एक अविस्मरणीय क्षण.

एक अविस्मरणीय क्षण
** बुंगाट**

कोणतीही गाडी अन् ड्रायव्हिंग शिकण्यासाठी एक सर्वसाधारण नियम असतो.तो म्हणजे तुमची नजर मेली पाहिजे....म्हणजे काय की, टू व्हीलर किंवा फोर व्हिलर गाडी शिकताना वेळोवेळी हे सांगितले जाते..की,एकदाका तुमची नजर मेली ,कीआपोआपच तुम्ही अगदी " बुंगाट" गाडी चालवू शकतो.

खरंच किती महत्वाचे आहे ना,नजर मरणे.\" मनुष्याला त्याच्या आयुष्या मध्ये घडत जाणाऱ्या अनेक गोष्टींवर नजर मेलेली असली की,त्याचे आयुष्य किती सोपे होईल. असंख्य अपरिचित अडचणी,अनपेक्षित संकटे,परिस्थितीचे चढ उतार,सुख दुखाचे प्रसंग ,असल्या गोष्टी मनुष्य निराश न होता,वैफल्यग्रस्त न होता, त्यातून पार जाऊ शकेल.

शनिवार रविवार बघून शॉपिंग ला जाणे.हा काही विशेष मुद्दा नाहीच.पण...
त्यादिवशी अनुभवलेला तो प्रसंग माझ्यासाठी तर कधीही विसरता न येणारा क्षण आहे.

मी आणि आमची पिलू,सुट्टीचा दिवस बघून बाहेर निघालो,खरेदीही होईल,आणि थोडेसे फिरणेही होईल या उद्देशाने..मस्त तयार झालो,आणि आमची टू व्हीलर बाहेर काढली.पाच दहा मिनिटात नेहमीच्या चाळीस पन्नास च्या स्पीड ने मुख्य रस्त्यावर आलो.थोडे पुढे पुढे जाताना बाहेरच्या वातावरणातला मस्त मोकळा फ्रेश हवा समोरून येऊन कानात " बुंग बूंग" करत होता.
थोडे आणखी पुढे गेल्यावर समजले की,त्यादिवशी नेमकाच काहीतरी कारणास्तव रस्त्यावर ट्रॅफिक खुप च कमी आहे.गजबजाट आणि गर्दी नेहमीसारखी नव्हती...

मी हळु हळू ड्रायव्हिंग एन्जॉय करायला लागले.एव्हढा मोठा रस्ता,इतका मोकळा मिळा ल्यावर मन आतल्या आत खुश झाले होते...
कितीतरी वर्षां पासून मनात असलेली ड्रायव्हिंग ची सल,मोकळा रस्ता बघून नव्याने सलयला लागली होती...
मोकळा मिळालेला रस्ता कापत कापत ,स्पीड मीटर वरचा काटा ही पुढे पुढे सरकत होता....
बघता बघता काटा 120 चे वर येऊन हलत होता...
गॉगल घातलेल्या डोळ्यातून ही थंड गार वाऱ्याने पाण्याचे थेंब आपसूकच हवेत उडत होते...

पिलू ने आधी एन्जॉय केले.पण जेव्हा काटा 120 वर दिसायला लागला तेव्हा मात्र थोडी गडबडल्या सारखी झाली.." अग ममे,काय करतेस. काटा बघ शं भर च्या वर चालला आहे.".. असे मागून बोलत होती.
तिचे असे घाबरणे अगत्याचेच होते.कारण तिला माझ्या ड्रायव्हिंग स्पीड आणि स्किल बद्दल पूर्ण पने माहिती होती .
" अग पिलू,बच्चा घाबरु नको.कधीच्या काळात मोकळा रस्ता मिळाला आहे.घेऊ दे जरा ड्रायव्हिंग चा आनंद ." असे तिला समजावले.
      माझे ही हात थरथरत होते,.पण मनात आनंदाच्या लाह्या फुटत होत्या.." डर के आगे जीत है..." असे म्हणतात ना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली होती...असे वाटत होते की,माझी टू व्हीलर आणि मीटर वर 120चा स्पीड दाखवणारा काट्या ला एखादा फोटो काढून ठेवावा,आणि " तुम्ही इतकी वेगाने गाडी चालवू च शकत नाही." असे कोणी म्हणाले तर दाखवण्यासाठी.....

