चाहूल तुझी..

Cahul Tuji


चाहूल तुझी...

रागिणीला त्याने ह्या बाळातपणात तिच्या माहेरी सोडून द्यायचा विचार केला.

दोघे आज बराच वेळ एकमेकांना भांडत होते..

तिला माहेरी जायचे नव्हते, तर तिला पहिले बाळंतपण सासरी करण्याची इच्छा होती.

तो म्हणत होता की,तू आता माहेरी जा तुझी इथे काळजी घेणारे कोणी नसणार...मी ही नसणार मग आईने का म्हणून तुझा त्रास सहन करायचा.

अरे मला माहेरी उलट आराम मिळणार नाही, तिथे वहिनी ही त्यांच्या बाळांत पणाला आल्या आहेत मग आई कोणकोणाचे सोहळे पुरवेल.. आणि खर्च होईल तो वेगळा.. म्हणून मी इथे राहून माझे बाळांत पण करू म्हणते. माझ्या अकाउंट मध्ये आहेत शिल्लक काही पैसे..ते दवाखान्याच्या खर्च म्हणून वापरू..पण फक्त सासबाई च्या निगराणी खाली माझे हे बाळंतपण करू.. तू समजून घे..आणि होकार दे.....ती


नको माझं ठरलंय तू तिकडे जाऊन तुझे बाळंतपण करून घे, तुझ्या आईला हे करायला हरकत नाही..मुलीचे सोडून सुनेचे बाळंतपण करु शकतात..त्यांनी खरे तर सूनेला तिच्या माहेरी पाठवायला हवे होते.. जो तो आपल्या घरी गेला तर जीची तिची आई अधिक चांगली काळजी घेईल..तो

अरे इथे सगळ्या सुविधा आहेत..दवाखाना जवळ आहे.. तिकडे दवाखाना लांब आहे..आणि ऐनवेळी डॉक्टर ही नसतात.. इथे आपला नेहमीचा डॉक्टर आहे..त्याला माझी हिस्टरी माहीत आहे..काय हवे नको ते चांगल्या प्रकारे त्यांना माहीत आहे.. मग काही काळजी नाही. तिथले डॉक्टर पुन्हा सगळ्या चाचण्या करायला सांगतील..मग सगळे खर्च ते आई कशी भागवणार ,थोडा तरी विचार करू आपण..ती

नको.. नकोच.. नको...तू काही कसे कळत नाही आपला ही खूप खर्च झालाच आहे ना त्यात हा खर्च कसा करू मी ..इतका पगार आहे का मला..तसे ही तुझ्या वहिनीने तिच्या घरी जावे.. तुझी जागा अडवून बसली आहे म्हणून तुला तुझ्या माहेरी जाता येत नाही..

ही चर्चा अजूनच गहन आणि serious होत होती.. ती आडून होती तिला तिचे मुलं इथे शहरात जन्माला घालायचे होते.. कारण ही तसेच होते..गावाकडे पाणी चांगले नव्हते तर एकीकडे खूप कडक उन्हाळा तिला सहन होण्या पलीकडे होता...

पण तिचे काही एक चालेना, अन शेवटी तिला तिच्या माहेरी जावे लागत होते.. आईला आता माझा ही त्रास होणार ,माझे आणि वहिनीची बाळंतपण करून ती पुरती थकणार होती..आणि अश्यात तिला दम्याचा त्रास ,त्यात मदतीला कोणी नाही..तिला दोन्ही महत्वाचे बाळंतपण होते.. लेक काय आणि सून काय दोघी आपल्याच नातवांना जन्म देणार होत्या..एक ह्या घरचा आंनद द्विगुणित करणार होती तर दुसरी त्या घराचा आंनद द्विगुणित करणार होती..

----------------

काही दिवसांपूर्वी जेव्हा महेशला समजले की रागिणी आई होणार आहे तेव्हा त्याच्या आनंदाला थारा नव्हता.. त्याला तिच्यासाठी काय करू अन काय नाही असे झाले होते.. त्याचे पाय जमिनीवर नव्हते.. तो बाबा होणार ह्या आनंदात त्याने गावभर पेढे वाटले होते..सगळीकडे ही खुश खबर खात्री करून सांगितली होती

महेश खुश होता की तो बाप होणार ,कोणी तरी सगळ्यात छोटे घरात येणार,धुडूधुडू घर भर धावणार, जोतीष याने सांगितल्या प्रमाणे सगळे होत होते, तसे त्याने सांगितले होते की वंशाचा वारस मुलगाच होणार..त्यांच्या घराण्यात या आधी पहिला मुलगाच झाल्याचा इतिहास होता.. तो ही पहिला मुलगाच..काकाला ही पहिला मुलगाच.. आत्याला ही पहिला मुलगाच..ताईला ही ..मग आता मला ही मुलगाच होणार.. आणि मग तो वंशाचा वारस असणार... माझे नाव पुढच्या पिढीपर्यंत असणार..

