कॉल गर्ल - भाग ८ ( नव्या वळणावर )

To Be Continued...

    लग्नाचा दिवस उजाडतो. ठरल्याप्रमाणे ११ पर्यंत कोर्टात पोहचायचे असते. देवयानी सकाळी लवकर उठून छान तयार होते. तिच्यावर साजेशी अशी पण थोडीच अशी तयारी ती करते. हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, गळ्यात चैन, नाकात नथ, केस छान पद्धतीने बांधलेली, थोडासा मेकअप ती अगदी नव्या नवरी सारखी दिसत होती. तिच्या सोबत तिची आई असते. हर्षद त्याच्या आई - बाबांसोबत परस्पर कोर्टात येणार असतो. ऑफिसमधले बॉस आणि काही मित्र पण येणार असतात. 
          
            देवयानी आणि तिची आई अकरा वाजता कोर्टात पोहचतात. ती हर्षद ची वाट बघत थांबलेली असते. ११:३० च्या दरम्यान बॉस आणि ऑफिसमधले त्याचे मित्र येतात. बॉस आल्यावर देवयानीला सांगतात. हर्षद ला उशीर होईल आपण रेसटॉरंट मध्ये थांबुया. दुपारचे दोन वाजतात. तरी हर्षद आलेला नसतो.  बॉस त्याला फोन करतात आणि देवयानीला बाजूला बोलवून त्याचा निरोप देतात. "हर्षद च्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. ते काही येणार नाहीय पण हर्षद ला यायला अजुनही उशीर होईल. तू तुझ्या आईला तशी कल्पना दे आणि मी जेवण ऑर्डर करतो. आपण जेवून घेऊया. सगळ्यांना भूक लागली असेल. तू नको टेन्शन घेऊ तो येईल. चल तू बस आता. तो आल्यावर बघतोच त्याला त्याने तुझा सगळा मेकअप उतरवला."

देवयानी - नक्की एवढच कारण आहे ना सर. मला आता भिती वाटतेय. मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. तो नक्की येईल ना. की क्षितिजा सारखं त्यानेही मला फसवल.

बॉस - अग येईल तो. तू कशाला घाबरते. जर नाही आला तर मी स्वतः जाऊन घेऊन येईन त्याला आणि तू क्षितिजाच्या बद्दल काय बोलतेस. ती तुझी मैत्रीण होती आणि ती होतीच तशी. हर्षद तुझ्यावर प्रेम करतो. तो मुलगा चांगला आहे तो असं काही चुकीचं नाही वागणार. त्याला ओळखतो मी खूप चांगलं तो कोणासोबत वाईट नाही वागणार. 

देवयानी - सर मग तो असं का वागतोय? आता एवढ्या उशिरा आल्यानंतर कसं होईल? कोर्टाची वेळ पण निघून चालली आहे. माझी आई काय विचार करत असेल. माझ्या बाजूने बोलणार कोणीही नाहीय. मी समजू शकते की प्रोब्लेम असू शकतो. पण तो माझ्यासोबत बोलतही नाहीय. तो तुमच्यासोबत बोलतो आहे. मी त्याची होणारी बायको आहे. मला एवढाही हक्क नाहीय का?

बॉस - तू त्याच्यावर विश्वास ठेव त्याला कदाचित तुला त्रास नसेल द्यायचा. तो येईल तू वाट बघ चल.

दोघेही रेसटॉरंट मधे निघून जातात. जेवण मागवतात.  देवयानी आईला सगळे सांगते. आई तिला धीर देते आणि समजवून सांगते.

चार वाजतात तरी हर्षद आलेला नसतो आता देवयानी ची परिस्थिती खूप खराब झालेली असते. तिला काय करावं काहीच सुचत नसत. हर्षद ही बॉससोबत च बोलत असतो. देवयानीला आता हे सगळे सोडून इथून निघून जावे असे वाटत असत. आईच्या सांगण्यावरून ती थांबलेली असते. साडे चार वाजता हर्षद येतो त्याला बघताच देवयानी त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रश्न विचारायला सुरवात करते. बॉस मध्यस्ती करतात आणि हर्षद ला बाजूला घेऊन जाऊन पुढे आता काय करायचं ह्या बद्दल विचारतात. थोड्या वेळाने दोघेही देवयानी जवळ येतात आणि बॉस तिला समजवून सांगतात.

बॉस - हे बघ देवयानी आता कोर्टाची वेळ पण संपली आहे आणि लग्न आजच उरकून घ्यावं असे ही वाटतं आहे तर मी काय सांगतो ते नीट ऐक...इथे जवळच एक मंदिर आहे आणि हर्षद मला माझ्या लहान भावासारखा आहे. तर आपण तिथे जाऊन तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊया आणि मंदिरा मधले पुजारी सुध्दा माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना कळवतो सगळे तू एकदा आईची परवानगी घे.

