Aug 16, 2022
कथामालिका

अस्तित्वासाठी लढा- भाग २

Read Later
अस्तित्वासाठी लढा- भाग २
अस्तित्वासाठी लढा भाग-

     आज रेवतीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. आज रेवतीचा दहावीचा रिझल्ट होता.सकाळपासून घरातील सर्वांचा देवाकडे धावा चालू होता,सर्वांना खात्री होती की रेवती मेरीट मध्ये नक्की येणार.
   रेवतीने  प्रयत्न ही केलेच होते .म्हणूनच ती सकाळी १० वाजेपासून इंटरनेट कॅफे मध्ये जाऊन बसली होती. ठीक ११ वाजता निकाल संकेतस्थळावर दिसणार होता. रेवतीनेही रिझल्ट चा चांगलाच धसका घेतलेला होता,कारण सर्वांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण रेवतीने कधीच तिला या किशोरवयीन अवस्थेत सामोऱ्या जावं लागलेल्या अडचणीं चा उल्लेख कोणाजवळ केला नाही. एवढेच नव्हे तिने या सर्व बदलांना खूपच गंभीरपणे घेऊन १० चा अभ्यास केला होता,आणि सर्वांच्या अपेक्षेचे ओझे,ते  तर वेगळेच. एकंदरीत प्रचंड मानसिक तणावाखाली रेवती वावरत होती,पण कुठेतरी तिची हुशारी,गुणवत्ता या सगळ्या गोष्टींपासून थोड्या प्रमाणात का होईना पण वाचवत होती. परिणाम व्हायचा तोच झाला.ठीक ११ वाजता संकेतस्थळावर १० च्या निकालाची लिंक दिसू लागली ,आणि रेवती ने  आपला सीट नंबर व आईचे नाव एंटर के ले. रेवती ८७.२ टक्क्यांसह उत्तीर्ण झाली. रेवती निकालाची प्रत घेऊन घरी आली. रेवतीसह सर्व घरातली माणसं नाराजच झाली.रेवरीचे मेरीट केवळ 3 टक्क्यांनी हुकले.९० टक्क्यांवरती त्यावर्षीचे १० वीचे मेरिट क्लोज झाले होते.अजूनही रेवतीला ह्या शारीरिक हार्मोन्स मधील बदलांनी सोडलेच नव्हते.ती खूपच इंट्रोव्हर्ट (स्वतःच्याच विश्वात रमुन,लोक मला काय म्हणतील,माझा कसा विचार करतील)होत चालली होती.
पण या सगळ्या गोष्टींमध्ये काही चांगल्या गोष्टीही घडतच होत्या. रेवती शाळेतून दुसरी तर मराठीत प्रथम आली होती. त्यासाठी तिचा शाळेत सत्कारही करण्यात आला. त्यामुळे थोडेसे का होईना ती मेरीट मध्ये न आल्याचे दुःख पचवू शकली होती. शिवाय अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे शिक्षकाच्या आग्रहाखातर स्टेज वर बोललीसुद्धा.रेवती खुश होती पण मेरीट मध्ये न आल्याची सल कायम तिच्या मनात होती. त्यानंतर वडिलांच्या कंपनीत, कॉलनीमध्ये तिचा छान सत्कार झाला.
आता वेळ होती पुढे काय हे ठरवण्याची. मग सिनियर विद्यार्थ्यांना विचारून रेवती ने ११ वी सायन्स शाखेत प्रवेश घ्यायचे ठरवले,तेही थोड्या लांब असणाऱ्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये. रेवती ने किशोरवयीन बदल आणि अडचणींचा  एक टप्पा तर पार केला होता, आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार होती. साहजिकच आता तीव्रता थोडी कमी राहणार होती,पण स्वतःवर पूर्णपणे कंट्रोल तिने मिळवलेले नव्हते,रोचक आत्मविश्वास अजूनही कमीच होता. आता तिची तारेवरची कसरत सुरू झाली होती.