कर्माचा हिशोब (लघुकथा)

दारुच्या नशेत असतानाही सुशिलने छेड काढणा-यांच रक्तच काढल होत. त्याच्या त्या एका कर्मामुळ तो आज चार महिन्यानी सुटला होता. माणस पाहुन आपण भेदभाव करतो, कर्म नाही.

पोलीस स्टेशनच्या पायरीजवळ येउनं ती थांबली होती. तीन चारच पाय-या असतील त्या, पण त्याही चढण्याची हिम्मत तिच्यात होत नव्हती.

तरी तिला आत तर जाव लागणार होतच. कारण त्याच्याशिवाय तिला दुसर तरी कोण होत.

ती आतमध्ये गेली. तिला समोरच नेहमीचे इन्स्पेक्टर दिसले.

“खुप प्रयत्न केले साहेब, पण… “ तिला तिचा हुंदका आवरता आला नाही.

“अहो ताई, आता मी तरी काय करु??” इन्स्पेक्टर.

इकडे तिच्याकडे हात जोडून उभा राहण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग तिला दिसत नव्हता.

ती रमा. तिच्या नव-याला दारुच व्यसन होत. त्याच्या नव-याच्या दारुच्या व्यसनापासून त्यांचे नातेवाईक तुटले होते. पण शेजारचे चांगले होते.

तो सुशील. कितीही दारुच्या नशेत असला तरी त्याने कधीही त्याच्या बायकोवर हात उचलला नव्हता. की कधी शेजारी पाजारी गोंधळ घालून कोणाला त्रास दिला नव्हता.

तो न त्याची दारु इतकच. एक दारु सोडली तर तो तसा माणुस म्हणुन चांगला होता.

चार महिने होत आले होते. तो पोलिस स्टेशनच्या लॉकअप मध्ये होता. न त्याला कोर्ट मध्ये हजर करत होते नाही त्याला सोडत होते. नक्की काय चालु होत त्यांच त्याचा काहीच पत्ता ते पोलीस रमाला लागु देत नव्हते.

बसस्टॉपजवळ सुशिल उभा होता. तर त्याच्या बाजुला ऊभी असलेल्या मुलीने सुशिल वर विनयभंगाचा आरोप केला होता. सुशिल ने पोटतिडकीने खर सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण गरीब आणि व्यसनाधीन माणसाच्या बोलण्याला काहीच किंमत दिली गेली नव्हती. त्यांच्या शेजारच्यांनी देखील सुशिलची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची कोणीच ऐकल नाही. तेव्हापासून रमाच्या पोलीस स्टेशनच्या वा-या सुरू झाल्या होत्या.

रमाने त्या मुलीला रिक्वेस्ट पण करुन पाहीली पण तिनेही तिचा अॅटीट्युड दाखवला.

“तुमच्यासारख्या गरीबांची हीच लायकी आहे.” ती मुलगी.

रमा निराश होऊन परत त्या पोलीस स्टेशनला आली होती.

त्या इन्स्पेक्टर ने रमाला बाजुला व्हायला सांगीतले. जिल्हयाचे पोलीस कमिशनर त्या पोलीस स्टेशनच्या व्हीजिट साठी आले होते. रमाने त्यांच्याशी बोलण्याचे ठरवले.
ते कमिशनर आल्या आल्या आतमध्ये निघुन गेले. रमाला त्यांना भेटुच दिल नाही.

कमिशनर साहेबांनी बसल्या बसल्या पोलीस स्टेशन ला रजिस्टर झालेल्या सर्व केस तपासायला घेतल्या. त्यात त्यांना सुशिलविरुध्द फक्त तक्रारीची नोंद आढळली, जी चार महिन्यापुर्वीची होती.

“ह्याला कोर्ट मध्ये हजर का नाही केल अजुन??” कमिशनर.

“ते त्याने त्याचा गुन्हा कबुल नाही केला.” इन्स्पेक्टरला आता घाम फुटला होता.

कारण ते कमिशनर साहेब कोणतीही पुर्वसुचना न देता आले होते. मोस्ट हॉनेस्ट पोलीस कमिशनर म्हणून त्यांची ओळख होती. कामात एकदम सिन्सीअर. म्हणून त्यांच्या तीन वर्षाच्या आतच सतत बदली होत होती. त्यांनी नुकताच त्या जिल्हयाचा पदभार स्विकारला होता.

