कॉल गर्ल- भाग १९

To Be Continued...


क्षितिजा लगेच बॅग भरते आणि निघते. मुंबई ते दिल्ली प्रवास तिच्यासाठी एखाद्या संघर्षा सारखा असतो आज. तो संपवून तिला देवयानीला भेटायची संधी मिळणार असते. तिने तिच्या आठवणीत, ती एकदा भेटेल ह्याच आशेने एक एक क्षण घालवलेला असतो. तिने त्यांनी सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना तिच्या हृदयाच्या तिजोरीत अगदी बंधिस्त करून ठेवलेलं असत. आज देवयानी भेटणार ह्या बातमीने ती खूप भावूक झालेली असते .

दिल की शाखों पे
गुल आने लगे
फिर हसीन ख्वाब
जगमगाने लगे

आज फीर ज़मीन
चाँद सी हो गई
होश में आज मैं
बेहोश शामील हुई

रोज़ शामो-ओ-शेहर
गाने लगे
फिर हसीन खाब
कुछ जगमगाने लगे

दिल की शाखों पे
दिल की शाखों पे
दिल की शाखों पे
गुल आने लगे....


आज पर्यंत चालू असलेल्या भागांमध्ये आपण बघितलं की कश्या प्रकारे क्षितिजा आणि देवयानीची मैत्री झाली. दोघींचा संघर्ष देवयानी च लग्न, तिच्या आयुष्यात आलेलं एक वळण, ज्याच्यासोबत सात जन्माची गाठ बांधली त्याने तिचं आयुष्य कसे खराब केलं ते. त्या नंतर तिला खरचं एक कॉल गर्ल म्हणून कसं आयुष्य जगावं लागलं आता पर्यंत ते.

क्षितिजा कसं देवयानीच्या प्रेमात पडते. पण सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात घडतात आणि तिला देवयानी पासून मनात नसतानाही लांब जावं लागत. परिस्थीत तशी निर्माण होते की दोघी एकमेकींपासून लांब जातात. देवयानीला बाहेर काढण्यासाठी क्षितिजाची चालू असलेली तळमळ आपण बघतोच आहे. त्यात तिला पन्ना ची आणि रेशमची मिळणारी साथ खरचं लाखमोलाची आहे. आता अखेर देवयानी आणि क्षितिजा ची भेट होणार आहे तर पुढे काय होतंय. जसं क्षितिजा देवयानीला भेटण्यासाठी आतुर आहे. तसचं देवयानी कडून रिस्पॉन्स मिळतोय का तिला ते पाहूया.


To Be Continued...



क्षितिजा दिल्लीला पोहचते. दरम्यान रेशमने हॉस्पिटलचा पत्ता तिला पाठवलेला असतो. क्षितिजा हॉस्पिटलमध्ये पोहचते. रेशमने सगळे व्यवस्थित पाठवलेलं असत त्यामुळे तिला जास्त शोधाशोध करायची गरज लागत नाही. ती देवयानी ॲडमिट असलेल्या वॉर्ड जवळ पोहचते. आज इतक्या वर्षांनी देवयानीला भेटणार म्हणून ती जेवढी आतुर असते. तेवढीच घाबरलेली असते. देवयानी तिला स्वीकारेल की नाही. तिच्या मनातील राग गेला असेल की नाही. कशी असेल ती. इथे का ठेवलं असेल...? पण ह्या सगळ्यांची उत्तर तिला सामोरं गेल्यावरच मिळणार होती. क्षितिजा ने आपले पाणावलेले डोळे पुसले आणि अश्रूंना काही काळासाठी तसचं थोपवून धरले. रेशम वॉर्डच्या बाहेर येऊन क्षितिजाला देवयानीच्या बेडजवळ घेऊन जाते.


