Call Girl 12

To Be Continued...

हर्षद फोन ठेऊन पुन्हा देवयानीकडे येतो. देवयानी अजूनही जागी असते. हर्षद देवयानी सोबत बोलायचा प्रयत्न करतो.


हर्षद - कसे वाटत आहे आता देवू तुला...?

देवयानी - थोडा अशक्तपणा वाटतोय.

हर्षद - झोपायचा प्रयत्न कर. बरं वाटेल आराम केलास की उद्या सोनोग्राफी साठी जावे लागेल. पण तुला अचानक चक्कर कशी आली म्हणजे तू पडलीस तेव्हा आवाज झाला. कसला आवाज झाला म्हणून बघायला मी बाहेर आलो. तर तू जमिनीवर पडली होतीस. मी खूप घाबरलो होतो तुला तसे बघून.

देवयानी - धावपळी मूळे अशक्तपणा आला असेल आणि म्हणून चक्कर आली असेल कदाचित. झोपते मी बरं वाटेल उद्या. तू ही झोप.

देवयानी झोपते. औषधांच्या गुंगिने तिला लगेच झोप लागते. हर्षद सुद्धा आपले फोन कॉल आणि काम आवरून झोपतो.
सकाळी देवयानीला लवकर जाग येते. ती सगळे आवरून चहा पित बसलेली असते. तेवढ्यात हर्षद उठून तिच्या जवळ येतो.


हर्षद - काय ग. कधी उठलीस? मला एकदा उठवायचे तरी होतेस. आपल्याला डॉक्टरकडे जायचयं. चल मी आवरातो पटकन.

हर्षद स्वतचं आवरून तयार होतो. दोघेही डॉक्टरकडे जातात.
डॉक्टर देवयानीच्या सगळ्या तपासण्या आणि सोनोग्राफी करतात. हर्षदला रिपोर्ट्स करता संध्याकाळी बोलवून ते देवयानीला काही गोष्टी समजावून सांगतात आणि औषध लिहून देतात. हर्षद देवयानीला घरी सोडतो आणि आराम करायला सांगून त्याच्या कामासाठी निघून जातो.

बघता बघता आठ महिने निघून जातात. देवयानीच्या प्रसुतीची तारीख जवळ येते. दिलेल्या तारखे अगोदर देवयानीला कळा चालू होतात म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. देवयानीला डॉक्टर तपासतात आणि हर्षदला बोलवून घेतात.

डॉक्टर - मी तुम्हाला सांगितलं होत कदाचित प्रेग्नंसीच्या वेळेस अडचणी निर्माण होऊ शकतात. आम्ही आई किंवा बाळं दोघांपैकी एकाला वाचवू शकतो. अश्या परिस्थितीत आम्ही आईला वाचवतो. तुम्ही ह्या पेपरवरील सगळे नियम वाचून घ्या आणि सही करा. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो.
डॉक्टर घाईत हर्षद ला सगळे समजवून तिथून निघून जातात. हर्षद सगळे नीट वाचून सही करतो.

पण डॉक्टरांना फक्त देवयानीला वाचवण्यात यश येत. ह्या सगळ्याचा देवयानीच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला असतो. आपल्या पोटच्या लेकराला नऊ महिने इतके पोटात वाढवून सांभाळून असे आकस्मित त्याच ह्या जगात येण्यापूर्वीच निघून जाणं त्या माऊलीला कसे सहन होईल. काही दिवसांनी देवयानीला घरी सोडतात. घरी आल्यावर देवयानीला त्या दिवशी घडला प्रकार आठवतो. ती हर्षद ला त्या बद्दल विचारते.

देवयानी - हर्षद त्या दिवशी आपल्या घरी तो दुसरा माणूस कोण होता? तो माझ्याविषयी असे का बोलत होता?

हर्षद - कोण माणूस? कधी? कोणत्या दिवसाबद्दल बोलतेय तू, मला काहीच कळत नाहीय.

देवयानी - त्या दिवशी जेव्हा मी चक्कर येऊन बाहेर पडले होते.

हर्षद - नाही तेव्हा कोणीच नव्हत. अग टीव्हीचा आवाज असेल.

देवयानी - तू सरळ सांगतोस का की काय चालय तुझे?

हर्षद - अग खरंच काही नाही. तू आराम कर.

देवयानी - अरे तुझ्यामुळे आपल बाळं गेलं रे. तुला डॉक्टरांनी सगळे सांगितलं होत तरी तू माझ्यापासून लपवून ठेवलं. त्या दिवशी पण घरी कोण होत ते सांगत नाहीस. तू असं का वागतोय माझ्यासोबत. मी माझे सर्वस्व दिलंय रे तुला आता तर मी कधीच आई होऊ शकणार नाही. तू मला सांग सगळे नाही तर मी आईंना गावी फोन करेन.

