Call Girl- भाग 15

To Be Continued...
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे पन्ना ह्या जन्मात नाही एकत्र होता आले आपल्याला पण पुढच्या प्रत्येक जन्मात माझी अर्धांगिनी म्हणून ये माझ्यासाठी. जमल तर मला माफ कर.....





हे सगळे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. त्यांचं देखील कृष्णा बद्दलच प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसत असत. पूर्ण त्या पत्रा बद्दल आणि कृष्णा बद्दल सांगून झाल्यावर पन्ना भरपूर शांत झाल्या. क्षितिजा देखील देवयानी बद्दल विचार करत असते. कदाचित आमचं सुद्धा असच असेल आमच्या आयुष्यात एकमेकांसोबत जगणं देवाने नसेल लिहल. पण देवयानीला तरी सुखात ठेवायचं ना तिने काय केलेलं. एवढं दुःख का तिच्या आयुष्यात माझ्या पासून दूर पण सुखात असती तरी तिला बघून मी सुखी राहिले असते. मी कधीच देवाकडे काही मागितलं नाहीय पण फक्त माझी देवयानी मला लवकरात लवकर भेटू देत. मला माहित नाही ती कोणत्या परिस्थितीत असेल. काय करत असेल. कशी असेल. सगळ्या प्रश्नांनी आणि देवयानीच्या काळजीने क्षितिजाच डोकं सुन्न पडलेलं असत. उद्याचा दिवस किंवा पुढचा क्षण नव्याने काय घेऊन येणार आहे ह्याची कल्पना पण तिला करवत नसते. त्यात पन्नाच्या आयुष्याची व्यथा ऐकून तिला माणसांच्या अश्या क्रूर वागण्याचा खूप राग येत असतो. ही माणसं लहान मुलगी असो किंवा वयात आलेली मुलगी असतो तिच्या सोबत असे शारीरिक त्रास देतातच पण अश्या व्यक्तीला पण सोडत नाहीत जी शरीराने मुलगा आहे. कोण कधी कसे बदलेल आणि कसे वागेल ह्याच काहीच सांगता येत नाही. 

 देवयानी खरचं खूप खडतर आयुष्य जगत असते. आता तिला रोज नवीन नंबर वरून कॉल तर येतात पण ते फक्त रात्री तिला कुठे यायचं हा पत्ता सांगण्यासाठी आणि किती पैसे घेणार विचारण्यासाठी. देवयानी कशी आहे? काय करतेय? ह्याची विचारपूस करणारी एकही व्यक्ती आता तिच्याकडे नसते. संभोग आणि भोग ह्या दोन शब्दांच्या विळख्यात तीच आयुष्य पूर्ण अडकून गेलेलं असते. हा विळखा सोडवणारी एकमेव व्यक्ती क्षितिजा बद्दल तिला काहीच कल्पना नसते. दिवसा कुठे फिरायची किंवा जायची मुभा तिला उरलेली नसते. लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या नजरा आता फक्त एक कॉल गर्ल म्हणून असतात. तिची खरी ओळख पण हर्षदने लपवलेली असते. दिवसा पण येता जाता लोक वाईट नजरेने बघत असतात आणि रात्रीचं आयुष्य ते तर तिला मिळालेली खूप मोठी शिक्षा असते. एका मुलावर विश्वास ठेवण्याची आणि प्रेम करण्याची मिळालेली खूप भयावहक शिक्षा जी कधी संपेल आणि संपले किंवा नाही हे देखील माहित नसत. 

आज पण तिला नेहमी प्रमाणे कॉल येतो. पण ओळखीच्या आवाजात जो आवाज कधी ही ऐकायला मिळू नये अशी तिची इच्छा असते. 
समोरून ती व्यक्ती बोलत असते. देवयानी मला तुझी खुप आठवण येतेय ग. मला ना मला एकदा तुला भेटायचे आहे. मला एकदा भेट ग मला खरचं तुझा वेळ हवा आहे.
तो हर्षद चा आवाज असतो. हा असे का बोलतोय आणि ह्याला आता माझी आठवण का आली असेल. ह्याचा विचार देवयानी करत असते. पण मनात तिच्या खूप राग असतो. हर्षद पुढे बोलतो.