देवयानीला बघताच तिला घट्ट मिठी मारायची इच्छा क्षितिजाला होत असते पण तिचा नाईलाज असतो. कारण देवयानीच्या एका हाताला सलाईन असते. अगोदरची देवयानी आणि ही देवयानी दोघींमध्ये खूप फरक असतो. हिचा चेहरा कोमेजलेला असतो. तब्येत खालावली असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आलेली असतात. ओठ सुकलेले असतात. क्षितिजा स्वतःला सावरुन तिच्या बेडजवळ जाते आणि तिचा एक हात अलगद स्वतःच्या हातात घेते. हलकेच क्षितिजाच्या डोळ्यातून एक अश्रू तरळतो आणि देवयानीच्या हातावर पडतो. देवयानी थोडी फार शुध्दीवर येते. ती लुकलुकत आपले डोळे उघडायचा पर्यंत करते. तिला समोर क्षितिजा चा पुसटशा चेहरा दिसतो. काही काळ आपण स्वप्न तर पाहत नाहीय ना ह्या भावनेने ती पूर्णपणे डोळे उघडते. इतक्या वर्षांनी समोर क्षितिजाला पाहून तिचा सुद्धा बांधा सुटतो. ती क्षितिजाच्या हातावर आपली पकड घट्ट करते आणि तिचा हात छातीजवळ घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून देते. बराच वेळ दोघी रडत होत्या. इतक्या दिवसांनी देवयानी भेटली म्हणून क्षितिजा सुद्धा मनोमन सुखावली होती पण देवयानी इथे का आहे. तिला काय झालंय ह्याची कल्पना तिला नव्हती म्हणून ती थोडी काळजीत होती. काही वेळात दोघी शांत होतात. क्षितिजा देवयानीच्या डोक्यावरून हात फिरवते. इतक्या वर्षांनी झालेल्या मायेच्या स्पर्शाने देवयानी सुखावते आपसूक तिचे डोळे बंद होतात. क्षितिजा तिला सांगते की तू जरा झोप मी डॉक्टरांशी बोलून येते. मग आपण बोलू. देवयानी सुद्धा मानेने होकार देते.


क्षितिजा व रेशम डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. रेशमला डॉक्टरांनी अगोदर कल्पना दिलेली असते. ते त्या दोघींना बसायला सांगतात आणि देवयानीचे रिपोर्ट्स मागवतात.


हे बघा रेशम. मी तुम्हाला अगोदर कल्पना दिली होती की ह्यांना ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो आणि रिपोर्ट्स वरून सुद्धा तेच निदान होतंय. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करून ह्यांच्या ब्रेस्ट काढाव्या लागतील. थोड लवकर कळलं असत तर निदान काही करता आले असत पण आता ब्रेस्ट काढण्याशिवाय काही पर्याय नाहीय. त्या नंतर सुद्धा ह्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांचं काम तर असंही त्यांना बंद करावं लागेल पण बाकी वेळेवर औषध आणि चेकअप करता यावे लागेल.


रेशम आता क्षितिजाच्या उत्तराची वाट पाहत असते.
क्षितिजा स्वतःला सावरते आणि बोलू लागते.
रेशम मला एकदा देवयानीला हे सगळे सांगावं लागेल. अर्थात तिचं ऑपरेशन आहे तर तिला ह्याची कल्पना द्यावी लागेल. त्या नंतरच आपण पुढचं पाऊल उचलू शकतो. डॉक्टर मला आजच्या दिवसाचा वेळ द्या. आपण उद्या ऑपरेशन बद्दल बोलू.

दोघी डॉक्टरांची परवानगी घेऊन तिथून निघतात. क्षितिजा पुन्हा देवयानी जवळ येते.


क्षितिजा देवयानी झोपली आहे, तो पर्यंत आपण कॉफी पिऊन येऊया का? तुला ही थोड बरं वाटेल आणि आपल्याला उद्याच बोलता येईल.....क्षितिजाला सुद्धा कॉफीची गरज असते. ती रेशम सोबत कॅन्टीनमध्ये जाते.


क्षितिजा एकटीच विचार करत टेबल वर बसलेली असते. रेशम दोघींसाठी कॉफी घेऊन येते. क्षितिजा तरी सुद्धा तिच्याच विचारात असते. रेशम, क्षितिजाच्या हातावर हात ठेवते. तिच्या स्पर्शाने क्षितिजा भानावर येते.


तुझी परिस्थिती समजते आहे मला क्षितिजा पण सध्या तू खचून जावून चालणार नाही. तू खंबीर रहा आणि देवयानीला समजावं. तिला ऑपरेशन करता लवकरात लवकर तयार करणं गरजेचं आहे. त्या नंतर सुद्धा तिला तुझ्या आधाराची गरज लागणार आहे. तूच अशी खचून गेलीस तर तिला कोण आधार देणारं. आता तिचं असं कोणी नाहीय तुझ्याशिवाय आणि तुझ्या प्रेमाखातर तरी तुला खंबीर व्हावं लागेल....


"रेशम, तू म्हणतेस ते सगळे मला पटत आहे ग पण आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो. मी तिला असे नाही पाहू शकत. माझे खरचं खूप प्रेम आहे तिच्यावर. तिच्या सुखासाठी नेहमी मी हात जोडले. तिचं आयुष्य असं वाया गेलेलं मला नाही सहन होणार."


"तिचं आयुष्य का वाया जाईल. आता तू आहेस ना तिच्यासोबत. तिची काळजी घ्यायला, तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढायला. तिला आयुष्यभर सोबत द्यायला, सावरायला, सांभाळायला. मग का टेन्शन घेत आहेस. तुम्ही पुन्हा एकत्र आला आहात हेच खूप आहे. राहिला प्रश्न तिच्या अस असण्याचा आता ज्या गोष्टी होणार आहेत. त्या तर आपण नाही ना थांबवू शकत. आता कॉफी पी. स्वतःला सावर आणि देवयानी सोबत कसं बोलणार आहेस. ह्याचा विचार कर.
बरं ऐक क्षितिजा. तू कॉफी संपवून देवयानी जवळ जा. मी जरा बाहेर जाऊन येते"

कॉफी संपवून क्षितिजा देवयानी जवळ जाते. देवयानीला नुकतीच जाग आलेली असते.


" देवयानी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे."
...क्षितिजा.


"मला सुद्धा तुझ्याशी खुप काही बोलायचं आहे. रडायचं आहे, भांडायच आहे, माफी मागायची आहे पण इथे नाही घरी गेल्यावर. मला आता बरं वाटत आहे. तू डॉक्टरांना सांग आणि डिस्चार्ज घे. आपण घरी जाऊया."
....देवयानी


" अगोदर माझे ऐकून घे बाळा. आपण घरी जाऊ पण तुला पूर्ण बरं वाटलं की मगच अजून तुला पूर्ण बरं वाटलं नाहीय. मलाही सुद्धा खूप काही बोलायचं आहे तुझ्यासोबत पण सध्या तुझं लवकरात लवकर बरं होण जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी. मी काय बोलते ते नीट ऐक. तुला बेशुद्ध अवस्थेत जेव्हा रेशमने इथे आणल, तेव्हा तुझ्या काही टेस्ट झाल्या होत्या. ज्याचे रिपोर्ट्स आल्यानंतरच तुला काय झालंय हे कळणार होत. तुझ्या रिपोर्ट्स प्रमाणे तुला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि तुझी ब्रेस्ट ऑपरेशन करून काढून टाकावी लागेल. तरच तुझ्या जीवाचा धोका टळेल. पण ह्या साठी तुझी परवानगी, तू हो म्हण गरजेचं आहे. बाकी जे काही असेल त्यासाठी मी आहे. "
देवयानीला सगळे सांगून झाल्यावर क्षितिजा शांत होते.