हर्षद - काय कटकट लावलीय ग तू. बरं कर आईला ना कर फोन आणि लागला फोन तर मलाही सांग बरं. डोक्याला ताप केलाय तू अगोदरच. बरं आता तुला सांगतोच मी सगळे तसेही मला वैताग आलाय आता हे नाटक करून तूच सांग कुठून सुरवात करू?

देवयानी - हर्षद का मस्ती करतोयस? का असे वागतोय? काय झालंय? माझे काही चुकलय का? असं नको वागू तू. तुझ्याशिवाय कोणी नाहीय माझे ह्या जगात. एक क्षितिजा होती. ती पण असे वागली. आता तू तरी असं नको बोलुस. कसले नाटक रे...

हर्षद एक कानाखाली मारून देवयानीला सोफ्यावर ढकलून देतो.
हर्षद - हे बघ तिथेच पडून रहा. आता तू विषय काढलाच आहेस तर मी तिथूनच सूरवात करतो. काय ती साली क्षितिजा. तुझ्यावर खूप जीव ओवाळून टाकत होती हा ती. बघावं तेव्हा मधे मधे. तिला पण घेणार होतो पण ती साली फसली नसती. ह्या चूतीयाला पण तूच हवी होतीस. तुझे ते रीसोर्टवर फोटो वैगरे मीच काढले होते आणि आरोप त्या तूझ्या मैत्रिणी वर केले. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते तुला पटवून दिलं आणि तू त्याची पडताळणी पण केली नाहीस. नंतर ते लग्न ते खोटं होत बरं. हे सगळे तूझ्या आईला कसे समजल माहित नाही म्हणून त्या क्षितिजाला तिने घरी बोलवलं होत हे सांगायला नेमक मी अगोदर पोहचलो आणि संपवलं. चुकून तू गरोदर राहिलीस आणि मला ह्या सगळ्यात अजून एक प्रॉब्लेम वाढवायचा नव्हता म्हणून मग झक मारून तुझे गरोदरपण सांभाळावं लागलं. आता तुला समजलच असेल की मी अजून काय काय केलंय ते. ह्यात मला कोणाची सोबत आहे हे सांगायची गरज नाहीय तुला आणि जर नसेल समजल तर तो आला की समजेल आणि सांगेल की आम्ही हे का केलंय ते. आता तू तुझे रडगाण थांबावं आणि मला जरा आराम करू दे. खूप थकलोय मी ह्या सगळ्यात. तो चुतीया येईल तर त्याला तेवढं काय हवे नको बघ आणि रडू ओरडू नकोस.

एक तासाने दरवाजा वाजतो......

देवयानी दरवाजा उघडते. दरवाज्या बाहेर असलेल्या व्यक्तीला पाहून देवयानीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. खरचं आपण जगात वावरताना एखाद्या व्यक्तीवर किती पटकन विश्वास ठेवून जातो ना. देवयानी विचारात असताना ती व्यक्ती देवयानीला बाजूला करून घरात येते. तो देवयानी आणि हर्षदच्या ऑफिसचा बॉस निलेश असतो. निलेश घरात येतो आणि दरवाजा बंद करतो. तो देवयानीवर शारीरिक जबरदस्ती करतो. देवयानी बरोबर ह्या सगळ्या गोष्टी सगळे प्रसंग एवढ्या वेगाने आणि अनपेक्षित होत असतात की ना तिला विचार करायला वेळ असतो. ना काही पाऊल उचलायला. देवयानी आता पुर्णतः मनातून तुटलेली असते. आपल्या सोबत नियतीने हा काय खेळ मांडलाय की आपण स्वतः हून चुकलो. तिला काहीच कळत नसत. रोज तिच्यासोबत शारीरिक छळ आणि जबरदस्ती होत असते. काही दिवसांनी एक बाई तिला भेटायला येते. दिसायला सुंदर लोभस आणि शरीराने, चेहऱ्याने कोणालाही आपल्याकडे आकर्षित करेल असा तिचा पूर्ण पेहराव असतो. मोठ्या घरातली आणि सरळ मार्गी वाटेल अशी संस्कारी दिसणारी ही स्त्री आपल्याला भेटायला का आली असेल? ह्याचा काहीच तर्क देवयानीला लागत नसतो. तेवढ्यात हर्षद येतो आणि काहीश्या सांकेतिक भाषेत तिच्या सोबत बोलतो. ती त्याच्या हातात काही पैसे देते आणि देवयानीला सोबत घेऊन जाते.


