Feb 26, 2024
वैचारिक

कॉल गर्ल - १६

Read Later
कॉल गर्ल - १६


मला लग्न करायचं नाहीय म्हणून मी इथे पळून आलोय. मला कोणत्या मुलीचं आयुष्य खराब नाही करायचं. मला मुलीनं बद्दल भावना नाहीत आणि मी लग्न करून मूल सुद्धा देईन ह्यांना पण ते शारीरिक असेल. भावनिक आणि प्रेम मला त्या मुलीसाठी कधी मनात येणारच नाही आणि कोणती मुलगी स्वीकारेल मला. ह्या सगळ्या विचाराने मी घरातून पळून आलोय तुम्ही मला मदत करा. मला ह्या सगळ्यातून बाहेर निघायचे आहे.

पन्ना- तू पळून जाऊन सगळे प्रश्न सुटणार आहेत का?
आता तू पळून जाशील उद्या सगळे तुझ्या घरच्यांना नाव ठेवतील तेव्हा तुला कुठेतरी असे वाटेलच ना की आपण चुकीचं वागलो म्हणून त्यापेक्षा आई - वडिलांना नीट समजावून सांग. त्यांच्या सोबत बोल. कदाचित ते समजून घेतील.

नाही कोणी समजून घेत ग ताई. तुला असे वाटतं का मी कधी प्रयत्न केला नसेल. मी खूप प्रयत्न केला पण माझे आई - वडील नाही समजू शकत. त्यांना वाटत की हा आजार आहे. हे सगळे गोळ्या औषधांनी बरं होऊ शकत. माझे लग्न लावून दिल्यावर माझ्या भावना बदलतील ह्या विचारात ते लग्न ही लावून द्यायला निघाले. माझे लग्न जरी झालं तरी कोणती मुलगी मला स्वीकारणार आहे. कोणत्या मुलीला हे सहन होणार आहे की आपला नवरा समलैंगिक आहे. ती कितीही पुढारलेल्या विचारांची असली तरी ती कधीच हे सत्य पचवू शकणार नाही. मी किती दिवस स्वतःच अस्तित्व लपवून ठेवू. आज नाही तर उद्या मला ह्या नाटकाचा कंटाळा येईलच ना तेव्हा मी काय करणार आहे. माझे वागणं, बोलणं, राहणीमान मी किती दिवस मुलासारखे ठेवू.

पन्ना - ठीक आहे. मी तुला मदत करेन पण त्या नंतर तू मला काय देणार म्हणजे आज कालच्या जगात निस्वार्थी मदत कोणी करू शकत नाही. हे तर तुला माहितीच आहे. ह्यात मलाही काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. तू तुझे घर सोडून, आई - वडील सोडून येणार तर उद्या असे नको की बिघडला आमचा मुलगा. मी जसे सांगेन जसे बोलेन तसे तुला वागायला लागेल. तुला आमच्या संस्थेत हातभार लावायला लागेल. कुठेही मागून किंवा चुकीचं काम करून पैसे कमवायचे नाही. तू काही नोकरी करत असणार हे काही तुझे वैयक्तिक करिअर संदर्भात असेल ते तू पूर्ण करशील. आमच्याकडे सगळे मोठमोठ्या पदावर आहेत. तूही त्यांच्यासारखं त्यांच्यासोबत पुढे जाऊन. तुझ्या आई - वडिलांना मान खाली घालावी लागणार नाही असच वागायचं. स्वतःच्या शरीराचा, भावनांचा खेळ होईल असे काही वागलास तर माझ्याशी गाठ आहे. चल जा आता आणि आई - वडिलांना एकदा सांग की मी इथे काम करतोय म्हणून त्यांना त्रास नको देऊस.