देवयानी - ठीक आहे सर.. तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते पण ह्या गाढवाला एवढी पण अक्कल नाही का. स्वतःच लग्न आणि होणाऱ्या बायकोला काहीच शेअर करू शकत नाही हा. पुढे जाऊन असच वागणार का? बाबा कसे आहेत आता. तब्येत ठीक आहे ना त्यांची. काळजी करण्यासारखं काही नाहीय ना.

बॉस - नाही ते ठीक आहेत. बाकी सगळं तो तुला सांगेल नंतर. आता तू आईला विचार आणि चल म्हणजे अजून उशीर नको व्हायला. 

देवयानी आईची परवानगी घेते आणि सगळे  मंदिरात जातात. छान अगदी छोट्या पद्धतीने लग्न पार पडत. देवयानी आता अधिकच छान दिसत असते. गळ्यात छोट मंगळसूत्र आणि भांगेत असलेलं कुंकू ह्याने तिच्या चेहऱ्यावरचं तेज अधिकच उठून दिसत असत. पण तरी तिची नजर काही वेगळं सांगत असते. देवयानी ची नजर कोणाला तरी शोधत असते. काय असेल देवयानी च्या नजरेत बाबांची आठवण की मग क्षितिजा चा शोध?

देवयानी च्या आईचे, मंदिरमधल्या पूजाऱ्यांचे आणि देवाचे आशीर्वाद घेऊन सगळे तिथून निघतात. हर्षद चे मित्र सांगतात आम्ही देवयानी च्या आईला सोडतो त्यांच्या घरी. तू जा सरांच्या गाडीतून आणि घरी पोहचल्यावर फोन कर. अरे हो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणल आहे हे घे. आता नको घरी जाऊन उघड आणि त्याचा वापर कर आजच. हर्षद ला समजत त्यात काय आहे ते आणि दोघेही हसतात.

देवयानी तिच्या आईला मिठी मारून रडत असते. आई सुद्धा आता एकटी कशी राहणार ह्या विचाराने थकलेली असते. तरी देवयानी तिला समजावते. आई तू काळजी करू नकोस. मी आणि हर्षद येत जाऊ अधून मधून तुला भेटायला आणि हो तुला कधी काही वाटल तर तू येत जा. मी तुझ्या जवळच आहे कुठेच जात नाहीय. असं रडू नकोस तू. मग मी नाही जाणार नाहीतर तुलाही घेऊन जाईन सोबत. 

देवयानी आणि तिच्या आईच्या बराच वेळ गप्पा झाल्या नंतर हर्षद देवयानीला निघण्यासाठी विचारतो. तो आईला समजवतो आई तुम्ही काळजी करू नका. मी तिची काळजी घेईन आणि तुम्ही येत जा अधून मधून म्हणजे तुम्हालाही एकट नाही वाटणार. चला आता आम्ही निघतो पुन्हा उशीर होईल. माझे मित्र तुम्हाला घरी सोडतील. 

हर्षद आणि देवयानी बॉसच्या गाडीतून घरी पोहचतात. बॉस त्यांना सोडून निघून जातो. दोघेही खूप थकलेले असतात त्यामुळे त्यांना बॉस बाहेरूनच जेवण घेऊन देतात. जेवण आटपून कपडे बदलून दोघेही गप्पा मारत बसतात. 

हर्षद - देवयानी तुला माहित आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा ऑफीसमध्ये पाहिलं ना तेव्हा पासूनच तुझ्या प्रेमात पडलोय पण क्षितिजा तुझ्या नेहमी सोबत असायची म्हणून कधी काही बोललो नाही. 

देवयानी - मला तर तसं कधी जाणवलं नाही आणि तू क्षितिजाला का घाबरत होता. ती काय मारणार होती का तुला.

हर्षद - मारणार अग ऑफिसमध्ये सगळे तिला लेडी डॉन बोलतात. तिच्या वाकड्यात कोणी जात नव्हत. मी तर असं ऐकले होते की ती तुझ्या प्रेमात होती. ( एवढं बोलून हर्षद शांत बसतो ) 

देवयानी - काय बोलतोय तू. हो क्षितिजा रागिष्ट होती पण वाईट नव्हती आणि प्रेमाबद्दल काय बोललास मी ऐकलं नाही.

हर्षद - ( विषय बदलून बोलतो ) वाईट नव्हती मग तिने तुझ्यासोबत जे केलं ते चांगलं होत का? जाऊदे सोड आपण कशाला तिचा विषय घेऊन बसलोय. आज तर आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि तुला तर माहित आहे पहिल्या रात्री असं फक्त गप्पा मारायच्या नसतात. तू ह्या गाऊन मधे खूपच छान दिसतेस. 

एवढं बोलून हर्षद देवयानीला मिठी मारतो. नंतर हळूच तिचा चेहरा हातात घेतो. तिच्या हनुवटीला पकडून तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ ठेवतो.

🎭 Series Post

View all