“मग त्या मुलीला बोलावून एफआयआरची नोंद का नाही केली?” कमीशनर

“तीला बोलावल होत, पण तीच आली नाही अजुन??” इन्स्पेक्टर

“काय आटापाट्या खेळायला बोलावत होत का?? आली नाही तर पुढे काहीच केल नाहीत ते. समजा तो माणूस निर्दोष ठरला तर त्याच्या चार महिन्याची जबाबदारी कोण घेईल?? कमिशनर साहेब आता गरजले होते. “तुमच्या घरचा माणुस असता तरी असच केल असत का??

“तस नाही साहेब” इन्स्पेक्टरची बोबडीच वळली होती.

“जा घेऊन या त्याला माझ्यासमोर.” कमीशनर.

सुशिलला जस समोर पाहील तस त्यांना शॉकच बसला.

“ह्या प्रकरणाची सर्व माहीती, पुरावे, साक्षीदार मला दहा मिनिटाच्या आत पाहीजेत” कमीशनर “चार महिने झाले जमा केलेच असतील न??”

तस त्या इन्स्पेक्टर ने त्या प्रकरणाची सर्व माहीती त्या कमीशनरला दिली.

“हे काय??” कमीशनर “फक्त ह्या माहितीवर त्याला चार महिने आत ठेवल आहे??

“नाही ते साक्षीदार होते न” इन्स्पेक्टर

“पुढच्या तासाभरात मला ती मुलगी आणि ते साक्षीदार समोर पाहीजेत.” कमीशनर

सुशिलला तर काय चालु होत तेच कळत नव्हत. त्या आरोपानेच तो खचून गेला होता. जो त्याने केलाच नव्हता.

ती मुलगी आणि साथीदार येईपर्यंत कमीशनर साहेब त्या भागात गेले आणि आजुबाजुची, बसस्टॉपची सीसीटीव्ही फुटेज काढली. बाजुच्या दुकानात चौकशी केली. तशी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. कमिशनर साहेब परत त्या पोलिस स्टेशन ला आले. तोवर ती मुलगी आणि साक्षीदार येऊन पोहोचले होते.

“हममममम तर तुझी छेड त्याने काढली?” कमीशनर

“हो साहेब, नको तिचे हात लावत होता. मी झिडकारल तर माझ्यावरच धावुन आला.” ती मुलगी.

“मग चार महिन्यापासून तु पुढे काहीच चौकशी केली नाहीस.” कमिशनर साहेबांनी प्रश्नार्थक चेह-याने विचारल होत. तशी ती चपापली.

“बर ते जाऊ दे. हे बघ” कमीशनर साहेबांनी सीसीटीव्ही फुटेज चालु केली. तस त्या मुलीचा आणि साक्षीदाराची चेहरा पांढरा पडला. बसस्टॉपचा सीसीटीव्ही जरी बंद पडलेला होता तरी त्याच्या समोरच्या बाजुला असलेल्या सीसीटीव्ही ने सर्व रेकॉर्ड केल होत.

“आणि तु रे, साक्षीदार म्हणतोस न?? तु तर त्यात दिसतच नाहीये. एकदम शेवटी आलेला दिसलास.” कमीशनर

दोघेही गप्प बसले.

“ह्या दोघांनाही ताब्यात घ्या. पोलीसांची दिशाभुल आणि चोरी करण्याच्या आरोपाखाली.” कमीशनर

“साहेब एक विचारु??” हवालदार

“हा बोल” कमीशनर

“तुम्हाला कस माहीती की तो निर्दोष आहे??” हवालदार

“एकवेळ एखाद्या लेडीज वर आलेला हात तो मोडेल, पण कितीही नशेत असु देत तो  लेडीज समोर फक्त हातच जोडेल.” कमीशनर

त्यांच्या डोळ्यापुढे ती रात्र आठवली. सुट्टीसाठी ते आले होते. त्यांच्या मुलीने त्या रात्री कॉल केला होता. ती आणि तिची मैत्रीण रात्री पार्टी वरुन परत येताना, त्यांची गाडी बंद पडल्यामुळे अडकल्या होत्या.

