कॉल गर्ल - भाग १० ( शेवटचा निरोप )

To Be Continued...

        हर्षद च्या बोलण्यावर देवयानीच अजिबात लक्ष नव्हत. आईला बघण्यासाठी देवयानी धडपडत होती. आपली आई ह्या जगात नाहीय ह्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता. असे अचानक आणि एवढ्या लवकर घडण तिच्या साठी अनपेक्षित होत. त्यात ह्या सगळ्यात क्षितिजाच्या नावाची चर्चा ऐकून ती आता पूर्णपणे तुटली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू निघत नव्हते. देवयानीला खूप मोठा धक्का बसला होता. शेजारची माणसं, आई जिथे काम करत होती तिथली काही माणसं, देवयानी च्या ऑफिसमधले काही लोक आणि देवयानी, हर्षद आणि क्षितिजा...


          हर्षद क्षितिजावर आरोप करत असतो पण क्षितिजा शांत असते. ती देवयानी च्या बोलण्याची वाट बघत असते. इतक्यात शेजारच्या काकू हर्षद वर ओरडतात. " इथे काय परिस्थिती आहे आणि तुझे काय चालू आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे त्या हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या. तरी तू त्या मुलीला दोष देतोय. तुला जे काही करायचं आहे. भांडायच आहे ते तू नंतर भांड आता अंत्यविधी लवकरात लवकर पार पाडण गरजेचं आहे. "


           अंत्यसंस्काराचे  विधी जसं जसे पार पडत असतात. तसं प्रत्येक विधीच्या वेळेस देवयानीला आईसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. देवयानी ची स्थिती आता एखाद्या भावनाहिन शरिरासारखी झालेली असते. तिच्या डोळ्यात अश्रू नसतात ना तिची पापणी हालत असते.  सगळ्यांचं आक्रोश चाललेला असतो. हर्षद हुंदके देऊन रडत असतो. राम नाम सत्य है... म्हणत शेवटचा निरोप घ्यायची वेळ येते. मुलगा नसल्याने मुलाची जागा हर्षद ला दिली जाते. अनोळखी चार खांदे आणि त्यांच्या पुढे चालणारा हर्षद. स्मशानभूमीत पोहचल्यावर विधी नुसार सगळे करून हर्षद अग्नी देतो. काही वेळानंतर हळू हळू करून सगळे तिथून निघून जातात. हर्षद आणि देवयानीला ही तिथून घेऊन जातात. क्षितिजा हे सगळे लांबून बघत असते. हर्षद देवयानी दोघेही देवयानी च्या घरी येतात. देवयानी एका ठिकाणी शांत बसून राहते. हर्षद तिला सतत सांगत असतो. " मी यायच्या अगोदर इथे क्षितिजा होती. ती कोणाला तरी फोन लावत होती. नक्कीच क्षितिजा आईला काहीतरी बोलली असणारं किंवा मग फोटो दाखवले असणारं तुझे ते" हर्षद च बोलण ऐकून देवयानी फक्त त्याला एकच वाक्य बोलते. " हर्षद मला एकट राहुदे. मला एकट सोड. तू जा बाहेर प्लीज. " देवयानी च्या एवढ्या वेळानंतर सोडलेल्या मौनाने हर्षद शांत होतो आणि बाहेर निघून जातो.  
       

          देवयानी आता एकटीच विचारात गुंतलेली असते. ज्या आईने शाळेत माझ्या प्रवेश पत्रिकेवर सही केली. आज त्याच आईला शेवटचा निरोप देण्यासाठी तिचा मृतदेह मिळवण्यासाठी मी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी च्या फॉर्म वर सही केली....ज्या आईने मला न रडवतात डोळ्यात साबण जाऊ न देता मी मोठी होईपर्यंत आंघोळ घातली. आज तिलाच मी मोठी झाल्यावर शेवटची आंघोळ घातली...जी मला परीक्षेला जाताना तुळशीपत्र तोंडात ठेवायला द्यायची. आज तिच्याच तोंडात तुळशीपत्र ठेऊन तिने आयुष्याची परीक्षा हरली... जिने मला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला नवीन ड्रेस घेऊन दिला. आज त्याच आईला नवीन साडी नेसवून मी कायमचा निरोप दिला...मी देवाच्या ही अगोदर जिच्या पाया पडायचे आज मी तिच्या पायावर शेवटचं पाणी टाकलं... जिचा हसरा चेहरा माझ्या जगण्याचा आधार होता. आज तोच चेहरा मी शेवटचा बघत होते...जी मला म्हणायची बाळा काही झाल तरी रडू नकोस. माझी देवू ना नेहमी हसताना छान दिसते. आज तिच्या त्याच शब्दांसाठी मी तिच्यासमोर एकदाही नाही रडले....एवढं बोलून देवयानी हुंदके देऊन रडू लागते. इतक्या वेळा पासून साठवून ठेवलेले अश्रू आणि आई गेलेल्याच दुःख ती मोकळ करत असते. घरातली प्रत्येक वस्तू आईच्या अस्तित्वाची जाणीव तिला करून देत असते. स्वयंपाक घरात तिने शिकवलेली पहिली पोळी... फटके देऊन शिकवलेली भाकरी..बेडवर बसून देवयानी च डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन तिला समजावणं...पहिल्यांदा देवयानीला पाळी आली तेव्हा तिला आठवणीत राहावं म्हणून स्टुडिओ मध्ये जाऊन काढलेल्या फोटोची फ्रेम....आणि देवयानीच्या वाढदिवसाला केलेली मज्जा...

                हे सगळे आठवत असताना अचानक तिला क्षितिजा ची आठवण येते. " क्षितिजा माझ्याबाबतीत चुकीचं वागेल. पण आईच्या बाबतीत असं काही वागणार नाही. हर्षद ला काहीतरी गैरसमज झाला असणार. हर्षद नाहीय तो पर्यंत मी तिला बोलवून घेते आणि बोलते तिच्याशी..असे म्हणून देवयानी क्षितिजाला फोन लावते. सुरवातीला ४-५ वेळा प्रयत्न करूनही फोन लागत नाही. सहाव्यांदा फोन लागतो. काही वेळ रिंग वाजल्यावर समोरून फोन उचलला जातो. 
      
    " हॅलो.. क्षितिजा..मी देवयानी..तुझ्यासोबत बोलायचं होत." 

" काय बोलणार आहेस तू माझ्यासोबत हो जे झालं ते माझ्यामुळेच झालंय...."

  एवढं बोलून फोन कट होतो.....


( आपण म्हणतो की आपल्या डोळ्यांना जे दिसत तेच खरं असत. पण काही वेळेस आपले डोळे जे बघत असतात त्याच्या पेक्षा भयानक किंवा चांगलं काही तरी घडत असतं. )

माझा राईटर म्हणून कथामालिकेचा पहिला प्रयत्न आहे. जर काही चुकत असेल तर मला नक्की सांगा. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाहीय. सॉरी आणि thank you सर्व कमेंट साठी मी. मी अजून छान लिहिण्याचा प्रयत्न करेन.

To Be Continued...

🎭 Series Post

View all