2021 ने मला काय दिल....

Bye Bye 2021

बाय बाय 2021, वेलकम - 2022...

सरत्या वर्षाने काय दिल....

सर्वप्रथम या वर्षाने दिला इरा वर लेखिका होण्याचा मान,

आणि

मी हि माझ्या भावना कागदावर उतरवू शकते

हा आत्मविश्वास...

2021 ने काय दिल तर -  माझ्या छोट्या परीचे ( अनुश्री ) चे बोलतांना चे बोबडे बोल, कानावर पडणारे तिचे गोड छोटे छोटे शब्द...

2021 ने काय दिल - मोठी मुलगी उद्या 2022 -  1 जानेवारी ला 10 वर्षाची होणार, सरत्या वर्षात ती 10 वर्षाची झाली पण ह्यावर  न बसणारा विश्वास..( 1 जानेवारी - मोठ्या मुलीचा ( देवश्री चा वाढदिवस असतो ) 

2021 मध्ये घडलेल्या सुखद गोष्टी -

1. लहान भावाचं लग्नं - खूप आनंदाची गोष्ट ,

2. आई - 3 वर्षांनी माझ्या घरी 8 दिवसाकरिता राहायला आली,

3.  मोठ्या मुलीचा हस्ताक्षर स्पर्धेत आलेला नंबर,

4.  चित्रकला स्पर्धेत  मोठ्या मुलीचा नंबर आलेला ऐकून तिला      झालेला आनंद.

5. माझी स्कूटी - महाशिवरात्री ला आणलेली माझी नवीन गाडी.. मी हि गाडी चालवू शकते ह्यावर माझा बसलेला विश्वास... 

6. इरा अँप साठी - केलेले लिखाण - वाचकांच्या कंमेंट्स वाचून मनाला होणारा आनंद.

7.  13 वर्षांनी ताई च्या मुलाच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष हजर राहताना, अरे हा लिखित झाला तेव्हा  पहिल्यांदा च मावशी झालेल्याचा कसला आनंद झाला होता मला, हे आठवणारा क्षण...


आपण हि काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास  2021 ने दिला...

बाय बाय - 2021.....

वेलकम - 2022.......


नमस्कार... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे...( देवरुख - रत्नागिरी )