सकाळी ६-९तसेच संध्याकाळी५-८ असे ११-१२विचे क्लासेस चालू झाले होते,आणि मधल्या वेळेत  कॉलेज असे वेळापत्रक ठरले होते. कॉलेज सुरुवातीला रोज असायचे पण काही दिवसांनंतर कॉलेज ला क्वचितच गेले तरी चालायचे, किंवा फक्त प्रॅक्टीकल असेल तेव्हा गेले तरी चालायचे. सगळे सुरळीत चालू असताना, रेवातीच्या मैत्रिणी मात्र बनत नव्हत्या,तसेच आत्मविश्वासाच्या अभावामुळे वाशरूमला अजूनही सतत जावे लागे. त्यातच एकदा क्लासमध्ये एका मैत्रिणीला प्रॉब्लेम आल्याने,तिचे कपडे भरलेले तिने पाहिले, व ती फार घाबरली आणि त्या मैत्रिणीची तिला दयाही आली. मग ती मैत्रिण तातडीने थोड्या टेन्शनमध्येच घरी गेली. त्यावेळी रेवतीला तिचे प्रॉब्लेम चे सुरुवातीचे दिवस आठवले,जेव्हा तिला नीट पॅड ही लावता येत नव्हता आणि क्लास मधे तिलाही असेच काहीसे सोसावे लागले होते.ती दुःखी झाली आणि केवळ स्त्रियांनाच का हा त्रास असा विचार करू लागली.
११-१२वी सायन्स चा क्लास जरा लांब असल्याने वडिलांनी तिचा वेळ वाचावा म्हणून स्कूटी घेऊन दिली. पण एकदा क्लासला उशीर झाल्यामुळे तिने घाईतच क्लासला जायचे ठरवले आणि वाटेतच नव्याकोऱ्या गाडीचा अपघात झाला , र रेवतीला जास्त काही लागले नाही,पण गाडी चे जास्तच नुकसान झाले.रेवती तशीच घरी गेली व आज क्लास ला सुट्टी होती असे आईला सांगितले.पण बाबांनी जेव्हा गाडी पुसायला घेतली तेव्हा गाडीचा अपघात झालेला आहे असे बाबांना लक्षात आले.  त्यांनी त्वरित रेवतीला याबाबत विचारले असता तिने जे खरे घडले ते सांगितले, व तीला बाबांच्या  तसेच आईच्या रोषाला (रागाला) सामोरे जावे लागले.पुढील २-३ दिवस रेवती क्लासला गेलीच नाही. म्हणजे  कुठेना कुठे जे तिच्या सोबत घडत होतं त्यासाठी ती पूर्णपणे स्वतःला दोषी मानत होती. ती आता अधिकाधिक ताणतणावग्रस्त राहू लागली. त्यामुळे परत अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. पण यातूनही ती वर येण्याचा कुठेना कुठे प्रयत्न करतच होती, व क्लासमध्ये लक्षपूर्वक  शिक्षकांचे लेक्चर ऐकत होती. एकंदरीत तिला दैनंदिन जीवन जगताना ही प्रचंड संघर्ष करावा लागत होता व तरीही स्वतःचे अस्तित्व जपण्याचा ती सतत प्रयत्न करत होती.
असेच दिवसामागून दिवस जात होते.आता १२ वी च्या परीक्षेच्या आधीची सराव परीक्षेची सर्व जण तयारी करत होते कारण मुख्य १२वी बोर्ड परीक्षा जवळ आली होती.

आता रेवतीला इथेही अडचणी येतील का ..  १२वी  बोर्ड परीक्षेत  तिचे काय होईल, नक्की वाचा पुढील भागात.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

सौ प्रियंका कुणाल शिंदे बोरुडे

Freelance Teacher, Content Writer

I am Mrs Priyanka Kunal Shinde Borude,an Engineering Postgraduate Homemaker.I have a teaching experience of 3 years to Engg students.My Cerebral Palsy Child Explored me by all means.He gave me Vision towards life. Thank U my Little munchkin.