७.दुखावलेल मन

विखुरलेलि प्रेम कहानी दुखावनारि असते पण तोच आयुष्या चा शेवट नक्कीच नसतो.

हात सुटले
क्षण हरवले
नातं विखुरलं
अश्रू ओघळले
स्वप्न ओशाळली
भावना शून्य झाल्या
इतकं सगळं होऊनही
तू फक्त निशब्द राहिलास
हे का झालं कसं झालं
एकही प्रश्न मनात येऊ नये?
का तुला हे सारं हवं होतंच
म्हणून तू शांत होतास
तुला प्रयत्न करावासा वाटलं नाही
आणि आता मलाही तूझ्या माझ्या नात्यासाठी आशा कुठलीच दिसली नाही
सुटतायत हात
सुटू द्यावे म्हंटल.
निसटतायत क्षण
पण जे नव्हतेच माझे त्यांना धरून ठेवायचा आग्रह तरी का? हे मी मनाला समजावलं.
नातं जे जपत आले इथवर त्याला तडा गेली होती
पण नाजूक गोष्टी जीवापाड जपल्या तरी एक दिवस त्या तुटतात, फुटतात, विखुरतातच कि हे ही स्वतः ला समजावलं.
अश्रू च काय ते आधीही तुझ्यासाठी सहज पापणी बाहेर पडायचे  पण आता पापणीलाही कळेल कुणासाठी त्याला ढळू द्यायचं अन कुणासाठी नाही ते.
स्वप्न जी सारी रंगवली होती
पूर्ण होत आली असं वाटतानाच ती धूसर झाली आणि मग काय पाटी कोरी झाल्यागत ती मालिकाही मिटली.
मी ही डोळे मिटले.
जरा शांत झाले.
संपले होते रे
सांभाळायला जरा  वेळ मागितला मनानं मी तो दिला.
आणि ठरवलं
आयुष्याचं पुस्तकं नव्यानं लिहायचं
मागच्या गोष्टीत च बहुदा दम नसावा
आता नवी गोष्ट लिहायला घ्यायची
हरायचे नाही इतकाच निश्चय केला
आणि जगणं नव्यानं सुरु केला
माझं आयुष्य माझ्यासाठीचं.