तुटलेले... तरीही सुंदर...

This is the story of Mira. Mira's life took a turn after the accident that she had never thought of. We all always have a picture in our head that our life is easy, but if that doesn't happen then we start to give up immediately. Give up is not an o

(भाग ५)


(मागील भागात आपण वाचले - मी तर माझी जवळची माणसं सुद्धा गमावली आहेत, तर मी कोणासाठी जगू आता डॉक्टर ? आणि शिवाय मी कधी आई होणार नाही, तर माझ्या जगण्याला तर आता काही अर्थच उरलेला नाही. डॉक्टर जे काही सांगत आहेत ते सगळं मीरा शांतपणे ऐकत होती. डॉक्टर निघून गेल्यावरती मिराने ती पूर्ण रात्र विचार करण्यात घालवली. तिच्या मनावर आणि विचारांवर डॉक्टरने सांगितलेल्या गोष्टींचा सकारत्मक बदल होत होता. आज रात्री तिला झोपेच्या इंजेकशन ची गरज पडली नव्हती. रात्रभर कोऱ्या भिंती मीरा एकटक पाहत असताना, तिने तिच्या मनावर भीती वाटणाऱ्या गोष्टींची यादी बनवली होती, ती तिच्या मनाशी सुंदर अस काही ठरवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिला वाटत असणाऱ्या भीती मुळे तिला ते फार अवघड जात होते. तरीही आजची रात्र तिला कधी संपून कोवळी सूर्याची किरणे पाहण्याची ती आज आतुरतेने वाट पाहत होती. 

काय ठरवले असेल मीरा ने तिच्या मनाशी ? )


आज सूर्याची किरणे येण्यापूर्वीच मिराने डोळे उघडले होते, कोऱ्या भिंतीवर ती पाहताच होती आणि तेवढ्यात डॉक्टर तिला भेटायला आला. मीरा ने मनावर कोरलेली प्रत्येक भीती ची यादी डॉक्टरला सांगितली. सगळ्यात अगोदर घटस्फोट, दुसरे आई न होणे आणि तिसरे जग मला अश्या अपंगत्वमध्ये अगोदर सारखे, पुन्हा स्वीकारेल का होते. रडत रडत मिराने तिला भीती वाटणाऱ्या गोष्टींची यादी संपवली. डॉक्टरने मीरा कडे पाहिले आणि शांत पणे तिला म्हणाला, मीरा ज्या व्यक्ती मुळे तुझी आज ही हालत आहे, त्या व्यक्तीने तुझ्यासाठी घटस्फोट चे कागदपत्र पाठवून आठ दिवस झाले आहेत. एखादया व्यक्तीला जर आपल्या आयुष्यातून जायचे असेल तर त्याला जाऊ दयावे, जर ती व्यक्ती आपली असेल तर ती परतून आली, तरच ती आपली आहे समजावे मीरा. तुला माहिती या जगामध्ये अशी अनेक अनाथ मुले आहेत, ज्यांचा कोणी स्वीकार करावा अश्या आशेने ते रोज त्यांचा प्रत्येक दिवस ढकलत असतात. मला माहिती आहे ..मीरा वेदना हा एकच मार्ग आहे, ज्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीशी जोडले जातो आणि खरा आनंद याच्या मध्येच असतो. तू आज वेदने मध्ये आहेस, त्यामुळे तू प्रत्येक त्या व्यक्तीला जोडून घेशील, जी सुद्धा वेदनेमध्ये असेल. जेव्हा तू अश्या लोकांच्या जवळ जाशील, तेव्हा ते तुझा नेहमी आनंदाने स्वीकार करतील. कदाचित देवाने तुझ्या हातून काही चांगले घडवायचे ठरवले असेल, त्या सगळ्यासाठी तू स्वतःला तयार कर. 

Be strong, be grateful what you have ...You will always end up having more.

डॉक्टर चे म्हणणे मिराने शांतपणे ऐकले, थोडावेळ ती शांतच होती..काही मनात विचार करत होती. 

थोड्यावेळाने ती डॉक्टर ला म्हणाली, डॉक्टर तुम्ही माझी एक छोटीशी मदत करू शकता का ? असे विचारात असताना तिच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक आली.

डॉक्टर म्हणाला का नाही मीरा, नक्कीच ! बोल तू..

मीरा म्हणाली, डॉक्टर मला पैंटिंग काढण्याचे साहित्य इथे मिळेल का ? या कोऱ्या भिंतीमध्ये माझा दम घुटतो. मला माझ्या आयुष्यामध्ये नवीन रंग भरायचे आहेत.

डॉक्टर थोडासा चिंतेत येऊन मिराला म्हणतो, मीरा मी जाणतो पैंटिंग काढणे तुझा श्वास आहे, तुझी कला जपताना तुझ्या हातावर प्रेशर येऊ शकते, ज्याच्यामुळे तुला त्रास होईल आणि इन्फेकशन शरीरात वाढू शकते.

 मीरा डॉक्टर ला म्हणते, हरकत नाही वाढू देत, मला विश्वास आहे डॉक्टर माझी कला मी जपल्यानंतर, मला नक्कीच बरे वाटेल.

