ब्रेड पकोडा

Delicious, Crispy,Wakes Up The Taste Buds Try And Comment More Recipies Ahead Be Ready ???

साहित्य: ब्रेड ६ स्लाईस, बटाटा, हिरव्या मिरच्याचा ठेचा, कोथंबीर, जिरे, मोहरी ,ओवा ,बेसन ,खायचा सोडा पाव चमचा, हळद, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ 

कृती: प्रथम बटाटे उकडून घेणे. बटाटे शिजेपर्यंत बेसन भिजवून घेणे. बेसनामध्ये जिरे ,ओवा ,मीठ ,खायचा सोडा व चिमुटभर हळद घालून बेसन भिजवून घेणे. भजीच्या पिठा इतपत दाटसर ठेवणे. बटाटे थंड झाल्यानंतर स्मॅश करून घेणे. कढईत तेल करून घेणे व त्यात जिरे मोहरी मिरच्यांचा ठेचा व हळद घालून चांगले परतवून घेणे नंतर त्यात स्मॅश केलेला बटाटा घालणे व चांगले परतवून घेणे त्यात चवीनुसार मीठ घालणे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणे आता कढईत तेल तापत ठेवणे तोपर्यंत ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घेणे बटाट्याच्या भाजीचे वड्याला करतात तसे गोळे करून घेणे. ब्रेड स्लाईस थोडी पाण्यात भिजवून हलक्या हाताने दाबून पाणी काढणे  व त्यावर भाजीचा गोळा ठेवून हलक्या हाताने ब्रेडला बंद करून घेणे सर्व बाजूने व्यवस्थित कडा बंद करून घेणे व किंचित दाब देऊन गोळा तयार करणे असे तयार झालेले गोळे गरम तेलामध्ये तळणे.

छान तळून झाल्यानंतर गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करणे

तर मग नक्की करून बघा ब्रेड पकोडे