त्यावेळी चार जणांच्या टोळक्यांनी त्या दोघींना छेडायला सुरवात केली. रात्रीची वेळ असल्याने रस्त्याला कोणीच नव्हते. त्यावेळी नेमका सुशिल बार मधुन नशेतच घरी चालला होता. त्याने ते पाहील आणि त्या टोळक्याला अडवायचा प्रयत्न केला. पण ते काहीच ऐकायचा मनस्थितीत नव्हते.

हा बेवडा काय करणार?? ह्या विचाराने त्या टोळक्याने त्यांचा मोर्चा परत त्या दोघींकडे वळवला.

मग सुशिल ने रागाच्या भरात त्याच्या हातातील दारुची बॉटल फोडली आणि अर्ध्या फुटलेल्या बाटलीने त्या टोळ्यांवर धावुन गेला. कोणाच्या हातातून, तर कोणाच्या कमरेतून, पोटातुन रक्त वहायला सुरवात झाली होती.

नशेत असुनही त्याचा रुद्रावतार पाहून त्या टोळक्याने तिथून पोबारा केला.

सुशिलने त्या मुलींकडे पाहील, “दिदी म.. म.. मा… . प कर. त्यांचा… कड… न म.. मी मा… पी… मागतो.”

सुशिल त्यांच्यासमोर हात जोडून उभा होता.

“बोलला फोन कर… ुन कोणा.. तरी” सुशिलने त्याचा फोन त्या दोघींना दिला. तिचे वडील येईपर्यंत सुशिल तिथेच ऊभा होता.

कमीशनर साहेबांची तंद्री तुटली.

“खुप आदर आहे त्याला स्रियांविषयी.” कमीशनर “कधी त्याच्या चाळीत जा, समजेल तुम्हाला. तिथ कोणाला बाहेर जायच असल न, तर त्यांच्या घरची मुल मुली सुशिल सोबतच असतात. तो दारु फक्त रात्री पितो. दिवसा नाही. बसस्टॉपजवळ पण ती मुलगी चोरीच करत होती. तीला प्रामाणिकपणे विजयने अडवल होते. त्याचा राग धरुन त्या मुलीने हे अस केल.”

“हो त्याच्या चाळीतली माणसे आली होती.” हवालदार “पण त्या साहेबांनी काहीच ऐकुन घेतल नाही त्यांच.”

“बोलव तुझ्या त्या साहेबांना” कमीशनर.

हवालदार इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवायला गेला.

“येस सर” इन्स्पेक्टर साहेब.

“कोणती चौकशी केली होती तुम्ही. माझ्या चौकशीत तर तो निर्दोष दिसला.” कमीशनर साहेब त्यांच्या कडे नजर रोखत बघत बोलले. “तुमच्या हलगर्जीपणा मुळे एक निष्पाप माणुस चार महिन्यांपासून जेल मध्ये सडतोय, याच काय उत्तर आहे तुमच्याकडे??”

इन्स्पेक्टर गप्पच ऊभा राहीला.

“एक आठवड्यासाठी मी तुम्हाला ससपेंड करतोय.” कमीशनरसाहेब.

त्यांची काम करायची पद्धतच अशी होती. चुक सापडली की तात्काळ शिक्षा.
कमीशनर साहेब बाहेर आले आणि सुशिल च्या खांद्यावर हात ठेवला. सुशिल जरा दचकला होता.

“जाऊ शकतोस रे तु घरी.” कमीशनर साहेब “फक्त तुझी दारु सोड.”

कमीशनर साहेब एवढ्या काळजीने का बोलत आहेत ते सुशिलला कळल नाही. पण त्याने होकारार्थी मान हलवली.

आपण सुटलोय याचा आनंद त्याला जास्त झाला होता. दुखा:च्या अश्रूंत रडणारी रमा आता आनंदाश्रूत रडत होती.

“खुप उपकार झाले तुमचे साहेब” रमाने त्या कमीशनर साहेबांना हात जोडले.

“माझे कसले उपकार, त्याने केलेल्या कर्माची परतफेड होती ती. एकवेळ हिशोबात आपण चुकु पण कर्म त्याचा हिशोब कधीच सोडत नाही” कमीशनर साहेब “जा, याला निट घेऊन जा.”

तसे ते दोघ एकमेकांचा हात घट्ट पकडून त्यांच्या घराकडे आनंदात निघुन गेले.

समाप्त.