कॉल गर्ल - भाग ५ ( अविस्मरणीय वाढदिवस आणि पाहिलं भांडण )

To Be Continued...

ती व्यक्ती केक आणि खायला घेऊन आली होती....पुढे...
                   देवयानी चा आवडता चॉकलेट केक होता आणि खायला तिची आवडती डिश पाव भाजी होती. खूप छान उत्साहात, आनंदात देवयानी चा वाढदिवस साजरा झाला. तिथली सगळीच माणसं मनाने आणि विचाराने खूप छान होती. देवयानीला सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं होत. आपली फार काही ओळख नसताना ह्यांनी एवढं केलं माझ्यासाठी. सगळे खूप छान बोलत होते. नंतर निरोपाची वेळ आली. पन्ना देवयानी जवळ येऊन बोलू लागल्या. " बेटा तेरी ये अजब - गजब ख्वाहिश ने हम सब लोगों को भी खुशी दी हैं। ऐसे ही कभी आना इधर हमें मिलने। चलो अपना ख्याल रखना और फिर से जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। 
                  त्यांचा निरोप घेऊन देवयानी आणि क्षितिजा तिथून निघाल्या. ऑफिच्या खाली आल्यावर देवयानी क्षितिजाकडे टक लावून बघत होती. क्षितिजाला कळून चुकल की आता प्रश्नांची सरबत्ती सुरू होणार म्हणून देवयानी काही बोलायच्या आतच क्षितिजा तिला म्हणाली आपण एका ठिकाणी शांत बसून बोलूया. क्षितिजा देवयानीला घेऊन निघाली आणि समुद्रकिनाऱ्यावर एका बागेजवळ थांबवली. दोघीही बागेत जाऊन बसल्या..
क्षितिजा देवयानीला म्हणाली हा बोल आता काय बोलायचय..

देवयानी - तू सगळे स्वतःहून सांगणार आहेस की मी विचारू तुला सगळे.

क्षितिजा - एक काम कर तूच विचार म्हणजे मला उत्तर देणं सोपं जाईल.

देवयानी - तू त्या संस्थेशी कधी कॉन्टॅक्ट केलास आणि तुला कसं माहित सगळे. मी फक्त एकदा तुला सांगितल आणि सांगितलं नाही बोलता बोलता बोलून गेले आणि तू ते ही लक्षात ठेवलं. एवढं करायची काय गरज होती अग. कालच सरप्राइज एवढं सगळे का केलंस? मला सवय नाहीय ह्या सगळ्याची. 

क्षितिजा - पहिला एक एक करून उत्तर देते तुझ्या सगळ्या प्रश्नांची..मी त्या संस्थेला तेव्हा कॉन्टॅक्ट केला जेव्हा तू मला तुझी इच्छा बोलून दाखवली होतीस आणि त्यांना सांगितलं होत की तुझ्या वाढदिवसाला आम्ही इथे येऊ करून. एवढं करायची गरज ह्या साठी होती की मला तुझ्यासोबत काही तरी वेगळे नातं वाटत. मी तुला सकाळी स्वामी समर्थांच्या मठात जाताना तुला बोलले होते की मी वर्षातून एकदाच इथे येते आणि तू दुसरी व्यक्ती आहेस जिच्यासोबत मी इथे आले आहे. तुझा वाढदिवस आणि माझ्या आईचा वाढदिवस एकाच तारखेला आहे हा इतरांसाठी योगायोग असेल मला माझ्यासाठी तू खास आहेस. आई गेल्यानंतर मी इतकी कोणाच्या जवळ नाही गेले ना कोणासाठी इतक काही केलं. पण काल तुला जे सरप्राइज दिलं. आज जे काही तुझ्यासाठी केलं ते मी मनापासून केलं सगळे. ह्यातून मला पण आनंद मिळत होता आणि आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे. 
हे सगळे बोलताना क्षितिजाच्या डोळ्यात पाणी होत. देवयानी ने क्षितिजाला हळूच मिठी मारली आणि क्षितिजा ने अश्रूंना वाट मोकळी केली होती..
            