त्याने रागिणीला एकदम उचलूनच घेतले आणि तिच्या कपाळची पापी ही घेतली, तिकडे सासूबाई खूप खुश होत्या ,त्यांना ही वाटले आता सगळ्यांना मुलगा झाला आपल्या महेश ला ही पहिला मुलगा होईल... त्याचा वंश पुढे जाईल..
त्याने वर्षात मुलं होऊ देण्याचे ठरवले आणि नशीब काढले..सासू ने सून बाईची लगोलग दृष्ट काढली..तिच्या वरून मीठ उतरून काढले.. तिला आता आराम करायला सक्ती केली.. फळ आणि चांगले चांगले तिच्या आवडीचे घरात येऊ लागले... तिची बडदास्त ठेवण्यात सासूबाई काही कमी करत नसत.. तिची सेवा करत..तिला पौष्टिक जेवण रोज करून खाऊ घालत.. गीता रामायण वाचवून दाखवत.. गर्भ संस्कार चांगले झाले तरच मुलगा ही चांगला जन्माला येतो..हुशार आणि नाव काढणार पैदा होतो..

आजीने एकदा सहज सुनेच्या पोटावर देवाचे जप केलेले पाणी लावले तर तिकडून बाळाने पाय मारले आणि आजीला तो स्पर्श लागताच तिला गगन भेदि आंनद व्हावा असा आनंद झाला होता, मग तिने परत एकदा ते पाणी लावले आणि परत त्याने लाथ मारली ,आणि आजीला खूप गहिवरून आले.. तीने सुनेला आशीर्वाद दिले.. मनात मनातून बाळाला ही खूप आशीर्वाद दिले..

मग आजी रोज त्या देवाच्या कलशातील पाणी लावण्याचा बहाण्याने बाळा जवळ येऊ लागली, स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हणून त्याला हात लावू लागली, तशे ते बाळ रोज लाथ मारत होते.. जणू आजीला ते आता ओळखू लागले होते आणि त्याची आणि आजीची बट्टी जमली होती..

रागिणी कधी कधी सासूबाई कडे आशाळभूत नजरेने बघत होती ,तिचे डोळे काही तरी सांगायचा प्रयत्न करत होते.. सासूबाईला ते कळत होते..पण काय सांगायचे असेल तिला हे कळत नव्हते..

सासूबाई दारातून परत आल्या तशी रागिनीची नजर खाली वळली... त्या म्हणाल्या ," बाळांत बाईने असे काही मनात ठेवू नये बर..जे असेल ते बोलून मोकळे झाले की मनावर कसला ताण रहात नाही..तू बाकी समजदार आहेस.. कधी काही वाटले तर निसंकोच पणे सांगशील..अगदी काही ही.."

रागिणीला मनातले सांगता येत नव्हते पण ते ओठावर आले होते.. पण तिने ते हुंदक्या सोबत गिळून घेणे योग्य समजले होते..

सासूबाई ,"मी ही ह्यातून गेले आहे ग बाई ,बाळा ला जन्म देणे सोपे नाही ..तिच्या मनाची,तिच्या आनंदाची ,तिच्या तब्येतीची कोणी काळजी घेत नसते...काळजी बाळाची असते म्हणून बाळाच्या आईची घ्यावी लागते हो... आणि मला विचारशील तर मला मुलगी ....( सासू पुढे काही बोलल्या नाहीत..आणि निघून गेल्या ,नेमके काय म्हणायचे होते त्यांना..मुलगी हवी की मुलगी नको ,काय सांगायचे होते ).


इकडे रागिणीला ही आई होण्याचा खूप आंनद झाला होता.. ती खूप खुश होती..एका बाळाच्या येण्याने तिची किंमत एकदम वाढली होती.. तिला किती मान मिळत होती..तिची काळजी घेतली जात होती.. तिला आनंदी ठेवण्याचा काटो काट प्रयत्न केला जात होता.. सासुबाई कधी नवत खुश दिसत होत्या.. घर प्रसन्न प्रसन्न वाटत होते.. सगळी कडे चहळ पहल होती... नवरा रोज मोगऱ्याचा गजरा आणून तिच्या वेणीत माळत होता.. किती गोड होते हे अनुभव जणू एक दिव्य स्वप्न जणू..तिला हे दिवस संपुर्ण पणे जगून घ्यायचे होते मनात साठवायचे होते.. असे जणू अमूल्य अत्तर आणि त्याचा सुगंध दरवळावा आणि तृप्ती तृप्ती व्हावी असे काही से तिला वाटत होते... मन म्हणत होते असे सासर सुख बाई..असे सासर सुरेख बाई...

