बसस्टॉप

आज आठ वर्षानंतर जिथे माझं "आयडियल लाईफ" स्टॉप झालं होतं, त्याचं 'बसस्टॉप' वरून मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार. लक्षात ठेवा, विक्टिम असणं म्हणजे गुन्हेगार नाही, पण जर त्यातून हारून लाईफ जगणं सोडून देणं हा गुन्हा असू शकतो.


कथेचे नाव - बसस्टॉप
विषय - ...आणि ती हसली
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


आज मैं ऊपर आसमाँ नीचे
आज मैं आगे ज़माना है पीछे
आज मैं ऊपर आसमाँ नीचे
आज मैं आगे ज़माना है पीछे....


मोबाईल मधे गाणं चालू होतं आणि या गाण्यावर तिची पावलं थिरकत होती. आज बऱ्याच वर्षानंतर ती गाण्यावर ताल धरत होती. कारण आज तिची डान्स कॉम्पिटिशन होती. बऱ्याच वर्षांनी म्हणजे तब्बल आठ वर्षांनी ती स्वतः लोकांसमोर येणार होती. पण का? प्रश्न पडला ना तुम्हाला पण! मला पण हाच प्रश्न पडला होता. आता तुम्ही विचाराल मी कोण? मी ना! अहो मी तीच जी तुमच्याशी बोलत आहे आणि जिच्याबद्दल मी बोलत आहे ती भविष्यातली मी! तसं माझं भविष्य म्हणावं तर दुःखद आणि म्हणावं तर अगदी आनंदी म्हणजे एखाद्याचा प्रवास कसा नसावा? याचं उदाहरण म्हणजे माझं परफेक्ट लाईफ...!

कसं आहे ना, बघणाऱ्याचा दृष्टीकोन कोणत्या दिशेला वळेल, हे सांगता येत नाही. हो की नाही? म्हणजे काहींना मी खूप दुःखी वाटत असेल, तर काही मोजक्या, मोजक्या म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या मुलींच्या नजरेत मी जगातली सर्वात सुखी आणि आनंदी मुलगी...!

बरं माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी एक स्वीट, अल्लड आणि चुलबुली मुलगी होती आठ वर्षांपूर्वी! मी...... अहो नावात काय आहे? नाम बडे और दर्शन छोटे! असो! खरं तर माझ्या नावापेक्षा माझी ओळख ही जास्त महत्वाची!

हे आठ वर्ष म्हणजे माझ्या आयुष्याचं एक असं वळण आहे जे माझ्या "परफेक्ट लाईफ" ची डेफिनेशन बदलून गेले आणि या डेफिनेशनच्या बदलाचं कारण ठरलं ते म्हणजे \"बसस्टॉप...\"

या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या कॉलेजच्या एन्युअल डान्स कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसपासून...
म्हणजे मी जरी कॉलेजमध्ये इंजिनियरिंग शिकत असले तरी माझा कल हा कत्थक कडे होता. तशी ट्रेनिंग लहानपणापासून माझ्या आईने मला दिली होती.

शेवटच्या वर्षाला होती, म्हणून पुढे कधी चान्स मिळेल न मिळेल म्हणून खूप विनंती करून मी स्पर्धेत भाग घेतला. पण एक दिव्य आमच्यापुढे उभं होतं, ते म्हणजे कॉलेजमध्ये प्रॅक्टिसला मनाई होती. कारण, दुसऱ्या मुलांचे क्लासेस डिस्टर्ब् होऊ नयेत. म्हणून मी आणि माझ्या फ्रेंड्सनी मिळून एक जागा शोधली. तशी ती जागा कॉलेज जवळच होती. तिथेच आम्ही प्रॅक्टिस करू लागलो. फंक्शनला पंधरा दिवस राहिले होते, म्हणून आम्ही जोमाने तयारी ला लागलो. प्रॅक्टिसदेखील छान चालू होती.

मग उजाडला तो दिवस! ज्या दिवसाने माझ्या स्वप्नांची राख केली. त्या दिवशी रविवार होता. फंक्शनला काही दिवस उरले होते, म्हणून आम्ही रविवारच्या दिवशी पण प्रॅक्टिस करायचं ठरवलं आणि तसं आईला सांगून बाहेर बसस्टॉपच्या दिशेने निघाले. लवकरचं निघाले होते आणि रविवारचा दिवस असल्याने जास्त टाळकी स्टॉपवर नव्हती. काही मोजकी, ओळखीची लोक जी रोज दिसायची, फक्त दिसायची हां बोलायची नाहीत आणि काही टवाळकी करणारे रोड रोमियो....

