कॉल गर्ल- भाग १८

To Be Continued...


दोघी कामाला सुरुवात करतात. पहिलाच दिवस असल्यामुळे खूप जास्त काम असत. दोघी मन लावून काम करत असतात. चेकअप अनिवार्य असल्यामुळे आणि पन्नानी सगळ्यांना सक्त ताकीद दिल्याने पहिल्याच दिवशी सुद्धा खूप रांग लागलेली असते.....


                   बघता बघता सहज कामाच्या व्यापात एक आठवडा असाच निघून जातो. रेशम आणि क्षितिजा मन लावून काम करत असतात. जसे दिवस पुढे जात असतात तसेच त्यांची मैत्री सुद्धा खुलत असते. त्यांना कामातून जसा वेळ मिळेल तसे त्या दोघी काही ना काही विषयावर गप्पा मारत बसतात.

                एक दिवस असच गप्पा मारता मारता रेशम देवयानीचा विषय क्षितिजा जवळ काढते.
                क्षितिजा तू मला सांगितल नाहीस कधी देवयानी बद्दल मला तर पन्ना कडून समजल सगळे ते ही मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं.
                 " काय सांगू तुला रेशम..."

                   " ती माझ्या आयुष्याचा एक असा भाग आहे जो मी खूप जपून ठेवलाय. ती माझा जीव आहे. तिच्यासाठी ज्या भावना आहेत त्या मी कधीच कोणासमोर व्यक्त नाही करू शकत. माझ्या दिवसाची सुरवात, दिवसाचा शेवट आणि दिवसभरातील तिची आठवण सगळे काही तिचं आहे. मी माझे तिच्यावरच प्रेम ना कधी तिला सांगू शकत. ना कोणासमोर व्यक्त करू शकत. पण ती कुठे आहे ते एकदा कळाव, एवढीच इच्छा आहे."


                 " क्षितिजा, मी तुझ्यासाठी शोधेन देवयानीला तसे प्रयत्न सुद्धा मी सुरू केले आहेत पण मला तुला एक सांगायचं होत. माहित नाही तू आता ह्याचा काही अर्थ घेशील किंवा चुकीचं समजशील मला पण तरी सांगते. तू किती दिवस आणि किती अडकून राहणार आहेस ह्या सगळ्यात, तुला तुझे आयुष्य आहे तू बाहेर निघ आता ह्या सगळ्यातून आणि तुझी जोडीदार शोध." रेशम क्षितिजाला समजावत असते.


                " मी प्रयत्न केला पण जी जागा तिची आहे ती कोणीही घेऊ शकत नाही. मला तिच्यासाठी कितीही थांबावं लागलं तरी चालेल मी थांबायला तयार आहे. मला विश्वास आहे की एक ना एक दिवस आम्ही एकत्र येऊ. तिच्या मनातल्या माझ्यासाठी ज्या भावना कदाचित बदल्या असतील. तिचा राग कमी झाला असेल. फक्त एकदा कळुदे ती कुठे आहे ते. फक्त एकदा..."  क्षितिजा देवयानीच्या आठवणीत रडायला लागते.


                   रेशम तिला आधार द्यायचा, शांत करायचा प्रयत्न करत असते. क्षितिजा काही वेळाने शांत होते. दोघी पुन्हा गप्पा मारायला लागतात. तेवढ्यात रेशमचा फोन वाजतो.

                 "  क्षितिजा, फक्त दोन मिनिट हा. मी आलेच ऑफिसमधून फोन आहे."


                   " हॅलो. हा बोल सौरभ. काय झालं? मी तुला जो फोटो पाठवला होता, त्या बद्दल काही माहिती मिळाली का?"


                    " अग हो हो. तू मला काम सांगितलं आहेस आणि ते होणार नाही असे शक्य आहे का? बरं मला एक सांग ती मुलगी आहे कोण? म्हणजे मला जी माहिती मिळाली आहे. त्यातून असे समजल की ती कॉल गर्ल आहे म्हणून, तुझी कोणी मैत्रीण वैगरे आहे का? "



                        " तसचं काही समज सौरभ पण तिची पूर्ण माहिती  मिळव आणि मला सांग. ती कुठे आहे? सध्या काय करतेय? कुठे भेटेल ते सगळे माहित कर. लवकरात लवकर सांग. तू हे काम करू शकतोस म्हणून तुला बोलले आहे मी."


