Aug 09, 2022
कथामालिका

अस्तित्वासाठी लढा

Read Later
अस्तित्वासाठी लढा


       रेवती, एक मध्यम वर्गीय कुटुंबातील किशोरवयीन मुलगी. नुकतेच दहावीला गेल्याने व पजतच हुशार असल्याने, वडिलांनी ऐपत नसतानाही चांगल्या कोचींग क्लासमध्ये तिला प्रवेश मिळवून दिला. पण जसे आपण सर्वच जण जाणतो की किशोरवयीन अवस्था ही मुलामुलींच्या आयुष्यातील एक अत्यंत नाजूक असा भाग असते,ज्यात त्यांचे बरेचसे इमोशनल बदल,वागणेबोलने हे शरीरात तयार होणारे हार्मोनल बदल ठरवत असतात. 
आपसूकच रेवतीही वडिलांनी आपल्यावर खर्च केलेल्या पैशांचे आपण चीज करू शकू की नाही,याच विचारात असायची.म्हणजे क्लास मधील शिक्षकांशीही बोलतांना,त्यांना शंका विचारतांना नेहमी घाबरून बोलायची.अशाआणि अनेक साध्या साध्या गोष्टींचे रेवती टेंशन घेत असे आणि त्याचा परिणाम कुठे तरी अभ्यासावर होत असे. क्लासला रोज सायकलवर येतांना असंख्य  विचार ( इतरांबद्दलचे ) जसे की अमुक केल्यावर माझे काय होईल,या शिक्षकांना माझा राग तर नसेल ना आला,ते मला लक्षात ठेवून माझे मार्क्स तरकमी    करणार नाही ना करायची. याच काळात तिला वॉश रूम ला सतत जावे लागायचे, कारण तिचा स्वतःवरचा विश्वास खूपच कमी झालेला होता.पण यातून बाहेर पडून काहीतरी छान कामगिरी करावी असे तिला मनोमन वाटायचे.पण काही केल्या तिला ते शक्य होईना.त्यातच एकदा क्लास मध्ये चुकून मोबाईल रिंग वाजल्याने शिक्षकांनी तिला खूप रागावले व ती तर कोलमडून च गेली. वास्तविक आईबाबा गावाला गेल्याने संपर्कासाठी हा मोबाईल त्यांनी तिला घेऊन दिला होता,पण रिंगटोन सायलेंट वर टाकायचे त्या दिवशी ती विसरली होती आणि आता तर हे शिक्षकही माझा तिरस्कार करतील व कमी मार्क्स देतील असा विचार ती करू लागली. शाळेतही परिस्थिती हीच होती, कुठल्या शिक्षकाला माझ्याबद्दल काय वाटते,ते मला कसे मार्क्स देतील याविषयी ती सतत विचार करत असे.त्यातच कॉलनीतील एक मैत्रीण सारखी रेवतीला डिवचत असे.असे एक ना अनेक प्रसंग रेवती डोक्यात घेऊन विचार करत असे,परिणामी तिची अभ्या सातील प्रगती खुंटली होती. आता तिला स्वतःला च यातून बाहेर पडून  सुटका करून घेणे गरजेचे होते.
 अंगचीच हुशार असल्याने तिने आपला मोर्चा अभ्यासाकडे वळविला.अनेक सराव परीक्षांमध्ये तिला छान गुण मिळत होते. मुख्य परीक्षांचा काळ उजाडला आणि तिने सर्व पेपर नव्या जोमाने दिले. तरीही गणित विषयासाठी ती थोडी घाबरलेली होती. परीक्षा केंद्रावर पेपर चालू असताना अनेक शिक्षक तर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत,पण रेवती पूर्णपणे स्वतः पेपर सोडवत असे . असे करत करत परीक्षांचा काळ संपला वा रेवती फ्री झाली.मग आता मामाकडे सुट्ट्यांमध्ये जाण्याचे तिला वेध लागले. तिकडे धाकट्या मामाचे लग्न असल्याने ती लवकरच मामाकडे गेली व अचानक थोडी  स्थूल झाली.अजूनही तिचे स्वतः बद्दलचे अती विचार करणे कमी झालेले नव्हते.तिने त्याचेही टेंशन घेतले व आत्मविश्वास अजूनच कमी झाला.
पण मामाकडे तिने सुट्ट्या भरभरून एन्जॉय केल्या,आणि रिझल्ट ची तारीख येऊन ठेपली.
(क्रमशः) 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

सौ प्रियंका कुणाल शिंदे बोरुडे

Freelance Teacher, Content Writer

I am Mrs Priyanka Kunal Shinde Borude,an Engineering Postgraduate Homemaker.I have a teaching experience of 3 years to Engg students.My Cerebral Palsy Child Explored me by all means.He gave me Vision towards life. Thank U my Little munchkin.