कॉलसेंटर भाग -1

सामाजिक गोष्ट

भाग -1


" हेय ड्युड.. उठ ना आता शिफ्ट ला जायचं आहे ना ?" अपेक्षा रियाला उठवत होती.


अपेक्षा आणि रिया दोघी फ्लॅटमेट असतात, आणि दोघीपन एकाच ठिकाणी कामाला असतात. तेही कॉलसेन्टर मध्ये.


कॉलसेन्टर मध्ये आज नेमक्या दोघींच्या एकत्र शिफ्ट असतात, नाही तर वेगवेगळ्या.

रिया हीच दिल्लीच राहणीमान होतं म्हणजेच मुंबई बाहेर. जॉब ची कमी आणि पगाराची हाणामारी म्हणून तिने मुंबई धरली कामासाठी. आई वडील दिल्लीत आणि ही मुंबईत.


अपेक्षा ही मुंबईचीच राहणारी आई वडील, भाऊ आणि ही. पैशांची कमतरता म्हणू शकत नाही पण कॉलसेन्टर बरं म्हणून जॉईन केलेल.


" हा यार थोडं थांब ना ! एकतर दोन दोन शिफ्ट करुन डोक्याला शॉर्ट झाला आहे. प्लीज झोपूदे थोड्या वेळ..!" आणि ती पुन्हा पांघरून घेऊन झोपते.


" बरं तु झोप, मि जाते वॉक ला. आल्यावर गरम चहा करते, उठ पण उठवायला लावु नकोस !" आणि ती वॉल्क ला निघून जाते.


काही वेळाने अपेक्षा वॉक वरून येते, ह्या मॅडम अजून झोपलेल्याच होत्या. चांगल्या घोरत होत्या, ती जोरात थाप मारते, " आई गं,,, सकाळी सकाळी का गं झोपेची खोबरं करते.!" रिया डोळे चोळत चोळत उठते. हातात मोबाईल घेते आणि पुन्हा तो बेडवर रागाने टाकते.


" क्या हुआ.. इतकं चिडायला काय झालं ? मोबाईल का टाकलास असा? " अपेक्षा विचारते.


" चिडू नाही तर काय करू ! अजून पगाराचा मॅसेज नाही आला ! घरी सुद्धा पैसे पाठवायचे आहेत !" रिया वैतागलेली असते.


" ह्म्म्म, अजून पगार नाही आला सांग ना, कधीतरी उशीर होणार ना ? " अपेक्षा बोलते.


"तेच तर ना ! गेल्या मंथ मध्ये पण नाही गेले ना पैसे ! माँ चिडली आहे खुप !" आणि ती चहा घ्यायला उठते.


अपेक्षा तिला चहा आणून देते , " थँक्स " रिया म्हणते. आणि चहाचा घोट घेत कप तोंडाला लावते. 


" बरं आता चहा घे होईल पगार ! डोन्ट वरी..!" अपेक्षा तिला धीर देत.


दोघीही फ्रेश होऊन, ऑफिससाठी निघतात. अपेक्षा दाराला कुलूप लावणार तितक्यात घरमालक येतो, " बरं झालं लवकर आलो, नाही तर आज ही सापडल्या नसत्या दोघी !" घरमालक निलेश हा नेमका त्यांना ऑफिस ला निघायच्या वेळेला भेटतो.


" आया कमिना..!" रिया तोंडातल्या तोंडात पुटपुटते.


" काय म्हणालीस ? " निलेश रियाला विचारतो.


" नाही काही नाही, ते घर भाड्याचं ना लवकरच देतो. " अपेक्षा मुद्दाम मध्येच बोलते, कारण तिला माहित असतं रिया गरम डोक्याची आहे नि आता तोह घरभाडे घ्यायला आला आहे ते. 


निलेश हा वयाने पन्नाशीचा होता, त्याला गेल्या महिन्याचं पान भाडं गेलेलं नसतं. कसं जाणार कामावर पगार पाणीच मिळाला नव्हता.


" बरं झालं तूच विषय काढलास, नाहीतर ह्या रियाशी बोलण्यात काय मतलब ! मला ह्या दोन दिवसात भाड हवं नाही तर रूम खाली करा बस !" आणि तो तवातवा ने निघून जातो.


" क्या टकलू घमेंडी कुठचा..!" रिया तो जात नाही तर पाठून बडबडते.


" जाऊदे गं,,, त्याचं ही भाड थकलं आहे. तो बोलणारच ना, सोड उशीर होतोय.. आजच मरण उद्यावर गेलं ना ?"

अपेक्षा बोलते आणि दोघीजणी ऑफिससाठी निघतात.


अपेक्षा आणि रिया ऑफिस पोहचतात, चेकिंग करुन दोघी आत जातात. " साला तु बोललीस म्हणून, नाहीतर आज सकाळीच मि त्याला पाहिलं असतं..!" रिया ची फारच बडबड चाललेली असते.


तेवढ्यात, " हेय ड्युड.. आज पासुन नवीन मुलगी रुजू झाली आहे !" रितेश त्या दोघींना थांबवत सांगतो.


" ले.. इथे पगार नाही नि स्टाफ रुजू करतायत ! "आणि अपेक्षा हसायला लागते.


रितेश गोरा, अंग काठी जाडसर, नेहमी शर्ट मध्ये असणारा त्याला सवय होती जीन्स वर शर्ट घालायची. तोही त्या दोघींच्या ग्रुप मधला खबरीच होता. जणु रियानेच त्याला ठेवलं आहे असं वागायचा.


" चला पाहू तरी कोण आहे...? " रिया बोलते. आणि त्या नवीन मुलीच्या जवळ जाते.


" हेय.. मि रिया.. " स्वतःची ओळख करुन देतं.


" मि पायल.. पायल शर्मा.. " ती स्वतःच नाव सांगत ओळख पटवून देते.


" सो पायल मि अपेक्षा,, तुझं ह्या ऑफिस मध्ये वेलकम आहे.. ट्रेनिंग सुरु होईल... तुला माहीतच असेल ना..?"

अपेक्षा बोलते.



क्रमश...

🎭 Series Post

View all