" तुला एक सांगू क्षितिजा. जे माझ्यासोबत घडतं होत किंवा जे काम मी करत होते. त्याने असे काही तरी घडणार ह्याची मला थोडी चाहूल लागली होती. खरं तर मला असे वाटत होत की असं काहीतरी व्हावं म्हणजे मी सुटेन ह्या सगळ्यातून. एकदाचा जीव गेला की सगळ्यातून सुटका होईल. पण जेव्हा शुध्दीवर आले आणि तुला पहिलं ना तर पुन्हा आयुष्य जगण्याची इच्छा निर्माण झाली आहे. मला माहित आहे ऑपरेशन सोप नाहीय. पण तू काळजी नको करुस. डॉक्टरांना हो सांग. मला ठणठणीत बरं व्ह्याचं आहे. तुझ्यासोबत जगायचं आहे. "
.....देवयानी


देवयानीच्या अश्या बोलण्याने क्षितिजा भावूक होते. ती नकळत देवयानीच्या कपाळावर आपले ओठ टेकवते. देवयानी सुद्धा तिला काही बोलत नाही. तिच्या स्पर्शातून तिची काळजी स्पष्ट जाणवत असते.
काही वेळाने क्षितिजा डॉक्टरांनकडे जाते आणि ऑपरेशन करता होकार कळवते. दुसऱ्याच दिवशी देवयानीच ऑपरेशन असत. देवयानी जरी खंबीर असली तरी क्षितिजाला तिची काळजी वाटतं असते. तिच्या शरीरातील एक भाग काढून टाकला जाणार असतो. क्षितिजा खूप काळजीत असते. तो दिवस कसा निघून जातो त्यांना कळत नाही.


दुसऱ्या दिवशीची सकाळ होते. साधारण ११ ला देवयानीच ऑपरेशन असत. सकाळचे १० वाजलेले असतात. क्षितिजा देवयानी जवळ बसून तिला एकटक बघत असते.


" असं काय बघतेस? येणार आहे मी परत तुझ्यासाठी. नको रडूस. मला काही होणार नाही तू असताना. "
....देवयानी


" क्षितिजा देवयानीचा हात हातात घेते आणि काहीच न बोलता तिच्याकडे बघत बसते."


काही वेळाने डॉक्टर येतात आणि देवयानीला ऑपरेशन करता घेऊन जातात. क्षितिजा बाहेर बसलेली असते. आता रेशम सुद्धा आलेली असते.

काही वेळाने एक नर्स अचानक ऑपरेशन थिएटर मधून पळत बाहेर येते. ती काहीतरी घेऊन आत जाते. पुन्हा काही वेळाने दुसरे डॉक्टर येतात. अचानक सुरू झालेल्या धावपळीने क्षितिजा गोंधळून जाते. नेमक काय झालं आहे तिच्या लक्षात येत नाही. काही वेळात देवयानीच ऑपरेशन करणारे सीनिअर डॉक्टर बाहेर येतात. क्षितिजा त्यांना बघून उठून उभी राहते.


" खरं तर ऑपरेशन खूप छान चालू होत पण अचानक पेशंटने रिस्पॉन्स करायचं बंद केलं. आम्ही खूप प्रयत्न केले पण कोणत्याच प्रयत्नांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सॉरी पण तुमचा पेशंट कोमामध्ये गेला आहे. त्यामुळे आता सगळे देवाच्या हातात आहे आम्ही काहीच सांगू शकत नाही."
डॉक्टर तिथून निघून जातात.


क्षितिजा धाडकन खाली कोसळते. तिच्या अंगाला घाम फुटलेला असतो. तिचं रडणं चालू असत पण घशातून आवाज फुटत नसतो. मी तुझ्यासाठी येईन बोलणारी देवयानी अशी अचानक. ह्या गोष्टीवर तिचं विश्वास बसत नाही.


To Be Continued....







🎭 Series Post

View all