मी लांबच उभी होते, पण तरीही त्यांचे कमेंट्स पास करणं चालूच होतं आणि आश्चर्याची गोष्ट ही की, कोणीही त्या मुलांना काही बोलतं नव्हतं. माझं डोकं सटकलं होतं, पण प्रत्युत्तर द्यायचं धाडस होत नव्हतं. पण म्हणतात ना, खरूजेकडे जेवढं दुर्लक्ष करू तेवढंच ती वाढत जाते. असच काहीसं या असल्या माणसांच्या बाबतीत घडत असतं. जोपर्यंत यांच्याविरुद्ध बोलणार नाही तोपर्यंत ते थांबणार नाहीत. पण तरीही मनात भीती ही होतीच. म्हणून शांत राहिले. पण अचानक त्यातला एक म्हणाला, "ओ भाई, ये माल अपून के बिस्तर पे आ जाये तो मजा आ जायेगा।" मला त्याचं ऐकून रडूच आलं. शी! कसलं अश्लील बोलणं.
पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. माझ्या गप्प राहण्याने त्यांच फावलं आणि त्यातल्या एकाने चान्स घेउन माझ्या छातीवर हात मारला..... आता माझी भीती रागात बदलली आणि एक सणसणीत त्याच्या कानाखाली मारली आणि समोर जिथे माणसं उभी होती, तिथे जाऊन मी माझा राग कंट्रोल करत उभी राहिले. हातपाय थरथर कापत होते. पुन्हा जर समोर आले तर चपलेने बदडून काढेन, असं मनाशी ठरवलं.

पण...... पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. जशी बस आली तशी मी रांगेत उभी राहिले. पण अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवला.... मी मागे वळले आणि...... आणि..... छपाक!!!

आईsss ... गंsss....... आsss......... खूप जळतंयsss...... आईईईईईईईईsss........ वाचवाsss.......

माझ्या एका विरोधाने माझ्या आयुष्यावर ऍसिड फिरवून टाकलं होतं.....

मी फक्त आक्रोश करतं होते. तिथे नावाला माणसं होती. माणसं कसली किडे होते किडे! जे दुसऱ्या किड्यावर किटनाशक पडल्यावर बघत राहतात, नाहीतर पळून जातात. त्यानंतर मी बेशुद्ध झाले. मला कधी हॉस्पिटल मध्ये नेलं, कधी माझ्यावर उपचार झाले याचा पत्ता नव्हता. जेव्हा जाग आली तेव्हा फक्त पट्ट्या जाणवत होत्या चेहेऱ्यावर आणि सहन न होणारी जळजळ...! असं वाटत होतं, जिथे जळतंय तिथे नखांनी कुरतडून काढावं, पण नाही करता आलं. कधी कधी वाटलं जीव देऊन या त्रासातून स्वतःला मुक्त करून घ्यावं.

दिवस लोटले आणि माझ्या चेहऱ्यावरील आगं कमी होत गेली. घरी आली तर घरात मिट्ट अंधार.... जसा माझ्या आयुष्यात झालेला काळोख.... ना घरात टीव्ही ना एक आरसा, का? तर मी माझं तोंड पाहू नये म्हणून.... अर्धा चेहेरा गळून गेला होता.... डोक्यावर केस राहिले नव्हते.... काय करणार होती मी? कशी जगणार होती..? वाटलं सगळं संपवावं... तसा प्रयत्न ही केला... माझ्या फ्रेंड्सनी माझ्याशी संबंध तोडले. नातेवाईकांनी अशी तोंडं फिरवली की, जसं माझीच चूक होती या सगळ्यात..! सगळ्यांनी असं मला दूर लोटलं की, जे काही झालं आहे ते माझ्याच चुकीमुळे झालं आहे.... सांगा ना काय चूक होती माझी?

पण माझ्या आई बाबांनी माझी साथ सोडली नाही.... आतून खचलेल्या मला \"लक्ष्मी अग्रवाल\" (ऍसिड अटॅक सर्वायावर) बद्दल सांगितले. कसं तिने या सगळ्या विरुद्ध लढा दिला आणि कसं आज ती एक नॉर्मल आयुष्य जगतेय याबद्दल सांगितले. तिच्याबद्दल वाचून तिला समजून घेतलं आणि मी स्वतःला सावरले. माझ्याबाबत झालेला गुन्ह्यात मी विक्टिम होती, त्यामुळे मी नाही तर त्या मुलांनी तोंड लपवून फिरलं पाहिजे. मी स्वतःला सावरले आणि आई-बाबांच्या मदतीने त्यांना धडा शिकवला.

काय चूक होती माझी? का कोणी आपल्याबरोबर होणाऱ्या गैरवर्तवणुकी विरुद्ध आवाज उठवणं चुकीचं आहे का? मला तरी मी चुकीची नाही वाटत आणि म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे, कारण मी विक्टिम नाही मी स्ट्रॉंग सर्वायावर आहे आणि माझे आईबाबा माझी सगळ्यात मोठी स्ट्रेन्थ आहेत.

आज आठ वर्षानंतर जिथे माझं "आयडियल लाईफ" स्टॉप झालं होतं, त्याचं \"बसस्टॉप\" वरून मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार. लक्षात ठेवा, विक्टिम असणं म्हणजे गुन्हेगार नाही, पण जर त्यातून हरून लाईफ जगणं सोडून देणं हा गुन्हा असू शकतो.

चला आता मी जाते... माझ्या परफॉर्मन्स ची वेळ झाली.... बाय.... कीप स्माईलिंग अँड अल्वेज बी स्ट्रॉंग......


समाप्त.....


जय शिवराय


लेखक -अंकिता भोईर......

जिल्हा : ठाणे