डॉक्टरने थोडा विचार करून तिला हो सांगितल आणि म्हणाला तुझी पहिली पैंटिंग मी विकत घेईल, त्यामुळे मीरा ती छानच असली पाहिजे हं...!

मीरा हसली आणि होकारार्थ मान हलवली, तिच्या चेहऱ्यावर आज काही वेगळेच तेज आले होते.

दुसऱ्या दिवशी लगेचंच मिराला लागणारे सगळे पैंटिंग चे साहित्य तिच्या रूम मध्ये डॉक्टरने आणून दिले. मिराच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी आज हसू होते, ते पाहून डॉक्टरला सुद्धा बरे वाटले. मिराने तिच्या मनाच्या कोऱ्या भिंतीवर आज नवीन रंग उधळले, जणू बरी होण्याची तिची ती थेरपीच होती. सूर्याची किरणे, खिडकीतून दिसणारी रंगीबेरंगी फुले, झाडाच्या पानांवर पडलेले दव, पक्ष्यांचा चिवचिवाट ही सुद्धा तिच्या थेरपीची एक प्रोसेस होती. काही दिवसातच मिराची पहिली पैंटिंग पूर्ण झाली, तिच्यावर तिने नव्याने आयुष्याची सुरवात करणारी मीरा रेखाटली होती. त्यात मीरा व्हीलचेअर वरती होती, तिच्याभोवती तिने स्वीकारलेले तिच्यासारखेच अपंग बाळ सुद्धा तिच्या जवळ होते. मिराच्या हातात एक मासिक सुद्धा, तिने पैंटिंग मध्ये दाखवले होते, ज्या मासिकवर मिराचा व्हीलचेअर वरती फोटो होता आणि त्यावर लिहिले होते i can see my abilities in my disabilities. तिने काढलेली ही सुंदर पैंटिंग डॉक्टरला खूप मनाला भावली आणि ती पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. आज डॉक्टरच्या चेहऱ्यावरती समाधान होते, की त्याने मिराला नव्याने जगण्यासाठी थोडीफार मदत केली त्याचे. डॉक्टरने मिराची पैंटिंग विकत घेतली आणि ती मिराच्याच रूम मध्ये लावली, तिला अजून पैंटिंग काढण्याचे प्रोत्साहन सुद्धा दिले. मिराने काढलेल्या सगळ्या पैंटिंग ऑनलाइन विकण्यासाठी डॉक्टर टाकत असे, त्यातून मिळणारे पैसे मिराच्या नावाने जमा होत असे. कलेमध्ये मिराचा श्वास होता आणि ही थेरपी केमिकलच्या थेरपी पेक्षा जास्त इफेकटीव्ह होती. असेच दोन वर्षे मिराने खूप पैंटिंगस काढल्या, छान पुस्तक वाचली आणि लिहिली सुद्धा.. साहजिकच तिने पैसे सुद्धा खूप कमावले होते. मिराला जेव्हा हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला, तेव्हा तिने हॉस्पिटल चे सगळे बिल स्वतः भरले आणि हॉस्पिटल मध्ये इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक अपंग व्यक्तीचे बिल ती भरेल असे सांगितले, निरोप घेताना तिने डॉक्टरला मला भेटलेल्या अनेक व्यक्तीमध्ये तुम्ही एकच "परफेक्ट व्यक्ती" आहात असे सांगितले, एखादी व्यक्ती परफेक्ट असणं काय असत त्याची फिलॉसॉपी मिराच्या मनात आज इतरांपेक्षा काही वेगळी होती, अर्थातच डॉक्टरला परफेक्ट म्हणणे योग्यच होते तिच्या परफेक्ट असण्याच्या व्याख्येत डॉक्टर बसत होता म्हणून.

