तुटलेले... तरीही.. सुंदर......! भाग ४

This is the story of Mira. Mira's life took a turn after the accident that she had never thought of. We all always have a picture in our head that our life is easy, but if that doesn't happen then we start to give up immediately. Give up is not an o

तुटलेले तरीही सुंदर ..! 
(Broken but still beautiful)???? 
(भाग ४)


(मागील भागात आपण वाचले - ती बेडवरून उठायचा प्रयत्न करू लागली आणि एकच तिने किंचाळी फोडली जसे शरीरातले 72 हाड एकाच वेळी मोडली असावीत.आपला अपघात झाला, तिथपर्यंत मिराला सगळे आठवत होते.मीरा शांतपणे पडून होती आणि असंख्य डोळ्यात प्रश्न घेऊन डॉक्टरकडे बघतच होती. न राहवत तिने डॉक्टरला विचारलेच, डॉक्टर मी काय गमावले आहे, तुम्ही मला सांगाल का आणि माझी माणसं कुठे आहेत? सांगताना डॉक्टरांच्याही डोळ्यात पाणी होते.
आज पूर्ण रात्रभर मीरा शांतपणे झोपली होती, दोनचार मिक्स झालेल्या केमिकल च्या आधारे, ती आज दुखण्यापासून खूप दूर होती पण, आज डॉक्टर रात्रभर झोपू शकला नाही. मिराची झालेली अवस्था तिला होणारा त्रास रात्रभर त्याच्या नजरेसमोरून काही केल्या जात नव्हता.)