                        " बरं. ठीक आहे . मला अजून थोडा वेळ दे. मी तुला पक्की माहिती देतो. चल बाय." सौरभ फोन ठेवतो.


                         रेशम पुन्हा क्षितिजाला जवळ येते. " सॉरी क्षितिजा, जरा महत्वाचा फोन होता. तू चहा वैगरे काही घेणार का? मला कंटाळा आला आहे. थोड रिलॅक्स होऊया. चहा घेऊया. मी फ्रेश होऊन येते." रेशम फ्रेश होण्यासाठी जाते.

                             दोघी मस्त चहा घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. तेवढ्यात पुन्हा रेशमचा फोन वाजतो. क्षितिजा, सॉरी मी जरा आलेच.


                        " हॅलो. हा बोल. काही समजलं का?"


                          " हो समजलं पण तुला अर्जंट इथे यावे लागेल. जेवढं लवकर जमेल तेवढ्या लवकर तू इथे ये.मी एक पत्ता पाठवतो त्यावर पोहच. बाकी सगळे तुला इथे आल्यावर सांगतो मी. चल ठेवतो फोन."


                             रेशम धावत आत जाते. ऐक ना क्षितिजा, मला अर्जंट आता दिल्लीला जावे लागत आहे. मी लगेच निघते. पन्ना ला कळवते मी. तू तुझी काळजी घे. 

                            " अग रेशम पण एवढ्या अर्जंट झालं तरी काय? मी येऊ जा तुझ्यासोबत. "


                          " नको मी जाते. गरज लागली तर तुला नक्की बोलवेन. आता मला निघायला हवे." रेशम बॅग घेऊन धावतच निघते.


                           रेशम दिल्लीला पोहचते. सौरभने पाठवलेल्या पत्त्यावर ती पोहचते. सौरभ बाहेर तिची वाट बघत उभा असतो.

                            " हाय रेशम . इथून तिसरी खोली तिची आहे. तू जा मी असे येणं योग्य नाही दिसणार. काही वाटलं तर मला फोन कर. मी इथेच उभा आहे."


                            रेशम खोलीच्या बाहेर जाऊन दार वाजवते. दार उघडच असते. ती दार ढकलून आत वाकून बघते. पलंगावर एक स्त्री झोपलेली असते. ती आवाज देते तरी ती उठत नाही म्हणून रेशम आतमध्ये जाते. ती आत जाऊन तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करते पण तरी ती उठत नाही. रेशमच्या लक्षात येत की काहीतरी प्रोब्लेम झाला आहे. ती तिला सरळ करून चेक करते. ती बेशुद्ध आहे हे लक्षात येताच. ती सौरभला सांगून तिला दवाखान्यात घेऊन जाते. तिला दवाखान्यात ॲडमिट करून घेतले जाते. काही प्राथमिक तपासण्या केल्या नंतर रिपोर्ट्स येईपर्यंत त्यांना तिथेच थांबायला सांगतात.

                           रेशम बाहेर येऊन थांबते. ती स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेली असते. तेवढ्यात सौरभ तिच्यासाठी पाणी घेऊन येतो.
                           "मॅडम, हे घ्या पाणी. आता तरी सांगणार आहात का? हा सगळा खटाटोप कशासाठी आणि कोणासाठी चालू आहे ते. कोण आहे ती मुलगी? काय चालंय तुझे."

                            " सौरभ प्लीज आता नको ना. वेळ आली की तुला सगळे सांगेन मी. मलाच कळत नाहीय, मी हे सगळे का करतेय ते. तुला काय सांगू. फक्त रिपोर्ट्स येईपर्यंत थांब. मी सगळे सांगेन तुला."


                         काही वेळ असाचं शांततेत निघून जातो. दोघेही एकमेकांसोबत काहीच बोलत नाहीत. दरम्यान क्षितीजाचे, रेशमला पन्नास फोन येऊन जातात. ती तिचा एकही फोन उचलत नाही.

                     क्षितिजा सुद्धा काळजीत असते. अशी काय ही, अचानक निघून गेली तर गेली. पण आता एकही फोन उचलत नाहीय माझा. काय झालं? का गेली? काहीच कळायला मार्ग नाहीय. मी येऊ सोबत विचारलं तर तेही नको बोलली. खुप बेचैन वाटत आहे आज.....