  ( आपण ज्या जगात वावरतोय. त्याच्या अनेक बाजू आहेत. काहींनी चांगली बाजू बघितली आहे. काहींनी वाईट तर काहींनी दोन्ही फक्त चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही बाजू सोडल्या तर एक दुसरे जग आहे. रात्रीच जग जे दिवसा एका साळसूद आणि चांगुलपणाच्या मुखवट्यात असत. पण त्याचा खरा चेहरा हा आपल्याला कधीच दिसून येत नाही. अनेकदा आपण माणसं ओळखायला चुकतो आणि मग त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. ज्याची आपण कल्पना सुध्दा केलेली नसते असे काही तरी घडून जाते आणि नंतर आपल्याला त्यातून सुटण्याचा मार्ग तर मिळत नाही पण आपण त्यात अजून अडकत जातो. जरी पैसे देऊन रेड लाईट भागात जाणारे शरीराची भूक भागवणारे पुरुष असले तरी काही वेळेस त्याची तस्करी करणाऱ्या बायका असतात. काही ह्यात स्वतःहून जातात तर काहींना ह्यात आणलं जातं.)

  देवयानी सोबत सुद्धा असच काहीस घडल. हर्षदने प्रेमाचं नाटक करून देवयानीला एवढ्या मोठ्या जाळ्यात फसवल होत की आता त्यातून बाहेर पडायचा मार्ग तिला माहीतच नव्हता. देवयानीला त्या बाईने दिल्लीला नेऊन कॉल गर्ल म्हणून ठेवलं होतं. देवयानी आता ह्यातून बाहेर निघू शकत नव्हती. देवयानीला घेऊन आलेली ती बाई सुशिक्षित होती. हर्षद ने सुध्दा नीलेशच्या मदतीने खूप विचारपूर्वक देवयानीला फसवल होत आणि फक्त तीच नाही तर अश्या खूप मुली तिथे होत्या. देवयानीला आता रोज कॉल गर्ल म्हणून पाठवलं जात होत. देवयानी कडून येणारे पैसे अर्धे मुंबईला पाठवले जायचे. देवयानी रोज एकच विचार करत होती की ह्यातून बाहेर कसे पडता येईल. पण ह्या सगळ्यांची एवढी भक्कम टोळी होती की त्यातून सहज बाहेर पडण कोणालाच शक्य नव्हत. देवयानी सोबत होणाऱ्या रोजच्या त्या गोष्टीने ती आता शारीरिक दृष्ट्या खूप खचून गेली होती. ती रोज आईच्या आठवणीने रडायची. आज देवयानीचा वाढदिवस होता. पण कसला वाढदिवस आणि कसले काय. रोज त्या शारीरिक सुखासाठी हापापलेल्या त्या लांडग्यांच्या स्वाधीन तिला केलं जात होत. आज देवयानीला एका मोठ्या बिल्डरकडे पाठवलं जातं. त्याच्या गाडीतून जात असताना देवयानी क्षितिजा सोबतचा आणि आई सोबतचा आपला शेवटचा वाढदिवस आठवत असते. क्षितिजाने किती छान वाढदिवस साजरा केला होता तेव्हा तिने नेहमी मला मनापासून तीच मानलं होत. मीच तिच्यासोबत वाईट वागले. ती कुठे असेल? काय करत असेल? ती पण ह्या सगळ्यात फसली नसेल ना.? असे विचार करत असताना अचानक एका लॉज जवळ येऊन गाडी थांबते. गाडीतून उतरून देवयानीला कोणत्या रूमवर जायचं ह्या सगळ्याची माहिती दिलेली असते. देवयानी ची वाढदिवसाची रात्र त्या लांडग्यांच्या स्वाधीन असते. त्याला हवे तसे आणि त्याची आग शांत झाल्यावर तो देवयानीला पैसे देऊन तिथून निघून जायला सांगतो. देवयानी तिथून निघून हॉटेल समोरच्या बस स्टॉपवर येऊन थांबते. एवढ्या रात्री बस तर मिळणार नाही. म्हणून ती रिक्षाची वाट बघत थांबलेली असते. काही वेळाने तिला रिक्षा मिळते. पण त्यात अगोदरच एक बाई बसलेली असते. "एवढ्या उशिरा तुला दुसरी रिक्षा मिळणार नाही पोरी. बस तुला कुठे जायचं आहे. एकत्र जाऊ." 

