणि नीरजचे?
पाहूया पुढच्या भागात.


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all