                             काही वेळाने डॉक्टर रिपोर्ट घेऊन येतात.
                             " रेशम मॅडम तुम्ही ज्या पेशंटला आणलं आहे. कदाचित तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आता ह्या रिपोर्ट्स वरून कन्फर्म नाही करता येणार. अजून काही टेस्ट कराव्या लागतील. ती काही वेळात शुद्धीवर येईल. ती अशक्तपणामुळे चक्कर येऊन बेशुद्ध झाली असेल. त्याचा आणि बेशुद्ध होण्याचा काही संबंध नाहीय. पण टेस्ट कराव्या लागतील."
                           
                        

                        " ठीक आहे डॉक्टर. तुम्ही सगळ्या टेस्ट करा. मी थांबते इथेच ती शुध्दीवर येईपर्यंत. थँक्यू सो मच डॉक्टर." रेशम हात जोडून डॉक्टरांचे आभार मानते.


                             डॉक्टर निघून गेल्यावर, सौरभ पुन्हा रेशमला प्रश्न विचारायला लागतो. " सौरभ थांब. सांगते मी सगळे. तिचं नाव देवयानी आहे. ती माझी कोणीही लागत नाही पण क्षितीजासाठी ती तिचा श्वास आहे. तिचं सर्वस्व आहे. माहित नाही कसे, काय ते पण त्या दोघींची भेट घडवून आणून देण्याचं काम देवाने मला सोपवल असेल. तेच मी पूर्ण करतेय. मिळाली तुझ्या प्रश्नांची उत्तर आता गप तिथे कोपऱ्यात जाऊन उभा रहा. मी क्षितिजाला फोन करते."  सौरभ शांतपणे एका बाजूला जाऊन उभा राहतो.

         .                रेशम, क्षितिजाला फोन लावते. एका रिंगमध्ये क्षितिजा फोन उचलते. " काय हे रेशम , मला तुझे हे असे वागणं अजिबात आवडलं नाहीय. अग तू गेलीस ठीक आहे पण माझा एक फोन तरी उचल ना. सांग तरी ठीक आहेस किंवा काय झालंय ते. मी काळजीत होते खूप. त्यात मला आज खूप बेचैन वाटतं होत म्हणून तुला कॉल केला तर तू . जाऊदे बोल आता वेळ मिळाला तुला."


                           " क्षितिजा पहिला तर खरचं खूप सॉरी आणि तुला खूप मोठी आणि आनंदाची बातमी द्यायची आहे. नीट ऐक. तुला जेवढ्या लवकर जमले तेवढ्या लवकर तू इथे निघून ये. तुझी देवयानी मला सापडली आहे."


                              काहीवेळ क्षितिजाच्या इथून काहीच आवाज येत नाही. " हॅलो क्षितिजा. ठीक आहेस ना. काहीतरी बोल अग. काय झालंय? तुला नाही आवडलं का मी असे केलेलं. प्लीज अग बोल मला खूप टेन्शन आले आहे."


                       क्षितिजा स्वतःला सावरत, डोळे पुसत, जड आवाजात. रेशमला थँक्यू बोलते. " थँक्यू रेशम. मी तुझे कसे आभार मानू. मला खरचं कळत नाहीय. मी लगेच निघते. खरचं मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन."

                        " थँक्यू वैगरे नंतर बघू. अगोदर तू इथे ये. तुझे इथे असणं गरजेचं आहे. चल बाय. लवकर ये. नीट ये."


                                 क्षितिजा लगेच बॅग भरते आणि निघते. मुंबई ते दिल्ली प्रवास तिच्यासाठी एखाद्या संघर्षा सारखा असतो आज. तो संपवून तिला देवयानीला भेटायची संधी मिळणार असते. तिने तिच्या आठवणीत, ती एकदा भेटेल ह्याच आशेने एक एक क्षण घालवलेला असतो. तिने त्यांनी सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांना तिच्या हृदयाच्या तिजोरीत अगदी बंधिस्त करून ठेवलेलं असत. आज देवयानी भेटणार ह्या बातमीने ती खूप भावूक झालेली असते .

 

                      दिल की शाखों पे
गुल आने लगे
   फिर हसीन ख्वाब
जगमगाने लगे


आज फीर ज़मीन

                          चाँद सी हो गई
                          होश में आज मैं
                          बेहोश शामील हुई

रोज़ शामो-ओ-शेहर
गाने लगे
फिर हसीन खाब
कुछ जगमगाने लगे


दिल की शाखों पे
दिल की शाखों पे
दिल की शाखों पे
गुल आने लगे

To Be Continued....

                 
               

🎭 Series Post

View all