चहा विथ भजी

Chahaa with bhaji hi ek kaalpnik Katha aahe.yacha konashi kahi sambandh nahi, aadhalyaas ha keval yogayog asel.


         *चहा विथ भजी ......*
          *........ एक तिखट गोड नात्याची सुरुवात!!!* [ भाग :१]
मेघना तशी समंजस , मनमोकळी स्वभावाची, सौदर्य आणि हुशारी यांचा संगम, सुशिक्षित (M.sc झालेली), संस्कारी मुलगी .
   तिचे सौदर्य असे कि , ती कोणाच्याही नजरेत सहज बसेल. चारचौघात उठून दिसणारी, गोऱ्या वर्णाची यात भर तिचे पाणीदार टपोरे डोळे , लांबसडक मऊसुत केस , तिची वेशभुषा ही स्वत : तिच डिझाइनर होती स्वतः ची . स्वंयपाक करण्यात सुगरण ! एकुणच काय ? तर परिपुर्ण !
   मेघना तिचा एक भाऊ आणि आई वडिल अस चौरस कुटुंब त्यांच.
           ☕☕☕☕ तसेच
नकुल हा देखील देखणा , मेघना इतका नसेल तरी मेघना ला शोभेल असा. एका प्रसिद्ध कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर कार्यरत. ( गर्लफ्रेंड बिलफ्रेंड शुल्लक बाबी , जी कोणी बायको बनेल तिच आपली प्रेमिका ! या मताचा)
   दोन विवाहीत बहिणी ,नकुल एकउलता एक आई वडिल एका अपघातामध्ये निधन पावलेले.

'प्रधान काका ' हे नकुल च्या बाबांचे मित्र तर  मेघना यांचे ते शेजारी  !
          ????????????????????
{ चला मग दोघांची पुढील वाटचाल बघू  }.
          ❤️❤️❤️❤️


मेघना :आई .... मी येते गं बाहेर जाऊन लतिका ,नेहा , आणि काही मैत्रिणी सोबत कॅफे मध्ये जाणार आहोत.

( आई किचन मधुन बाहेर येत , मेघना ला).
आई :
मेघना ... अगं ऐक जरा ते, प्रधान काका आले होते, एक स्थळ आहे तुझ्यासाठी . येत्या रविवारी पाहुण्यांना बोलावयच का ? 
  ह्या पाकिटात मुलाचे फोटो आहेत बघ एकदा आणि सांग !

( मेघना ओढणी सावरत आईला ...) : आई अगं फोटोत काय बर कळणार? चांगलाच असेल. तुम्हाला पसंत असेल तर बोलवा , मग बघु आणि हो एकदा दादा ला दाखव तो फोटो .

[ मेघना आता जरा घाईत निघते घरातुन , ती स्कुटी???? घेऊन जाते.]
 
यांच कॅफे फक्त नावाच असत. जाते ती बिग बाझार मध्ये. तिथे बाहेर असणारे फुड स्टॉल वरील कांदेभजी आणि चहा तिच्या आवडीचा. 
  ( मेघना आईचे बोलणे विचार करत, तिच्या नावरूपी कॅफे ला पोहोचते .)

नेहा आणि रोहिणी ही पोहोचतात.  या तिघी अजुन बाहेर असतात, इतक्यात लतिका येते; श्वेता ही पाठोपाठ पोहोचते. 

नेहा ः ( लतिकाकडे पाहत) इतका वेळ लावला येण्यासाठी , आधी अचानक बोलावते मग अस उशीर करते .

श्वेता : राहू दे नेहा ! आता आलो आहोत मग चला मस्त फिरूया . तसही रोहिणी ची एंगेजमेंट झाली कि हम तो पराये आणि दिल परदेसी हो जाएगा.
 ( रोहिणी जरा लाजून , स्मित हास्य देते आणि नकारार्थी मान डोलावते). 

मेघना: (सगळ्या मैत्रिणींना ) आता जाऊ या का ? शॉपिंग ला कि इथेच अतिक्रमण करायच ?
????????( सगळयाच जणी हसतात , आणि जातात बिग बझार ची सैर करायला).
           ????️????️????️
 संपूर्ण बिग बझार पालथ घालून काही गिफ्ट घेततात शेवटी, रोहिणी करिता तिच्या आवडीचे .
 मेघना काही न घेता परत येते व सर्वांना तिच्यातर्फे ट्रीट देते त्यांच्या आवडीच्या स्नॅक्स ची. सर्वजणी बाहेरील फुड स्टॉल्स जवळ गप्पा मारत पाणीपुरी चा आस्वाद घेत असतात. 
    नकुल ज्या कंपनीत कामाला  असतो ती त्याच भागात असते बिग बझार हून दहा मिनिटांच्या अंतरावर. संध्याकाळचे ६:०० वाजलेले असतात . तो देखील घरी जाताना बिग बझार जवळील टी पॉईंट & स्नॅक्स सेंटर मध्ये नाश्त्याला तो रोज प्रमाणे जातो.  नकुल च्या फोन वर प्रधान काकांचा मेसेज येतो . 
 "नकुल! रविवारी मुलगी पाहायला जायचं आहे, घरी आला कि कॉल कर ."

 त्याच स्नॅक्स सेंटर मध्ये चहा पिण्याकरिता  मेघना & टीम पण  रवाना होते. इतक्यात मेघनाचा फोन वाजतो. (ट्रींग ...ट्रींग....ट्रींग....ट्रीग).
 
मेघना: हॅलो आई ! 
 आई:  मेघा ! बाळा ते रविवारी पाहुणे येणार आहेत. तुला वाटत असेल तर  पार्लर ला जाऊन ये एकदा . म्हंटल तसही बाहेर गेली च आहे तर एकदा जाऊन ये .
मेघना: ठिक आहे आई .
आई : ठेवते बाळा!घरी आल्यावर बोलु आपण .
        मेघना फोन ठेवते व मिशन कांदाभजी विथ चहा कडे आपला मोर्चा वळवते. 
☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕
नकुल / मेघना ची भेट स्नॅक्स सेंटर मध्येच होणार कि? रविवारी नकुल मेघना च्या घरी पाहुणा म्हणून जाणार ? भाग २ मध्ये ! 
 तो पर्यंत तुम्ही चहा विथ कांदाभजी च स्वाद घ्या. 
????????????????????????????????
  लेखिका : सौ. शगुफ्ता मुल्ला .
( कृपया माझे लेख/ कथा परवानगी शिवाय कॉपी पेस्ट करु नये ) .

🎭 Series Post

View all