घाव तू देशील जितके

Sad Poem


घाव तू देशील जितके

झेलाया मी तयार आहे....

घाव तीव्र झाले की


जखमांमधून भावनांच चित्र रेखाटायला सुरुवात होते...


त्या चित्राच सौंदर्य तीव्र अशा वेदनांमधून स्पष्ट दिसू लागतं.....

त्या चित्राच्या अस्पष्ट.. अबोल... भावना तेव्हा जाणवतात...

त्या तुला जाणवतील कदाचित....

म्हणूनच..


तू जितके घाव देशील तितके मी झेलायला तयार आहे....

अगदी रूधिराच्या सरी बरसेपर्यंत....!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे