तुटलेले तरीही सुंदर..भाग १

This is the story of Mira. Mira's life took a turn after the accident that she had never thought of. We all always have a picture in our head that our life is easy, but if that doesn't happen then we start to give up immediately. Give up is not an o

तुटलेले तरीही सुंदर ..! 
(Broken but still beautiful)???? 
(भाग १)

मीरा नुकतीच 18 वर्षांची झाली होती. पेंटिंग काढण्यात तिचा हात कोणीच पकडू शकत नव्हते, रंगांची उधळण तिने घरातल्या भिंतीवर केली होती. शिक्षणाची खरी पायरी चढण्याचे दिवस असताना सासरचा मापं ओलांडायचा आहे याचा तिच्या स्वप्नांना काही कल्पनाच नव्हती. खूप पैसा असलेलं स्थळं तिच्यासाठी आले आणि तोच तिच्या वडिलांनी तिच्या मागे हट्ट धरला की तू हे लग्न कर. आपली मुलगी मोठ्या घरात सुखाचे दिवस घालावेल असा एक बापाचा गोड गैरसमज. बेटा आम्ही गरीब तुझी कुठली हौसमौज पुरवू शकलो नाही, या दारिद्र्यातून तू तरी बाहेर पडून तुझे जीवन स्वप्नांनी रंगव असे तिला तिचे वडील समजवण्यास समर्थ ठरले. शिक्षणाचे महत्व आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे याचा अनुभव तिच्या वाटेला आलेलाच नव्हता त्यामुळे तिने ते लग्न केले. मुलगा स्वभावाला कसा आहे त्याला काय सवयी आहेत या सगळ्या गोष्टी जरा नजरेआड च ठेवल्या कारण पैसा आहे तर सगळं ठीकच असणार अशी समजूत त्यांनी काही बदलली नाही. सगळे ठीक चाले असताना लग्ना नंतर दोन महिन्यांनी समीर दारू पिऊन घरी आला. रात्रीचे 2 वाजले असतील. मीरा ला हे सगळे नवीनच, तिने समीर ला विचारले असता त्याने शब्दांची तोफ तिच्यावरती घातली. कधीच कुणाचं ऐकून न घेणारा समीर राग डोक्यात घेऊन मीरा चा हात धरून तिला कार च्या दिशेने घसपटत नेऊ लागला. दारुच्यानशेत समीर आपल्याला कुठे घेऊन चाला याची तिला काहीच कल्पना येत नव्हती. समीर नको खूप उशीर झाला आहे, आपण कुठे चाललो आहोत विचारले असता. त्याने तिला लगेचच उत्तर दिले तू या घरात राहायचे नाहीस. रात्री 2 वाजले असल्यामुळे घरातले पण गाढ झोपेत होते, समीर ने हात घट्ट पकडल्यावर तिच्या तुटलेल्या हिरव्या बांगड्यांचा आवाज फक्त तिच्याच कानात घुमत होता. ती ओरडू शकली असती पण, त्याच्या अश्या वागण्याची कल्पना त्याच्या घरच्यांना आहे की नाही, त्यांनी त्याचे असे वागणे पाहिल्यावरती त्यांना काय वाटेल या विचारात तिचे मन घुसमटत तर होते तर एकीकडे रोज प्रेमाने वागणारा समीरचे अचानक असे बाहेर पडलेले रौद्र रूप तिला पचेनासे होत होते. समीर ने तिला कार मध्ये बसवले आणि सुसाट गाडी गेट मधून काढली. एकच तो गाडीचा आवाज आणि आदळून आपटलेल गेट चा आवाज समीर च्या आईने ऐकला. समीरची आई लगेचंच बाहेर आली समीरची कार पार्किंग मध्ये नव्हती. काय घडलं असेल हे तिच्या लक्षात आलं. तिने समीरच्या वडिलांना उठवले आणि दोघेही समीरचा फोन लावून लागले. समीरच्या रागापुढे त्याच्या आईवडिलांची सुद्धा चालत नसे. या अगोदरही समीर च्या रागामुळे त्याचे दोन लग्न मोडले होते, मिराच्या वडिलांनी मोठं घर म्हणून जास्त चौकशी केली नव्हती म्हणून समीरच्या आईवडिलांनी त्याचा स्वभाव काही त्यांच्या समोर कधी मांडलाच नाही. समीर फोन उचलत नव्हता आणि मिराचा फोन या सगळ्या मध्ये घरीच राहिला होता. समीर हे काय चालले आहे, एवढा तू या अगोदर पाहिले कधीच रागावला नव्हता मला काहीच कळत नाही आहे तू काय करतो आहेस. ती त्याला प्रेमानेच विचारात होती, पण त्याचा राग त्याच्या आटोक्याच्याही बाहेर चालला होता. तिने तोंडातून शब्द काढला की, तो कार चा स्पीड वाढवत जात होता. घाबरलेली मीरा रस्त्यावरून कितीतरी मैल मागे गेलेले आजूबाजूचे झाडे पाहून आपण कुठे आलोत याचा अंदाज बांधत होती. समीर प्लीज गाडी थांबावं मला खूप भीती वाटते आहे, तिच्या भीतीने आता एकच सूर त्याच्या कानी लावला. तिच्यावर हात उचलायचा नाही अगोदरच त्याला आईवडिलांनी बजावले होते, अगोदरच्या बायको ला मारल्याची केस त्याची कोर्टात चालूच होती. पण समीरचा राग अनावर होता, त्याने हात स्टेरिंग वर आपटला आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटला. काही सेकंदातच त्याची सगळी पिलेली दारू उतरली आणि त्याच्या लक्षात आले गाडी आपल्या कंट्रोल च्या बाहेर गेली आहे. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला आणि होत्याचे नव्हते झालेच. समीर कार मधून उडी मारून थोडं अंगभर खर्चाटलेल लंगडत लंगडत पळू लागला. रक्तात विव्हाळात पडलेल्या मीरा कडे त्याने वळून सुद्धा पाहिले नाही. 

क्रमशः