  देवयानी सुध्या एवढ्या रात्री कोणती रिक्षा मिळणार नाही ह्या विचाराने तीच रिक्षा पकडते. देवयानी ने खूप वेळा पळून जायचं प्रयत्न सुध्दा केलेला असतो पण ती नेहमी अपयशी होते आणि अजून काही भोगावं लागते. म्हणून आज पळून जायचं विचार मनात येऊन सुध्दा ती असं काही पाऊल उचलत नाही. 

  देवयानी काही बोलत नाही म्हणून रिक्षात ती बाईच बोलायला सुरुवात करते. " काय पोरी. कसे आहे ना आपल आयुष्य तुमच्याकडे पूर्ण बाईपण आहे म्हणून पुरुष येतात आणि आमच्याकडे अर्ध बाईपण आहे म्हणून नजरा ठेवतात. नको पोरी हे असे आयुष्य पुन्हा नको."

  देवयानी काहीच बोलत नाही. तिला त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत की त्या तृतीयपंथी आहेत. काही वेळाने देवयानी राहत असलेले ठिकाणी तिला सोडून रिक्षा पुढे निघून जाते. आज देवयानीला क्षितिजाची खूप आठवण येत असते. तशीच ती झोपून जाते.




क्षितिजा.....क्षितिजा बँगलोरमध्ये कामासाठी असते. खूप प्रयत्न करून आणि खूप धक्के सहन करून ती पुन्हा कामाला लागलेली असते. म्हणून ती कायमच सगळे सोडून नवीन आयुष्य सुरुवात करते. ह्या सगळ्यात तिने स्वतःच हसणं, बोलणं गमावलेले असते. आज तिला सुध्दा देव्यानीची खूप आठवण येत असते. पण आता आपण तिच्या समोर कधीच जाणार नाही असे तिने ठरवलेलं असते.ती सुखी आहे एवढ्याच विचारात क्षितिजा जगत असते. दरम्यान ती देवयानीच्या आठवणीने रोज काही तरी लिहत असते. घरात दोघींच्या फोटोज् ची फ्रेम लावलेली असते. देवयानी सुखात राहावी म्हणून नेहमी प्रार्थना करत असते. पण आज तिला सगळ्या गोष्टी आठवून वेड लागायची वेळ येते. 

" आज असं का होतंय मला? मी काय करू हे सगळे विसरण्यासाठी. मी नाही विसरले तर मी वेडी होईन. जाऊन येऊ का एकदा मुंबईला. काय करू यार? तेवढ्यात तिला मेल येतो. तिला कामानिमित्त मुंबईला जावं लागतंय. मेल वाचून एकच विचार करत असते. एकदा फक्त लांबून का होईना देवयानी दिसावी. अजून काही नकोस किती वर्ष झाली तिला पाहिलं नाहीय. तिला माझी आठवण पण येत नसेल का? ती मुंबईला निघायची तयारी करते. दुसऱ्या दिवशी क्षितिजा मुंबईसाठी निघते. मुंबईला पोहचल्यावर हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन ती पुन्हा ऑफिसच्या कामाला लागते. सलग दोन दिवस ऑफिसच्या कामातून निवांत वेळ मिळाल्यावर ती मुंबईला त्या तृतीपंथीच्या संस्थेत जाते. खूप दिवसांनी क्षितिजाला बघितल्यावर तिथे सगळे खुश होतात. क्षितिजासाठी चहापाणी सांगून सगळे तिच्यासोबत गप्पा मारत बसतात. गप्पांच्या ओघात देवयानीचा विषय निघतो. क्षितिजाला खूप भरून येत पण ती तिच्या डोळ्यातलं पाणी लपवते. नंतर गप्पा आणि चहापाणी झाल्यावर सगळे आपापल्या कामाला लागतात. क्षितिजा आणि पन्ना दोघीच असतात आता. त्या क्षितिजाला विचारतात... क्यूँ बेटा. क्या बात है। छिपा मत मेरे से.. मैंने देखा वो लड़की के बारे में बात निकलते ही तेरा मुंह उतर जाता हैं। क्यों आँख में पानी आया तेरे। क्या बात हैं?


क्षितिजा दरम्यान घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगते. ती रडत रडत सगळे सांगत असते. आज खूप वर्षानंतर ती कोणासमोर तरी मन हलकं करत असते. पन्ना सगळे नीट ऐकत असतात. पण हैं? कुछ समझता हैं क्या वो लेकिन एक बात बता बेटा। तूने उसको बताया क्यूं नहीं की तू उससे इतना प्यार करती हैं वो। 



To Be Continued....