गाडी चालवण्याचा हा छोटासा प्रसंग अविस्मरणीय कसा काय असू शकतो.? तर ते ही खरंच आहे.आजकाल शेकड्याने नवनवीन गाड्या रोज मार्केट मध्ये येत आहेत.तरुण मुले मुली,आणि वर्किंग महिला अतिशय सुदंर रीतीने " बुंगाट" गाडी चालवताना आपण रोजच तर बघतो.तर त्यात विशेष काय झाले..?
चला तर आपण थोडे फ्लॅश बॅक मध्ये जाऊया.....
         .....माझे बालपण ...आमच्या घरात मी सगळ्यात धाकटी असल्यामुळे लाडात वाढलेली.घरातल्या जबाबदाऱ्या लहनांच्या वाट्याला तशा कमीच असतात.पप्पा मला शाळेत सोडवा यला यायचे.आणि मोठे बहिण भाऊ आणायला असायचे.
हायस्कूल ला गेल्यावर जाताना पप्पा तर येताना मात्र मैत्रिणीनं सोबत यायचे.माझ्या मैत्रीणीना ही माझा स्वभाव माहित होता.शाळा सुटल्यानंतर मैत्रिणी मल रस्ता क्रॉस करून द्यायच्या ते ह्या ट्रॅफिक चे माझ्या भीती मुळेच..नंतर कॉलेज ला गेल्यावर एकीने " लूना" ही स्पेशल लेडीज टू व्हीलर गाडी घेतली होती कॉलेजला येण्या जाण्यासाठी..
आणि तिच्या कडे बघून ड्रायव्हिंग ची इच्छा मनात यायची...
  एक दिवस आम्ही दोघी मोकळ्या मैदानात गाडी शिकण्यासाठी प्रॅक्टिस ला गेलो होतो...ती म्हणाली," तुला डबल सीट येणार नाही,मी तुला मागून धरते,तू चालावं ."....
मी हळु हळू गाडी चालवली.थोड्यावेळाने घरी जाताना ती मागे बसली.आम्ही रस्त्यावर आलो...नेमका अवजड सामानाचा एकमोठा ट्रक येता असे मला दिसले...ट्रक जवळ जवळ आला...आणि आमचा गाडी वरचा कंट्रोल सुटला....फक्त ट्रक ला जवळुन बघितल्याने माझी घाबरगुंडी उडाली होती....गाडीला सोडून दिले होते....गाडी एकटीच पुढे पळत जाऊन पडली होती...आणि आम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडा झुडपात.....
ट्रक निघून गेला होता ....पण तो प्रसंग माझ्या नजरसमोरून जाता जात नव्हता....

       पुढे लग्न झाले ....मुलेही झाली ...पिलू ला अडीच तीन वर्षांची असताना रिक्षाने शाळेत पाठवणेस मन धजत नव्हते....म्हणून छोटी स्कूटी घेतली.....आम्ही सगळे रोज शाळेच्या मैदानात प्रॅक्टिस ला जायचो.....

पिलुला शाळेत सोडणे आणणे चालू झाले होते..पण गाडीचा स्पीड कधी चाळीस पन्नास च्या वर जात नव्हता...
नंतर नंतर पिलू च मला म्हणायला लागली..." अग ममे ,किती बोअर गाडी चालवते स,बघ मागचे सगळे पुढे चाललेय....""

     ... असेच वेगवेगळे अनुभव घेत घेत गाडी चाळीस पन्नास चे स्पीड वर चालवणे चालूच होते..आणि त्या दिवशी.....
अचानक मोकळा डांबरी,चमकणारा, हायवे ,बघून समोरून येणाऱ्या सुसाट वाऱ्याने ,कानात कुजबुज ले ,"" संधी छान आहे ,बघतरी " बुंगाट" गाडी चालवून."""
आणि स्पीड काटा शंभरच्या वर गेला एकदाचा ...!!!

आजही तो प्रसंग आठवला की ,मन उल्हसित होते .
सच में...." डर के आगे जीत है,सिर्फ उनके लिये,जो कोशिश करते है...!!""

दुसऱ्यांना हलके फुलके वाटणारे अनुभव ,माझ्यासारख्या एका ट्रॅफिक च्या भीती असणारी ला आयुष्या भरासाठी " अविस्मरणीय क्षण " म्हणून स्मरणात राहतात....!!!!  ."....
 .    .  ...       ...   ...     ....       ....   ....      ..    .....
          ....