बाळ की करिअर !! भाग - १

feminism Marathi feminist feminist

निकिता आणि कुशल दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी दोघांना आत बोलावून सांगितलं -

"निकिता, आता जास्त काळजी घ्यायला हवी हं, आता दोनाचे चार हात होणार आहेत "

कुशलला हे ऐकून प्रचंड आनंद झाला होता, पुढे काय? मुलगा असेल कि मुलगी? नाव काय ठेवायचं  ?

अनेक प्रश्न कुशल च्या मनात आले त्याने निकिता कडे बघितलं पण होणाऱ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुशल ला दिसला नाही..

"काँग्रॅजुलैशन्स  दोघांना आता अगदी सांभाळून राहायचं 

"हो डॉक्टर नक्की," कुशल अगदी आनंदात म्हणाला.

दोघेजण दवाखान्यातुन निघून गाडीत बसले.. कुशलने निकिता ला घट्ट मिठी मारली. निकिताने अगदी नावापुरतं हसू आणलं .

" निकिता,, अग आपण आई आणि बाबा होणार आहोत.. मी खूप खुश आहे.. आपण घरी जाताना मिठाई घेऊन जाऊया का? कि मोठा केक ?

निकिता मात्र खिडकीच्या बाहेर विचार करत मग्न होती..

तिला तिच्या माहेरची आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आलं .. कसाबसा आवंढा गिळला आणि तिला लग्न झाल्यानंतर ती जेंव्हा सासरी अली होती तेंव्हाची आठवण झाली .

" निकिता च स्वागत सासरी अगदी जोरदारपणे झालं होतं "-  सासरकडची मंडळी सुद्धा अगदी छान, सोज्वळ असल्यामुळे निकिताचे आई- बाबा पण बिनधास्त  होते.

निकिता ची सासू तर अगदी शांत आणि कोमल. निकिता ला अगदी मुलीप्रमाणे वागयवायची..

पण निकीता ची आजलसासू "शांताबाई " ह्या मात्र स्वभावाने अगदी कठोर आणि शिस्तप्रिय. जुन्या परंपरा , रूढी ह्यावर अतिशय भाव असलेल्या.............. घरात सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच व्हायला हवं. मॉडर्न विचारांचं त्यान्ना वावडं होतं .

आणि ह्याउलट निकिता - निकिता म्हणजे कॉलेज मधली ब्युटी queen . कॉलेजात असतांना तींने " मिस फ्रेशर " पासून तर "टॉपर" सगळ्याच फील्ड मध्ये नाव केलं होत. 

पण सासरी आल्यानंतर तिने आपले मॉडर्न वागणं जरा बाजूलाच ठेवलं होत. पण निकिता ची सासू सगळं समजून असल्याने ती शांताबाई ना न कळत निकिता आणि कुशल ला सिनेमा ला पाठवत असे. निकिता ला बाहेर मॉडर्न कपडे घ्यायला परवानगी होती फक्त शांताबाई समोर अगदी साडी पाहिजे.

निकिता ला लग्न झाल्यानंतर आपलं  काम पुढे सुरु ठेवयचा होतं . लहान वयातच निकिता हॉटेल मध्ये मॅनेजर झाली होती पण लग्न झाल्यानंतर शांताबाई मुळे  कामावर जाण्याचा  प्रश्न च नव्हता..

निकिता च्या सासू ने तिला सांगितलं होतं - " निकिता थोडे दिवस थांब, शांताबाईना आपण मनवू , तुला जॉब करण्या साठी"

निकिता चे मोठी मोठी स्वप्न होती. पण शांताबाईमुळे  तिला स्वप्नांना बांधून ठेवावा लागल होतं.

" शांताबाई ची तब्येत , निकिता आणि कुशल च्या लग्न नंतर जरा बिघडली होती. एकदा निकिता शांताबाई ला त्यांच्या खोलीत औषध देण्यासाठी गेली "

"शांताबाई ने तिचा हात धरून तिला जवळ बसवलं "

"सुनबाई, हे बघ आता सगळं तुझ्याच हातात आहे, मी देवाच्या दारात जाण्या आधी मला नातवाचा तोंड बघायला मिळाल म्हणजे अगदी आनंदाने जात येईल बघ "

"आजी पण अजून तर २ च महिने झाले आहेत ना "

शांताबाई हसून म्हणाल्या - " अगं मला तर हा शंकर ९ व्य महिन्यातच झाला बघ" तरुण वयातच शक्ती असते बघ हे बाळंतपण करायची , पुढे वेळ लागला तर मग काही ना काही देवाचा कोप लागतो "  म्हणून मी सांगतेय - मी जाण्याच्या  आत बाळ पाहिजे, नाहीतर माझा आत्मा बाळाच्या भेटीने अतृप्त च राहीन बघ "

निकिता ला शांताबाई हे शब्द अगदी जसे च्या तसे आठवत होते, गाडी घराजवळ आली आणि तेच विचार तिच्या मनात चालू होते..

खरं तर आई होण्यासाठी मी अजिबात मानसिकरित्या तयार नाही , त्यात एका लहान जीवाला या वाढवायचं म्हणजे सोपं  काम नाही. आणि त्याहून महत्वाचा म्हणजे माझा करिअर., कॅरिअर च्या सुरवातीलाच मोठा ब्रेक आला तर पुढे प्रॉब्लम येतात. आणि आता  कुठे मॅनेजर झाले होते. बाळ आल म्हणजे १  वर्ष तरी कुठे जाता येणार नाही. हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.

आणि दुसरीकडे शांताबाईच ऐकलं नाही तर आयुष्यभरासाठी खंत मनात राहील. 

एकीकडे माझ करिअर आणि दुसरीकडे एका हट्टी  म्हाताऱ्या जीवाची इच्छा..तस बघितलं  तर हे मूल निकिता आणि कुशल च होत. आणि त्या दोघांना त्या मुलाबद्दल काहीही निर्णय घेण्याचा अधिकार दिला जात नव्हता.. कुशल सुद्धा  खुश होता..

निकिताच्या एका बाजूला घरच्यांना विरोध करून एकतर आपली स्वप्न पूर्ण करा नाहीतर आपल्या स्वप्नांना चुलीत टाकून आयुष्यभर ह्याची खंत करत बस.. ह्यापेक्षा दुसरा पर्याय निकिता कडे नव्हता ..

कुशल आणि निकिता घरापर्यंत पोहोचले.. कुशल ने ५ किलो गुलाबजाम- ५ किलो पेढे सोबत आणले होते.. उशीर होता फक्त घरच्यांना आनंदाची बातमी देण्याचा .

कुशल पळत पळत घराच्या दरवाजापर्यंत गेला आणि निकिता ला जाणीव झाली की हि शेवटची पायरी आहे. एकदा घरच्यांना समजला कि मी प्रेग्नन्ट आहे तर पुढे  काहीच करण्याचा पर्याय ते माझ्याकडे ठेवणार नाही.

पुढे निकिता काय करते - पुढच्या भागात 

🎭 Series Post

View all