 " काय मग कसे वाटत आहे? म्हणजे सगळे जमतंय ना तुला नीट. बाकी काही अडचण आली तर मला सांग मी तुझा नवरा म्हणून तुझी नेहमी मदत करेन. तसे वचन दिलं आहे मी तुला आणि हो मंगळसूत्र पण घातलं आहे. पण एक वचन तू पण पूर्ण कर हा. ते सात जन्मासाठी माझी म्हणजे माझी कॉल गर्ल बनून रहा. चल मी ठेवतो कॉल एवढं बोलून हर्षद कॉल ठेवून देतो.

म्हणतात ना ज्यांना हवस आणि प्रेम ह्यातला फरक कळत नाही ते कधीच कोणावर प्रेम करू शकत नाहीत. त्यांना स्त्री म्हणजे त्यांच्या इच्छापूर्ती च एक साधन वाटत असत. एकदा लग्न झालं की नवरा सर्वस्व आहे हे मुलींना सांगितलं जाणाऱ्या आपल्या नावापुरता असलेल्या समाजात मुलाला हे कधीच सांगितलं जात नाही की तुझ्यासोबत लग्न करून येणारी मुलगी ही सेक्ससाठी असलेलं खेळणं किंवा तुझी मोलकरीण नसून तुझी बायको आहे. 

देवयानी हर्षद च बोलणं ऐकून खूप चिडलेली असते. मी ह्या मुलाच्या प्रेमासाठी एक चांगली मैत्रीण, माझे स्वतःच अस्तित्व आणि माझे सर्वस्व माझी आई तिला सुद्धा गमावलं. ह्याला मी असे नाही सोडणार पण त्यासाठी मला ह्यातून बाहेर निघण्यासाठी पर्यायी उपाय शोधावा लागेल. ह्या लांडग्याला शिक्षा झाली पाहिजे. आज ह्याच्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली आहे. अजून किती मुलींना ह्याने असे फसवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल. पुढे जाऊनही हा असच करत राहील. 


देवयानी ह्यातून बाहेर निघण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करत असते.....



क्षितिजा पन्ना आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने देवयानीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. 
सोबतच ती पन्ना ह्यांना त्यांच्या संस्थेच्या कामात हातभार लावत असते.रोज संस्थेमध्ये कोणी ना कोणी येत असते आणि पन्ना त्या सगळ्यांसोबत क्षितीजाची ओळख करून देत होत्या. सगळ्यांच्या व्यथा, सगळ्यांचं आयुष्य, राहणीमान, विचार, बोलण्याची पद्धत निराळी होती. कोणी खूप बोलायचं, तर कोणी बोलतच नव्हत. पण ह्या सगळ्यात क्षितिजा खूप रुळत होती. आज एक मुलगा त्याच घर सोडून पळून संस्थेमध्ये आला होता. त्याला ऑफिसमध्ये बसवून इथे येण्याचं कारण विचारलं तर म्हणाला मला असे मुलींसारख राहायला आवडत . माझे हावभाव चालणं, बोलणं सुद्धा तसचं आहे. ह्यावरून सगळे मला ओरडतात अगदी माझे जन्मदाते आई - वडील सुद्धा आणि मी असे वागतो म्हणून ते माझे लग्न लावून द्यायला निघाले आहेत. त्यांचं म्हण आहे की बायको आली, मला एक मूल झालं की त्यांना आणि मला लोक नाव नाही ठेवणारं. मग लोकांची तोंड बंद होतील. त्यांना सगळे येताजाता बोलतात की तुमचा मुलगा असे मुलींसारख राहतो. तुमचा एकुलता एक मुलगा आहे असे वागणं चांगल नाही. त्याच लग्न कसे होणार मुलगी कशी मिळणार ह्याला लग्नासाठी जर ह्याच वागणं असे बायल्या सारखं असेल तर म्हणून माझ्या वडिलांनी गावाची मुलगी बघितली आहे माझ्यासाठी आणि माझे गावीच लग्न लावणार आहेत. 

मला लग्न करायचं नाहीय म्हणून मी इथे पळून आलोय. मला कोणत्या मुलीचं आयुष्य खराब नाही करायचं. मला मुलीनं बद्दल भावना नाहीत आणि मी लग्न करून मूल सुद्धा देईन ह्यांना पण ते शारीरिक असेल. भावनिक आणि प्रेम मला त्या मुलीसाठी कधी मनात येणारच नाही आणि कोणती मुलगी स्वीकारेल मला. ह्या सगळ्या विचाराने मी घरातून पळून आलोय तुम्ही मला मदत करा. मला ह्या सगळ्यातून बाहेर निघायचे आहे.

To Be Continued...

( कमेंट नक्की करा )

🎭 Series Post

View all