क्षितिजा - हो घरी कळव. नाहीतर ह्यांच्या बद्दल समाजात गैरसमज आहेत. ते अजून वाढतील. तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर त्याचा दोष ह्यांना देतील असे काही वागू नकोस. एक व्यक्ती चुकीची निघाली तर सगळेच चुकीचे असतात असे नाहीय पण त्या एकामुळे लोकांचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जसे पन्ना स्वतःची संस्था चालवता आहेत किंवा समाजसेवेचे काम करत आहेत. तसे काही किन्नर सिग्नलवर मागून खातात. काही देहविक्रीचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. ज्याचं त्याचं आपल असे आयुष्य आहे. देवाने तसे पाठवलं आहे त्यांना तसचं ते जगतात. स्वतःच्या आयुष्याला कोसत न बसता काही ना काही करून जगतात. त्यातही असे नाही की कोणी शिकलेल नाही. काही खूप छान शिकलेले आहेत. एवढं की पदवीधर ते अगदी इंजिनियर पर्यंत पण त्यांनी फक्त स्वतःला चार माणसांमध्ये स्वीकारलं म्हणून त्यांना नोकरी करण्याचा अधिकार मिळाला नाही. असे खोटं जगण्यापेक्षा स्वतःला स्वीकारलेले कधीही चांगले आहे ना. स्त्री - पुरुष ह्या वादात माणुसकी बाजूलाच राहिली आहे. आजही हिजडा ह्या शब्दाला अर्थ काहीच नाहीय तरी त्या एखाद्या (transgender) व्यक्ती बद्दल बोलताना तो हिजडा आला किंवा सहज हिजडा हा शब्द शिवी म्हणून सुद्धा वापरला जातो. जसे तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला मान देतात. त्याला जगात सन्मानाने वागवता तसचं त्यांना का नाही वागवत. ती सुद्धा मनाने आणि ऑपरेशन नंतर शरीराने स्त्री आहे ना. मग तिलाही तेवढीच इज्जत आणि तेवढाच मान मिळायला हवा. जसे सगळे पुरुष, सगळ्या स्त्रिया म्हणजेच सगळी माणसं सारखी नसतात तसचं सगळे किन्नर सारखे नसतात. आपण त्यांना न ओळखता, त्यांच्या बद्दल जाणून न घेता कसे एखाद ठराविक मत बनवून मोकळे होतो. आज तू ह्या सगळ्यातून प्रवास करतोयस आणि शरीराने तू एक मुलगा आहेस तरी तू अगदी सहज ह्या जगात नाही वावरू शकत हे तुझ्या घरच्यांना नाही कळणार कदाचित पण तू घर सोडून आलास म्हणून ते "त्या हिजड्याच्या नादाला लागून तू पण तसाच झालास" असे नक्कीच म्हणतील.


नाही ग ताई. मी ह्यांना आणि माझ्या घरच्यांना सुद्धा कोणी नाव ठेवेल असे कधीच वागणार नाही. पण काही वेळेस सहनशक्ती संपते ग. माझ्या चालण्या - बोलण्यावरून अगदी माझ्या वागण्यावरून चिडविले‌ तरी मी सहन करेन पण माझ्या शरीराला विचित्र प्रकारे स्पर्श आणि ते जबरदस्ती कसे ग सहन करू. नाही मला ते सहन होत म्हणून आलो निघून आज मी हे सगळे एकट सहन करतोय. उद्या खरचं माझे ह्यांनी लग्न लावलं तर हे सगळे त्या मुलीला सहन करावे लागेल तिच्याही वाट्याला हे सगळे येईल आणि तिच्याकडे बघण्याच्या नजराही बदलतील का तर ती एका बायल्याची बायको असेल. मी कोणा कोणाला पुरून उरणार आहे आणि किती जणांची तोंड बंद करणार आहे. हे सगळे आपणहून बदलायला हवे. नुसतं शिकलेले असून आणि मॉडर्न असून काही फायदा नाही. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लोक स्वीकारायला लागतील ना तेव्हा आपल्या सारख्यांच आयुष्य सुखाच होईल. नाही तर स्त्रियांवर झालेल्या बलात्काराची तक्रार तरी घेतली जाते. आमच्यावर झालेल्या बलात्काराची साधी विचारपूस सुद्धा होत नाही. उलट दुसऱ्या दिवशी नव्याने तेच दुखणं घेऊन ह्या नावापुरता असलेल्या समाजात हसत वावरावं लागतं. मी सगळं विचार करून निघालोय ग घर सोडून. अजून किती बोललो तरी कमी पडेल .

पन्ना आणि त्यांचं बोलणं चालू असत. तेवढ्यात एक व्यक्ती सांगायला येते की कोणीतरी व्यक्ती आली आहे तुम्हाला भेटायला संस्थेमधील आहे महत्वाचं काही बोलायचं आहे. आतमध्ये पाठवू का?

पन्ना मानेनेच होकार देतात....( नुकताच आयुष्मान खुराना आणि वानी कपूर चा एक सिनेमा प्रकाशित झाला आहे. चंदिगढ करे आश्की जमल तर नक्की बघा. मला कोणत्या चित्रपटाचं प्रमोशन करायचं आहे म्हणून सांगत नाही तर त्यातले काही डायलॉग आवडले.

एका transgender चा डायलॉग आहे.

शेक्सपियर ने क्या बोला था?
What\"s in a name?
a rose By any other name would smell as sweet."
English मे B.A हु
दो टूक बात बोलती हूं हिंदी में समझ ले।
लेबल गया तेल लेने।
गे, बाय, ट्रांस के फरक पडता है..
काटा लगा तो लगा..


आणि

एका डॉक्टर चा डायलॉग आहे.

इंसानों का पुरुष या औरत होना।
दिमाग डिसाइड करता हैं, शरीर नहीं।
मानवी का शरीर बेशक लड़के का था लेकिन उसका दिल, दिमाग और सोच सब औरत का हैं। )

मैं जो हूं वो हूं
And
I never ashamed of it....

To Be Continued....
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

शरयू

Blogger

Complicated to understand ???? Rider Something ????️

//