                    बराच वेळ शांततेत गेल्यानंतर देवयानीने क्षितिजाला प्रश्न विचारला. तू कधी हे सांगितलं नाहीस. तुझ्या आईबद्दल म्हणजे माझ्या वाढदिवसाला त्यांचा वाढदिवस असतो ते आणि त्या ह्या जगात नाहीत हे सुद्धा. तुला माझ्या आयुष्याबद्दल इतकं काही माहित आहे. पण तुझ्या आयुष्याबद्दल मला काहीच कल्पना नाहीय ना. ह्याचा अर्थ असा होतो मी कोणीच नाही. तसे ही तू एखाद्या कडून त्याच्या बद्दल वधवून घेण्यास हुशार आहेस. त्यात मी ही येते मला का काही सांगशील तू. मी कोण आहे तुझी? बरोबर ना..आता का बोलती बंद झाली आता बोल ना. आता कसे बोलशील तू. मी खरं बोलतेय ना. तुझ्याकडे बोलायला काहीच नसेल आता.

क्षितिजा - ( देवयानी च्या अश्या वागण्याचं तिला हसू येत. मी रडत होते आणि ही मुलगी माझ्यावरच चिडते.) तू मला कधी बोलू देतेस का? बोलू दिलेस तर मी बोलेन ना. मला तुझ्या आयुष्याबद्दल माहित आहे म्हणतेस मग पप्पा वारले तेव्हा हॉस्पिटल वैगरे हे सगळे मला कुठे काही माहित होत आणि मी तुला माझ्याबद्दल कधी काही सांगितलं नाही. कारण तशी वेळच आली नाही. उगाच आपल रडगाण गात बसायचं हे मला आवडत नाही. तू माझ्यासाठी काय आहेस. कोण आहेस. हे मला माहीत आहे मला त्याची जाणीव आहे. पण प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा ना. वेळेनुसार नातं फुलत जात. एकच महिना झाला आहे आपल्याला भेटून आणि त्यात एकमेकांविषयी सांगायचं की एकमेकांना जाणून घ्यायचं हे तूच ठरव आता. मी जर तुला अगोदरच सांगितलं असतं की माझ्या आईचा आणि तुझा वाढदिवस एकाच दिवशी असतो तर आज कदाचित तू मला सांत्वन देण्याच्या हेतूने भेटली असती आणि तू आजचा दिवस एन्जॉय केलाच नसता. मैत्रीचं नातं अस असत ज्यात कोणत्याच प्रकारच बंधन नसत आणि ज्यात उपकाराची भाषा नसते. आपण एकमेकांना वेळ देऊया समजून घ्यायला. 

देवयानी - तुला माहित आहे ना. तू असे काही बोललीस म्हणजे मी माझा राग विसरून जाणार आणि तुझ्या ह्या शब्दांच्या जादूने सगळे विसरून जाणार. पण आज नाही आज माझा दिवस आहे. मला हवे तसचं होणार आणि तू आता इथे उठा बशा काढ लगेच. 

क्षितिजा बिचारी काय करणार birthday girl च ऐकावं लागणार. तिने बागेत सगळ्यांसमोर उठा बशा काढल्या कान पकडून. सगळे येता - जाता तिच्याकडे बघून हसत होते. देवयानी पण ह्या सगळ्याचा मस्त आनंद घेत होती. ती सुद्धा पोट धरून हसत होती. देवयानीला असं मनमोकळ हसताना पाहिलं की क्षितिजाला खूप छान वाटायचं. ती मनात नेहमी हाच विचार करायची की " काय नातं असेल ह्या मुलीसोबत माझे. का एवढी जवळची वाटते मला ही. नाही माहित काहीच पण देवयानी सोबत असली की खूप छान वाटतं." क्षितिजा विचारांमध्ये हरवलेली असताना देवयानी तिला आवाज देते. 

देवयानी - अगं बस बस. अजून नको ती शिक्षा एकतर माझे  हसून हसून पोट दुखायला लागलंय. चल आता निघुया आपण. आई वाट बघत असेल. जास्त उशीर नको उद्या ऑफिसला ही जायचं आहे.

दोघी घरी जायला निघतात. देवयानीला तिच्या घरी सोडून क्षितिजा तिच्या घरी जाते. दिवसभराच्या थकव्याने दोघी जेवून झोपतात. 

