चहा तु हवा

expression what's for tea
चहा तु आपला असतो
कधी दमलं तर तुच हवा असतो

कधी कंटीग बनुन मैत्री घट्ट करतो
कधी वेलचीच्या साथीने लग्ने जुळवतो

पाऊस आणि तु म्हणजे जसे
प्रेमात असलेले नवरा बायको तसे

तो आला की तु हवाच मला हाती
हाती तु असताना त्याने यावच हीच अपेक्षा माझी.

चाय शाय नि गप्पा टप्पा ह्यांची जोडी
मारी किंवा भजी सोबतीला तुझ्या हवी

सुंगंध तुझा हा सकाळ करी फ्रेश
चव तुझी घेता संध्याकाळी कामातुन ब्रेक

नावे अनेक ,रंग अनेक
तरी अमृतापरी तुच ऐक

अशी तुझी महती
चोहीकडे तुच सर्वव्यापी