या मेसेजने सर्वजण धास्तावलात ना?

Message From Central Govt
सकाळी साडेदहाच्या आसपास सर्वांच्या मोबाईल वर जोरजोराने एक रिंगटोन ऐकू आली, काहीतरी वेगळाच मेसेज तिथे दिसत होता आणि फोन बायब्रेट होत होता. Alert हा शब्द वाचून अनेकांच्या पोटात गोळा आला असणार. मेसेजमध्ये लिहिले होते की केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे अपडेट्स मिळवण्यासाठी हा मेसेज आहे.
अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिले,
हा कुठला fraud मेसेज तर नाही ना?
हॅकिंग चा प्रयत्न तर नाही ना?
मोबाईलमध्ये व्हायरस तर आला नाही ना?
तर घाबरून जाऊ नका, हा कुठलाही फ्रॉड मेसेज नाही, हा केंद्र सरकारकडून आलेला एक मेसेज आहे. सध्याची पूरपरिस्थिती पाहता सर्वांना अपडेट्स मिळावे आणि अजून काही संपर्क करण्याच्या पद्धती अवलंबता येतील का याबाबत चाचणी सुरू असल्याने हा मेसेज सर्वांना आला आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्वांनी निर्धास्त रहा. केंद्र सरकारच्या या नव्या प्रयोगाचा फायदा अनेकांना होऊ शकतो. याबाबत पुढे काय सुविधा मिळू शकतील हे लवकरच कळेल.