निवडुंग काटेरी ( भाग ७)

निवडुंग घरात दुर्देव आणते
निवडुंग काटेरी (भाग ७)

मालाला सहा महिन्यांनी कंपनीतून रजा मिळाली. दोन दिवस सुट्टी आणि दोन दिवस रजा अशी ती आजी आजोबांना भेटायला आली. दोन दिवस प्रवास आणि दोन दिवस आजी आजोबांजवळ. येताना आजी आजोबांसाठी काय काय घेऊन आली. ड्रेस वगैरे व्यवस्थित होता. जेवणखाण आटोपल्यानंतर आपल्या खोलीत गेली.

इकडे आजी आजोबांना माला आली म्हणून खूप आनंद झाला. तिघेही मालाच्या प्रगतीवर खूष होते. तिचा पगार वाढला होता ती पर्मनंट झाली होती. एवढ्यात तात्या म्हणाले, " घरात वास कसला येतोय? तंबाखू भाजल्या सारखा." किती वेळ कुणालाच काही कळले नाही. थोड्यावेळाने परत तोच वास येऊ लागला. तात्यांना जोरात ठसका लागला. संगितावहिनींनी मालाच्या खोलीचे दार ढकलले. उघडेच होते. तो वास मालाच्या खोलीतूनच येत होता. माला सिगरेट ओढत बसली होती. आजी आल्यावर तिने धूर आजीच्या तोंडावर सोडला व आजीला मिठी मारली. आजीला वासाने नको नको झाले. आजी ओरडली, " अग काय हे, सोड सोड मला. किती घाण वास येतोय. तू हे काय करतीयेस? तू बिडी पितीयेस? "
" बिडी नाही, नानीजान इसको सिगरेट बोलते है। तू पिणार ये" मालाने आजीच्या तोडांत सिगरेट कोंबली. आजीला जोरात ठसका लागला. तिचा जीव घाबरा झाला. मागून आलेल्या सुधावहिनींनी पटकन पाणी आणून दिले. संगितावहिनी आणि सुधावहिनी दोघीही पटकन बाहेर गेल्या.

संगितावहिनीना श्वास घेणे मुश्किल झाले. थोड्यावेळ त्या तशाच धपापत बसून राहिल्या. जरा सगळे शांत झाल्यावर सुधावहिनी मालाला समजाऊ लागल्या. " काय हे माला? अग आजीचा जीव गेला असता फाटक. आणि हे कसलं घाणेरडे व्यसन लावून घेतले आहेस? "
ह्यावर माला जोरात हसली. " व्यसन? हा हा हा. आजी हे काहीच नाहीये. जरा मोठ्या शहरात जाऊन बघा मुली काय काय करतात. मुली सिगारेट ओढतात, दारू पितात, पबमध्ये जातात, पोरांच्या गळ्यात गळा घालून डान्स करतात. "

" मग तू पण हे सगळं करणारं का? आपली संस्कृती का? आपले संस्कार काय सांगतात हे सगळं विसरलीस का? आबांना चालले असते का हे सगळं? आणि आम्हाला नाही चालणार. " सुधावहिनी.

" ठीक आहे मग मी नाही येणार इथे तुम्हाला भेटायला. वाटलं तुम्हाला तर फोन करत जाईन. नाहीतर तोही नाही करणार. " माला फणकारून म्हणाली. " च्यायला काय कटकट आहे. साधं लाईफ एंजॉय ही करता येत नाही. माझे लाईफ कसे जगायचे हे मी ठरवणार. मला नाही कुणी शिकवायचे. " स्वगत.

तात्या, सुधावहिनी आणि संगितावहिनी तिघेही हे ऐकून अवाक झाले, एकमेकांची तोंड बघू लागले. हे ऐकून संगितावहिनीना मालाच्या वडीलांची आठवण झाली. निलीमाची डिलीवरी चालू होती तेव्हा आबांना ते असेच बोलले होते. आबा तरीही शांत होते पण लेक गेल्यावर आबांचा संयम सुटला होता. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली होती.
माला मात्र धाडकन दार आपटून खोलीत निघून गेली. तरी बाहेरून सुधावहिनी बोलतच राहिल्या. "अस वागू नये ग बाळा, कुठलाही व्यसन चांगले नाहीच ना? तुझ्या आईचा ह्या व्यसनामुळे जीव गेला ग. " मालाला मात्र काहीच ऐकू जात नव्हते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all