अशी सासू आई जणू...
असा नवरा राम जणू...
असे सुख कायम राहो...
बाळाचे पायगुण माझ्या अंगणी लाभो..
माझे सुख तुला लागो...
माझे आयुष्य तुला देव देवो...


जसे जसे दिवस जवळ येत होते तशी तशी तिचा आनंद जणू चिंतेत बदलत होता... कुठे तरी तिला एक चाहूल लागली होती...घरात मुलगा नाही लक्ष्मी येणार..मला मुलगी होणार... किंवा मुलगीच झाली तर काय होणार..

ती महेश ला झोपेतून उठवते...

तो थकून झोपलेला असतो..तिच्या आवाज देण्याने लगेच जागा होतो...

तो....अग काय होतंय...काही होतय का तुला.. चक्कर ,उलटी, मळमळ, नेमकं काय होतंय..तू ठीक आहेस ना..जायचंय का डॉक्टर कडे..

ती... नाही अरे, मला कस तरी होत आहे.. माझे मन थाऱ्यावर नाही रे..

तो..अग नेमकं काय ,आणि कश्या मुळे असं होतं आहे ,काही स्वप्न पाहिलेस का तू..तुला काही त्रास होत आहे का..

ती... नाही रे,तुला कसं सांगू ,तू नाही समजून घेणार माझं दुखणं काय आहे ते..

तो...अग राणी ( तिच्या डोक्या वरून हात फिरवत ,तर कधी तिच्या पोटावरुन हात फिरवत ) मला सांग आपला मुलगा त्रास देत आहे का तुला, पोटात लाथ तर मारत नाही ना ??

ती... अरे तू परत तीच चूक करत आहेस ,तुला कसे समजू ,कसे सांगू

तो... बाळाला काही त्रास तर नाही होत ना, तू उठ बरं ,खरे खरे सांग ,जे मन चल बिचल करत आहे ,ज्यामुळे तुला उदास होत आहे ते बोल बघू, मी सगळे ऐकून घेईल..अगदी जुना कसला राग असेल आणि तो तुझ्या मनात असेल तरी मी सहन करेन..तू फक्त बोल..हवे तर भांड..पण बोल..कारण ह्यामुळे माझ्या मुलावर काही कसलाच परिणाम नको व्हायला..

ती...... गप्प झाली आणि रडू लागली..

तो... रागिणी काय होतंय ,आता सांगतेस का मला ( ओरडून )

ती....रडून ,तू ओरडू नकोस ना असा माझ्यावर.. मला आधीच भीती वाटतेय..

तो....अग कसली भीती वाटतेय तुला ,

ती.... अरे तुझ्या माझ्यावरील अति प्रेमाची आणि तू घेत आहेस त्या अति काळजीची...नको इतके प्रेम करू नको इतकी काळजी करू..

तो....अग मी ह्या अवस्थे तुझी काळजी करणे सहाजिक आहे ,आणि ही काळजी तुझ्यासोबत माझ्या मुलाची ही आहे समज...

ती... माझ्या मुलाची ?? म्हणजे जे मुलं होईल त्याची मी कोणी नाही ,कोणी नसेल का ??

तो... अग वेडा बाई ,मला तसे नव्हते म्हणायचे.. ते आपले मुलं असणार.. आपला मुलगा ,आपला दिवा, वंश असणार तो..

ती... इथेच तर चुकत आहेस तू..तुला काय माहीत तो मुलगाच असणार आहे.. जर ती मुलगी असली तर...जर ती लक्ष्मी असली तर... मग ती तुझी नसणार का??

तो तिचा हात झटकून उठतो आणि तिच्या कडे रागाने बघतो... तो खूप रागात असतो.. तिला काय सांगायचे होते हे त्याला समजते..तो तिच्या अवस्थे कडे लक्ष देत नाही..आणि तसाच झोपी जातो..

ती इकडे रडत बसते आणि तिला खूप उदास होते तर त्यामुळे अजूनच रडावे वाटते.. आता तिला खरा अर्थ कळतो ,त्याच्या चांगल्या वागण्या मागचा... ही काळजी हे प्रेम तिच्या साठी किंवा मुलगी असे तर येणाऱ्या मुलीसाठी नव्हे तर ते फक्त मुलासाठी ,तो व्हावा आणि तो च असेल हे समजून हा प्रेम करत आहे... साधे मुलगी झाली तर म्हणाले आणि त्याने तोंड फिरवून घ्यावे..

