निवडुंग काटेरी (भाग ८)

निवडुंग घरात आणते दुर्देव


निवडुंग काटेरी (भाग ८)


मालाचे हे वागणे बघून तात्यांना हाय खाल्ली. ते वरचे वर आजारी पडू लागले. तसाही दम्याचा त्रास होताच म्हातारपणात तो वाढला. संगितावहिनी पण अधेमधे आजारी पडत होत्या. त्यांच आजारपण जास्त मानसिक होत. त्यांना थकवा आला की त्या काहीही करू शकत नसतं. मग सगळा भार सुधावहिनींनवरच पडे. तशा सुधावहिनी खुटखुटीत होत्या, पण त्यांची वय होतच की ऐशीच्या पुढे.

एकदिवस शेजारच्या वरून फेसबुक/ इंन्साग्रामवरचे मालाचे फोटो दोन्ही आजींना दाखवले. पहिल्यांदा त्यांचा विश्वास बसेना, पण मग पटले. सगळे फोटो लहान तोकड्या कपड्यातले होते. सगळ्या अंगाचे प्रदर्शन होत होत. ते बघून संगितावहिनीना राग अनावर झाला. शरू गेल्यावर त्या नुसत्या रडत बसल्या. सुधावहिनींना म्हणाल्या, " निलीमाच्या उलट म्हणून ह्यांनी हौशीने हीच नाव मालिनी ठेवलं. वाटलं होत. पोरगी मोठी होईल, निलीमाच नाव काढेल. पण हीतर कुळबुडवीच निघाली. काही नाही आता आपण हिची फिकीर करायची नाही. लग्न तरी करणारे की नाही देव जाणे. आपण तिघेही आता थकलोय. आता होत नाही. हीच वागणं ही आता सहन होण्या पलिकडे गेले. आपण आता वृद्धाश्रमात जायचा निर्णय घेऊ. कुठेतरी कमी पैसे घेणारा वृद्धाश्रम असेलच ना? आपण आता तिथे राहू. हिचे नखरे सहन करणे ही नको आणि हिच्याशी संपर्क सुद्धा नको. "

" अगदी माझ्या मनातलं बोललात वहिनी. " तात्या म्हणाले. " तुम्हांला दोघींनाही आता विश्रांतीची आरामाची गरज आहे. अजून किती वर्षे कष्ट करणार तुम्ही? आपण आता वृद्धाश्रमात जाणे योग्य होईल."
सुधावहिनींनी पण मान हलवली. तात्या म्हणले मी आजच चौकशीला लागतो. माझे पेन्शन पुरेल आपल्याला. बाकी औषध पाण्यावर खर्च होईल. मालाचे पैसे आपण तिला परत करून टाकू. " ह्याला संगीतावहीनींनी पण होकार दिला. अशा तर्हेने तिघांचे वृद्धाश्रमात जायचे नक्की झाले.

इकडे माला बेंगलोरला पुर्णपणे मैत्रिणींच्या आहारी गेली. स्मोकिंग, दर आठवड्याला पार्टी ड्रिंक, पब हे ठरलेले. त्यात तिला काही गैरही वाटत नव्हते. नवनवीन मित्रांच्या ओळखी, त्यांच्या बरोबर डान्स करणे, दारू पिणे हे नित्याचे झाले तसा तिचा आजी आजोबांना फोन करणे देखील कमी झाले. आठवड्यातून नाही पंधरा दिवसातून एखादा फोन, तेही अगदी जुजबी बोलण होत असे. हळूहळू आजी आजोबांना सुद्धा याची सवय करून घ्यावी लागली.

तात्यांना पुण्याजवळ खराडी इथे एक वृद्धाश्रम मिळाले. जिथे पैसे नाॅमीनल होते आणि सोई पण बर्यापैकी होत्या. फक्त दोन आजींना आणि तात्यांना वेगवेगळे रहावे लागणार होते. पुरुष एका बाजूला आणि स्त्रीया एका बाजूला अशी सोय होती. सुधावहिनी नको म्हणत होत्या, पण तात्यांना त्यांची समजूत घातली. तिघांची वृद्धाश्रमात जायची तयारी झाली. त्याप्रमाणे दोघी आजी घराची आवरासावर करू लागल्या. प्रत्येक गोष्टी बरोबर त्यांना आबांची नाहीतर मालाची आठवण येत असे आणि डोळ्यात पाणी येत असे. ऊद्या जायचे म्हंटल्यावर संगीतावहीनींनी आज मालाला फोन करायचे ठरवले. तिच्याशी काय व कसे बोलायचे हे त्या मनातल्यामनात उजळणी करू लागल्या.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all