डॉक्टर मिराच्या रूम मध्ये अधून मधून येऊन जायचे, बहुतेक वेळा तिला झोपेचे इंजेकशन देऊन झोपवले असायचे. तिला झोपेचे इंजेकशन देने तितकेच तिच्यासाठी हानिकारक आहे हे डॉक्टरला ठाऊक होते, मिराला होणारा शाररीक आणि मानसिक त्रासातून तिला बाहेर कसे काढायचे, याचा विचार सतत डॉक्टरांच्या मनात यायचा. प्रत्येक आजारावरती फक्त तीन चार केमिकल ने मिक्स केलेले औषध घेणे हा एकच उपाय नसतो, अशी डॉक्टरची विचारधारणा होती, म्हणूनच मीरा साठी डॉक्टरने ती रूम निवडली होती. असे लागोपाठ पंधरा दिवस चालले, आज डॉक्टरने काहीतरी मनाशी विचार केला आणि मिराच्या रूम मध्ये आला. सकाळचे सुमारे सात वाजले होते, डॉक्टरने मिराच्या रूम मधली खिडकी उघडली. कोवळ्या सूर्याच्या किरणांनी मिराला जाग आली. अलगद डोळे उघडत असताना मिराचे लक्ष खिडकीपाशी उभे असलेल्या डॉक्टर कडे गेले आणि एकचं तिला आपण काय गमावले आहे हे पुन्हा आठवले. आज पंधरा दिवस उलटूनही मीरा त्याच मानसिक त्रासात तरफडत होती, तिची अशी स्थिती होणे सुद्धा तितकेच नैसर्गिक होते कारण, न कळत आयुष्याने तिला फार मोठी किंमत मोजायला लावली होती. मिराने लगेच ओरडून डॉक्टरांना सांगितले, मला जगायचे नाही डॉक्टर. कृपया माझ्यावरती उपचार करू नका, माझे जगणे व्यर्थ आहे, मी हात जोडते, मला नाही जगायचे डॉक्टर. मिराने जितक्या मोठ्याने आवाज करत डॉक्टरला सांगितले, तितक्याच शांत पणे डॉक्टरने तिला विचारले, मला सांगशील तुला का जगायचे नाही मीरा ? मीरा लगेचच रडत रडत सांगू लागली, माझा हात फ्रकचर झाला, मी पुन्हा पैंटिंगस काढू शकणार नाही हरकत नाही. माझे दोन्ही पाय गेले, मी पुन्हा उभी राहू शकणार नाही, हरकत नाही. मी तर माझी जवळची माणसं सुद्धा गमावली आहेत, तर मी कोणासाठी जगू आता डॉक्टर ? आणि शिवाय मी कधी आई होणार नाही, तर माझ्या जगण्याला तर आता काही अर्थच उरलेला नाही. आई होणे म्हणजे स्त्रीत्व पूर्ण होते, असे अपूर्ण स्त्रीत्व मी घेऊन जगणे मला नाही जमणार डॉक्टर. पण मीच का ? आई गेली तेव्हा मी लहान होते, माझे लहानपण हरवले आणि मी घर सांभाळू लागली. वडिलांची फारशी परिस्थिती नसल्यामुळे मी त्यांच्याजवळ पुढील शिक्षणासाठी कधी हट्ट नाही केला, त्यांची इच्छा होती मी मोठ्या घरात लग्न करून सुखाने नांदावे. माझ्या मनाविरुद्ध लग्न असून सुद्धा, वडिलांच्या चेहऱ्यावर हसू कायम रहावे म्हणून मी लग्न सुद्धा केले. मी कधी कुणाचे स्वप्नातही वाईट केले नाही, नेहमी मी माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या माणसांची काळजी घेतली, त्यांच्या साठी जगत आले. माझ्या मनात हाच एक प्रश्न येत आहे, मीच का ? का? मिरा हुंदके देऊन रडत होती, पुढचे दहा मिनिटं डॉक्टरने मिराला रडू दिले. रडता रडता ती एक वेळेस शांत झाली, आता फक्त तिचे हुंदके रूम मध्ये आवाज करत होते. अजून दहा मिनिटांनी डॉक्टरने मिराला पिण्यास पाणी दिले, मिराने घोट घोट करून पाणी पिले आणि काही वेळेनंतर तिचे हुंदके सुद्धा बंद झाले. थोडावेळ रूम मध्ये शांतताच होती, डॉक्टरने मीरा कडे शांत पणे पाहिले. मीरा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवरच औषध फक्त वेळ असते. ते कसे त्याचे उदाहरण तू आता पाहिलेस. आता या क्षणाला तुला तुझं दुःख जितके महत्वाचे वाटत असेल, हे सगळं उदया जाऊन फक्त गोष्टी असतील, ज्या तू लोकांना कदाचित हसत हसत सांगशील. माझे म्हणणे तुला कदाचित पटत नसेल मीरा, पण वेळ हे प्रत्येक समस्येवरच गुणकारी औषध आहे, हे तुला वेळ गेल्यानंतरच पटेल.
तुला माहिती मीरा आपल्या सगळ्यांना, आयुष्यासोबत अगोदरच खूप प्रॉब्लेम्स असतात, त्यात अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम जो आपण स्वतःच स्वतःसाठी बनवलेला आहे तो म्हणजे, आपण नेहमी आपल्या आयुष्याकडून सगळे काही सोपेच आपल्या वाटेला यावे हेच अपेक्षित करत असतो. आपण आपले आयुष्याचे प्लॅन्स आपल्या डोक्यात कुठेतरी रेखाटलेले असतात, अस आपलं आयुष्य असावं आणि ते जर आपण ठरवल्या प्रमाणे घडले नाही, तर आपण लगेचच जगण्यासाठी हार मानू लागतो. मला माहिती आहे तू सुद्धा तुझ्या आयुष्यात कधीच असे ठरवले नसणार की, तू तुझे पूर्ण आयुष्य व्हीलचेअर वरती काढावेस आणि तुझ्या प्रियव्यक्तिंना आयुष्यभरासाठी गमवावेस. कदाचित तुझे भविष्य भरपूर सुंदर असेल, त्याच्यासाठी तुला आज इतकी मोठी किंमत तुला मोजावी लागली आहे मीरा. अग, आयुष्य म्हणजे परीक्षा आणि प्रयोग, जे कधीही सोपे नसतात. जर तू आयुष्याकडून सगळे सोपे आणि सुरळीतपणे चालण्याची अपेक्षा करत असशील तर ते चुकीचे आहे. आयुष्याने तुझ्यासाठी जे काही पुढे वाढवून ठेवले आहे, त्याचा तू आनंद घे. जे गमावले त्याचे दुःख करण्यापेक्षा, जे तुझ्याकडे आहे.. आज तू जिवंत आहेस या गोष्टी चा तू आनंद साजरा कर. हरकत नाही तुला भीती वाटते आहे, हरकत नाही तू रडलीस तरी सुद्धा, पण हार मानणे हा काही पर्याय नाही. तू तुझ्या शरीरातले काही भाग गमावले आहेस, पण तुझे मन तर अजूनही मुक्त आहे, तुला हवे तसे पुन्हा नव्याने तुझे आयुष्य रंगवून टाकण्यासाठी. तुझ्याकडे असलेल्या गोष्टींचा तू सुंदर वापर कर आणि पुन्हा जग. स्वतःवरती प्रेम कर, तू जशी आहेस आज त्याचा तू स्वीकार कर. मीरा तुला जर असे वाटत असेल की, तू फक्त एकटी आहेस तर ते चुकीचे आहे, तो बघ तो सूर्य एकटाच आहे रोज एकटाच येतो आणि एकटाच जातो सुद्धा, त्याचा कोणी सोबती नाही, तरीसुद्धा तो नेहमी रोज नव्याने प्रत्येकाच्या आयुष्यात सोनेरी किरणे तितक्याच आपुलकीने घेऊन येतो. माझे ऐकशील तर मीरा तू, तुला भीती वाटत असणाऱ्या सगळ्यागोष्टींची तू यादी बनव, हरकत नाही ती यादी मोठी असुदे किंवा लहान फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर तुला विजय मिळवायचा आहे. त्याच्यावरती कसा विजय मिळवायचा याचे उत्तर फक्त आणि फक्त तुझ्या आत दडले आहे, जे तुझे तुलाच शोधायचे आहे. जेव्हा तू तुला भीती वाटत असणाऱ्या गोष्टींवर विजय मिळवशील, कदाचित तुला पडलेले प्रश्न तितके तुझ्यासाठी महत्वाचे नसतील. माझे हे दोन वाक्य तू नेहमी लक्षात ठेव मीरा. Be kind with yourself meera, i again repeating Be kind with yourself. Don't die before your death. Don't die ! 
डॉक्टर जे काही सांगत आहेत ते सगळं मीरा शांतपणे ऐकत होती. डॉक्टर निघून गेल्यावरती मिराने ती पूर्ण रात्र विचार करण्यात घालवली. तिच्या मनावर आणि विचारांवर डॉक्टरने सांगितलेल्या गोष्टींचा सकारत्मक बदल होत होता. आज रात्री तिला झोपेच्या इंजेकशन ची गरज पडली नव्हती. रात्रभर कोऱ्या भिंती मीरा एकटक पाहत असताना, तिने तिच्या मनावर भीती वाटणाऱ्या गोष्टींची यादी बनवली होती, ती तिच्या मनाशी सुंदर अस काही ठरवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिला वाटत असणाऱ्या भीती मुळे तिला ते फार अवघड जात होते. तरीही आजची रात्र तिला कधी संपून कोवळी सूर्याची किरणे पाहण्याची ती आज आतुरतेने वाट पाहत होती. 

काय ठरवले असेल मीरा ने तिच्या मनाशी ?