मीरा घरी आल्यानंतर तिने स्वतःला आरश्यात पाहिले, आज तिच्या समोर एक वेगळी मीरा होती. आज मीरा स्वतःशी बोलत होती, ते सर्व वर्ष मी खिडकीतून बाहेर पाहत होती, त्यावेळेस खरंच मी किती आंधळी होती..मला त्यावेळेस कधी हे सर्व जाणवलेच नाही. आज मी स्टारलाईट मध्ये इथे चमकत आहे. आज मला जाणवत आहे... मी जिथे असायला हवे होते नेहमी, आज मी तिथे आहे. आज आकाश मला नव्याने दिसत आहे, जसे ढगांनी वर उचलावे आणि प्रकाश दिसावा..आज तो हरवलेला प्रकाश मला अचानक दिसतो आहे, हे सगळं बदलेल जग किती उबदार, प्रेमळ आणि तेजस्वी आहे अगदी वास्तविक...ह्या बदलेल्या जगामध्ये माझ्यातली हरवलेली मी आज मला भेटली आहे, जी नात्यांच्या मळभ असलेल्या ढगांमध्ये कुठेतरी हरवली होती...एकाच वेळी आज सगळं किती अगोदारपेक्षा भिन्न वाटत आहे..आज मी मला नव्याने भेटली आहे...आज मी जशी आहे तसे मी स्वतःला स्वीकारले आहे, मी स्वतःच्या प्रेमात पडली आहे. असे म्हणून मीरा ने तिच्या भीती च्या यादीकडे आज हसत हसत पाहिले. घटस्फोट भेटणे ही भीती, तिच्या मनातून आज निघून गेली होती. तिने आनंदाने घटस्फोट च्या कागदांवर सही केली आणि बेस्ट ऑफ लक, तू आनंदी रहा.. असे मनात म्हंटले आणि ते नाते आज कायमचे संपवले. तिने स्वतःलाच खूप छान पणे समजवले होते की, चुकीच्या नात्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एकटे राहणे कधीही योग्य आहे. मिराने नात्यांमध्ये अडकून पडलेल्या लोकांसाठी काही दिवसांनी छान असे "it's ok to be alone" पुस्तक सुद्धा लिहिले, त्यात ती म्हणते की,....
माझ्या अपघाताच्या अगोदरचे स्वतःबद्दल नाते थोडे हे गुंतागुंतीचे होते. माझे नाते फक्त आजूबाजूला असणाऱ्या लोकांपुरतेच होते, त्यात मी कधी स्वतः नव्हतीच. मी एक अशी व्यक्ती होती, जिला फक्त एवढेच माहिती होते की, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी कसे ठेवायचे आणि त्यातच मी आनंद मानत असे. हे सगळं किती गुंतागुंतीचे होते, हे मला आज समजले आहे. आज माझे नाते फक्त माझ्याशी आहे, माझ्या जीवनात माझ्या आजूबाजूला आता फक्त मी आहे. मला माहिती आहे, माझ्या सुखदुःखात खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहणारी व्यक्ती मी स्वतः आहे, त्यामुळे माझे स्वतः सोबतचे नाते गुंतागुंतीचे नसून, इतर नात्यांपेक्षा सुंदर आहे. अपघातापूर्वीची मीरा तुमच्या सागळ्यांमध्ये कुठे ना कुठे दडलेली असेल..तुम्ही स्वतःची गुंतवणूक माणसांमध्ये कधी करू नका. कारण तुम्ही जर एखाद्या चुकीच्या व्यक्ती मध्ये गुंतले की, ती लोक तुम्हाला वापरतात, तुमच्या भावना त्यांच्या इच्छेनुसार तोडतात आणि अश्याप्रकारे तोडतात की, पुन्हा जोडण्यासाठी अनेक वर्षं तुम्हाला खर्च करावी लागतात. तुम्ही तुमच्या आयुष्याचे चित्र रेखाटत असताना, तुम्ही आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी, तुमच्या मनाची तयारी सुद्धा करत जा. Life is so unpredictable..! तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला असणारे लोक किती महत्वाचे आहेत.. याच उत्तर अस आहे की,..वेळ हा खूप सुंदर शिक्षक आहे, तो शिक्षक आपल्या आयुष्यामधून अतिरिक्त असलेल्या गोष्टी काढून टाकतो..अर्थात त्यात लोकांचाही समावेश असतो. माझ्या अपघातानंतर च्या प्रवासामध्ये मला अनेक लोकांचे सुखद दुःखद अनुभव आले. जगामध्ये तीन प्रकारचे लोक असतात..पहिला प्रकार असलेली लोक, जी तुम्हाला दुःखात असताना बघतात आणि निघून जातात. ते स्पष्टपणे तुमच्या वेदना बघून तुमच्या सोबत उभे राहण्यासाठी नकार देतात. मी आदर करते अश्या लोकांचा, जे प्रामाणिक पणे असं सांगतात. दुसऱ्या प्रकारची लोक अशी असतात, जी कधीही तुमच्या सोबत नसतात, पण ती नेहमी तुमच्या सोबत उभे आहेत याच श्रेय घेण्यासाठी येतात. ते खूप कमजोर असतात, म्हणून ते तुमच्या सावलीतच राहत असतात. अश्या लोकांपासून जागृत राहिले पाहिजे आपण,कारण ते तुमच्या साठी अतिशय घातक असतात. अश्या लोकांना कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका, कारण ती कधी तुमची मदत करणार नाहीत. त्यांना जागृत करा त्यांच्यापासून दूर राहून आणि स्वतःला सुद्धा जागृत करा. तिसरा प्रकारात मोडणारी ही लोक खूप सुंदर असतात, अगदी स्वार्थहीन. ते नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतात, त्यांना तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचे श्रेय नको असते. ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या सोबत असतात. ती लोक तुमची आहेत, त्यांना महत्व दया. अशी ही तीन प्रकारची लोक आहेत, त्यामुळे तुमच्या अवतीभोवती अश्याच लोकांचा सहवास ठेवा, who are real and you will feel real...!

आज मिराने तिला वाटत असलेल्या तीन भीती पैकी एक भीती कायमची तिच्या मनातून काढून टाकली होती, मीरा तिच्या राहिलेल्या दोन भीतींवर असाच विजय मिळवू शकेल का ?

क्रमशः

-Swetaa Aher