               देवयानी सकाळी लवकरच उठते. तिची छान झोप झालेली असते. आईला अजून झोपलेलं बघून ती काम आवरायला घेते. डब्बा स्वतःच तयार करते. क्षितिजाच्या आवडीची मेथीची भाजी आणि पोळी. तितक्यात आईला जाग येते. " काय ग? आज लवकर जायचं आहे का ऑफिसला? तू काल काही बोलली नाहीस. मी उठले असते लवकर."

देवयानी - आई...आई.. अगं लवकर वैगरे काही नाही नेहमीच्या वेळेत जायचं आहे. मलाच लवकर जाग आली म्हणून मी आवरलं सगळे आणि मेथीची भाजी आणि पोळी केली आहे. तू आता आराम कर. तुला काल काय केलं तेही सांगायचं आहे. बस तू.

देवयानी दोघींसाठी चहा करताना आईला सगळे सांगते. सकाळी स्वामींच्या मठा पासून ते संध्याकाळी बागेत क्षितिजा ने उठा बशा कश्या काढल्या इथ पर्यंत. देवयानी ची आई देखील त्यावर खूप हसते. 

देवयानी ची आई - नको ग बाळा. तिला एवढा त्रास नको देऊस. वैतागून जाईल ती. छान आहे मुलगी साधी आहे बिचारी.

देवयानी - त्रास द्यायचा तर हक्क आहे माझा आणि ती मला नाही वैतागणार. बिचारी वैगरे काही नाहीय ती. ऑफिसमध्ये सगळे घाबरतात तिला. लेडी डॉन म्हणतात म्हणून तर मला काही बोलायची कोणी हिम्मत करत नाही. बरं चल मी निघते. उशीर होईल. क्षितिजा वाट बघत असेल.

देवयानी ची आई - नीट जा बाळा. काळजी घे. लवकर घरी ये.

देवयानी तिच्या आईच्या पाया पडून ऑफिसला जायला निघते. ऑफीसमध्ये पोहचल्यावर तिथे खूप गोंगाट चालू असतो. नक्की काय चालू आहे हे देवयानी च्या लक्षातच येत नाही. ती क्षितिजाला शोधत असते. क्षितिजा तिच्या डेस्कवर तिच्या कामात गुंग असते. देवयानी तिथे जाऊन तिला गुड मॉर्निंग करते..क्षितिजा गुड मॉर्निंग करून पुन्हा कामाला लागते..
देवयानी तिला विचारते हा कसला गोंधळ चालु आहे?

क्षितिजा म्हणते वीकेंडला पिकनिक ला जायचा प्लॅन चालू आहे. सरांचं चा कोणीतरी मित्र आहे त्याच्या रेसॉर्टवर जायचा प्लॅन आहे. तुला काय करायचं आहे. तू तुझे काम कर जा. हे असे सगळे फालतू प्लॅन मला नाही पटत.ह्यांना फक्त चान्स मारायला अश्या प्लॅन्स मधे मुली लागतात.

देवयानी - पण मला जायचं आहे. मी असे फिरायला नाही गेले कधी आणि तू सोबत असलीस तरच आई पाठवेल नाही तर नाही पाठवणार.

क्षितिजा - आपण जाऊ नंतर कुठेतरी पण ह्यांच्या सोबत नको.  मला काम करू देत. जा तू आता.

देवयानी - तुझ्यासोबत काय यार. सगळ्यांसोबत जायला जी मज्जा आहे ती दोघींमध्ये येणार आहे का? तुला सगळेच कसे चुकीचे वाटतात. नेहमी स्वतःच ते खरं. 

क्षितिजा - काय बोलतेस तू. मी इथे पहिल्यापासून काम करतेय मला चांगलं माहित आहे हे सगळे. तू जा इथून तुझे काम कर. 

देवयानी तिथून रागात निघून जाते. क्षितिजा आपल्या कामात गुंग होते.

( काय होईल पुढे? मैत्रीमधल पाहिलं भांडण काय रूप घेईल? बघुया पुढच्या भागात..) 
क्रमशः

🎭 Series Post

View all