तो उठतो आणि म्हणतो, तू तुझे हे बाळ माझे घरी मला नकोय ,तू तुझ्या माहेरी जा, उद्या सकाळी तुला मी तिकडे सोडून येतो...हो मुलगी असेल तर मी काडीचा खर्च करणार नाही...तुझ्या आईकडून हा खर्च करून घे...परत मुलगी झाल्यावर इथे येऊ ही नको...

मग सकाळी ती उठते आणि अंगणात सकाळचे कोवळे ऊन बाळाला मिळावे म्हणून घ्यायला येते.. तर सासूबाई तिला पाहून लगेच छान गरम केलेले पण कोमट तेल घेऊन येते आणि तिला मालीश करायला पुढे येते...

सोबत छान मोगऱ्याचा आणि चाफ्याचे फुल तिला हातात देऊन त्याच मंद सुगंध घ्यायला सांगते... तशी ती जरा प्रसन्न होते.. काल रात्री जे घडले त्यामुळे ती नाराज असते.. त्यातून ती बाहेर येते..

सासूबाई ," काळजी घे,उगाच मनात काही दुःख ठेऊ नकोस ,देव योग्य तोच करत असतो ,आपण किती ही ठरवू दे ,त्याला जे हवे असते तेच तो देतो मग मुलगा असो की मुलगी असो, आणि मी तर माझ्या नातीसाठी ही तयार आहे.. माझी आणि तिची छान बट्टी जी जमली आहे... नात असली तरी सुख सोहळा आणि नातू असला तरी सुख सोहळा असणार माझ्यासाठी. "

इकडे आईचे बोलणे ऐकून तर महेश अजूनच भडकतो ,त्याला आईची ही वाणी अजिबात पटलेली नसते.

" तू ही मुलगी व्हावी असे म्हणतेस आई ,अग मुलगी काय कामाची ,तिला वंशाचा दिवा कसे म्हणणार, त्यासाठी मुलगाच हवा. " तो

" अरे मी माझे दिवस आठवते ,जेव्हा मला पहिली मुलगी सांगितली होती आणि सगळ्यांनी तिला जन्म देण्यापासून अडवले होते ,मी नको म्हणत असताना तिला ह्यांनी मारले होते अगदी double डॉस देऊन..त्याचा मला किती त्रास झाला होता ते कोणालाच नाही समजला ,मी मानसिक रित्या आजारी पडले होते, मग काहि महिन्यांनी तुझा गर्भ राहिला, आणि बाकीच्यांचे विचारशील तर आत्या,काकू,आजी,यांना ही पहिल्या मुलीचं राहिल्या होत्या ,आणि त्यांनी ही त्यांच्या मनावर दगड ठेऊन त्या मुली पडल्या होत्या, पण सांगताना सांगतात की आमची खासियत आहे आमच्या घराण्यात पहिला गर्भ मुलाचा च राहतो, खोटारडे सगळे "


आई हे सांगत असताना सगळेच हादरले होते ,महेश ही हादरला होता ,त्याला आता वाईट वाटत होते की आपल्या जन्मासाठी आपल्या बहिणीला मारून टाकले होते.. हे फक्त एक बहिणीच्या बाबतीत नाही तर अश्या तीन बहिणी मारल्या होत्या...

त्याला आपला जन्म आता का झाला असे वाटत होते, क्या त्या आईवर बेतली असेल ,काय आत्याने आणि काकूने सहन केले असेल...जेव्हा आपल्या मनाविरुद्ध होते तेव्हा किती राग किती संताप होतो मग त्यांचे काय झाले असेल..

त्याने आता ठरवले होते ,मी माझ्या मुलीला जन्म देईल ,तिला हे जग दाखवणार आहे.. तेव्हा कुठे सगळ्या मारून टाकलेल्या बहिणींना शांती मिळेल..

तिला आता आईच्या बोलण्याने रडू आले होते ,किती मनस्ताप होता हा,किती आघात केला होता त्यांच्यावर, काय चूक होती त्या मुलींची की त्यांना वंशाच्या दिव्यासाठी विझवून टाकावे लागले होते. .

तो जवळ आला आणि त्याने तिला वचन दिले की आपली मुलगी अशी बळी ठरणार नाही... ती हे जग बघेल..मी तिला हे जग दाखवणार..



---------------