"चाहूल"

चाहूल इवल्याश्या पावलांची

चाहूल तिच्या येण्याची लागता मन आनंदी झाले,
का कुणास ठाऊक पण उर मात्र भरुनी आले...


जाईल का सोडून ती मला कुशीत यायच्या आधी,

जार प्रश्नाची गुंतागुंत नकळत झाली मनामधी...


समजावले मग मीच माझ्या वेड्या मनाला,
हिम्मत कर आणि दाखव हे जग त्या जीवाला...


निष्पाप निरागस जीवाला पाठबळ आईचं देणार,
तिच्याशिवाय दुसरं कुणी नाही तिची बाजू घेणार...

नवे स्वप्न नवी आशा आयुष्यात तीच घेऊन येणार,
माझंच प्रतिबिंब जणू साक्षात नजरेपुढे दिसणार...

येताच ती घरात घर आनंदाने न्हाऊन गेलं,
अन् क्षणार्धात तिने प्रत्येकाला आपलसं केलं...

मुलगा असो वा मुलगी यात फरक कसला!
आई या हाकेने स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद दिसला!..
©®कल्पना सावळे.