चाफा बोलेना! (भाग-१)

Lovely incidence between husband n wife .

जलद लेखन ( कथामालिका)

चाफा बोलेना!

(भाग -१)

लेखिका - स्वाती  बालूरकर, सखी

"लोकांचं बरं आहे बाबा. . बायका रुसल्या तर नवरे गुडघे टेकतात. . आमचं नशीब इतकं कुठलं? इथे ना रुसता येत ना मनवता येतं!"

निशी स्वतःशीच पुटपुटली.

तिच्या मुलीने, इशिताने हे ऐकलं आणि मोठ्यांदा हसायला लागली.

"काय झालं दात काढायला?" निशि चिडली.

"आईऽ अगं हे कुणाला ऐकवतीयस तू?"

"कुणाला ऐकवणार. ?. कोण ऐकतय माझं इथे?"

" आई तू तुझी जुनी टेप सुरु करू नको यार. . पप्पांसमोर काही बोलत नाहीस मग मागून ही धुसफुस करतेस. . "

"आता समोरच बोलले ना मी, त्यांना  किंमतच नाही माझी!"

"अगं पण ते ऐकतायत का बघ तरी . . त्यांच्या कानात ईयर फोन्स आहेत ते मस्त जुन्या गाण्यांची मजा घेत सोफ्यावर पडलेत. . त्यांना ऐकू जाईल असं बोल किंवा मग बोलूच नकोस. . !"

"त्यांची मजा मी कशाला खराब करू? सगळं करून नामा निराळे. . मी आपलं माझी माझी स्वतःशीच बोलत असते. . मिक्सर शी, डायनिंग  टेबलाशी, नाहीतर माझ्या भांड्यांशी,"

आतून  उल्हास तिचा मुलगा बाहेर आला. . तो सर्व ऐकत होता,

"इशू. . .  अगं हे तिचं स्ट्रेस मॅनेजमेंट  आहे गं!
तिने बडबड केली की तिला कुणाशी तरी बोलल्याचं समाधान मिळतं. . .आणि तनाव दूर होतो!"

"ते मला कळत नाही पण .  ते ऐकत नाहित ना मग बोलून तरी काय फायदा?" निशीने पुन्हा बडबड सुरु केली.

" आई तुझा नेमका प्रॉब्लेम  काय गं? बाबा स्वभावाने शांत आहेत हा ? कि तुला रुसता येत नाहित हा ?" दोघांनी  एकमेकांना टाळी दिली.

" हेच तर. . तुम्ही सगळे एक होता. . वेळ पडल्यावर. . तुमच्या बोलण्यातलं मला कळत नाही. तुमच्या इतकं शिकले नाहीना मी, नोकरी करत नाही. . . ते तर काय सगळं हो ला हो च करतात. . कधी म्हणून "असं नाही, तसं नाही" म्हणतच नाहित!" निशी अगदी रडवेली झाली.

" हे काय गं आईऽ .  यू आर सो क्यूट. . अगं तुझ्या शिक्षणाचा किंवा नोकरीचा काय संबंध घरात? तू खूप अमेझिंग मॉम आहेस. . इतकी छान गृहिणी  आहेस. . किती करत असतेस . . दिवसभर राबतेस. . का स्वतःला असं कमी समजतेस?" इशिताने आईच्या गळ्यात हात घातले आणि समजावलं.

"अगं आई नवरे भांडतात आणि वाद घालतात हा प्रॉब्लेम  असतो गं बायकांचा. . तुझी स्टोरीच वेगळी. तू जे ठरवतेस ते बाबा  ऐकतात. . तू केलं त्याला कधीच नाव  ठेवत नाहीत. . अजुन काय हवं? बी हॅपी!"
उल्हास ने  तर आपली मॅनेजमेंट  काउन्सिलिंग सुरू केली.

"तुला नाही कळायचं उल्हास. . अरे काय केलं ते मुकाट्याने खाणं. . हा मला माझा अपमान वाटतो.  आता सांगायचंच  तर काल इडली चटणी केली. कुठल्या तरी कामाच्या घाईत मीठ विसरलं. ह्या माणसाने व्यवस्थित पोटभर खाल्ली. कशी झालीय तर म्हणाले की छान. . अन ऑफिसला निघून गेले.  मी खायला बसले तेव्हा कळंलं  की चटणीत मीठच नव्हतं. . मला इतकं अपराधी वाटलं अरेऽ. . सांगायचं तरी ना!"

निनाद उठून आला होता आणि निशीच्या मागे उभे होता.

तिला कल्पना नव्हती.

क्रमशः 

लेखिका  -©® स्वाती बालूरकर, सखी

🎭 Series Post

View all