वीर पत्नी

Story Of A Brave Soldiers Wife

शांताबाईच्या घराजवळच्या मंदिरात आज भावकीतले आणि नात्यातले सर्वजण एकत्र जमले होते. शांताबाईंना गावातल्या बायका हाताने धरून हळू - हळू नदीकाठच्या मंदिराकडे नेत होत्या. गावच्या त्या नदी काठावर शहीद रामची चिता रचण्यात आली होती.

त्यांच्या मागोमाग पाच महिन्यांची गरोदर असलेली त्यांची सून- जानकी खाली मान घालून आपल्या दोन मावस  बहिणींच्या आधाराने चालत होती.

विठ्ठलाच्या मंदिराची एक एक पायरी चढताना जानकीला चांगलीच धाप लागत होती. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचल्यावर जानकीच्या डोळ्यासमोर भूतकाळातला तो प्रसंग पुन्हा एकदा उभा राहिला. ज्यावेळी ती आणि तिचा पति राम लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते.

राम-जानकीच्या दूरच्या आत्याचा मुलगा. लहानपणापासून राम आणि जानकी एकत्रच खेळले होते, एकत्रच मोठे झाले होते. शांता आत्याचा नवरा पोलीस खात्यात होता. परंतु नक्षली लोकांसोबत झालेल्या चकमकीत मरण पावला होता. त्यावेळी राम केवळ दोन-अडीच वर्षाचाच होता. शांत आत्यालाही जवळचं असं कोणीच नव्हतं, म्हणूनच ती जानकीच्या वडिलांकडे आश्रयाला आली होती.


शांता -"बापू माझा नवरा नक्षल्यांशी लढताना शहीद झाला. मला आता तुमच्याशिवाय कुणाचाही आधार नाही."

बापू -"शांता हे तुझं हक्काचं घर समजून इथेच राहा. नाहीतर मी तुला दुसरे घर बांधून देतो. मी तुझा भाऊ अजुन जिवंत आहे. कधीही अडल्या-नडल्याला मला बोलव मी तुझ्या मदतीसाठी सदैव तयार आहे."



शांत आत्याचा नवरा कर्तव्यावर असताना नक्षलीनकडून मारला गेला असल्याने, त्याचे पेन्शन आणि थोडी जमीन सरकारकडून उदरनिर्वाह करिता आत्याला मिळाली होती.

जानकीच्या वडिलांनी म्हणजेच सखाराम बापूंनी शांता आत्याला त्यांच्याच गावात एक घर बांधून दिलं होतं. अर्थात पैसा शांता आत्याचा असला तरी बाकी इतर सगळी मदत, घर बांधण्याच्या कामाची देखरेख आणि पैशाचा हिशेब सखाराम बापू अगदी चोख ठेवत. उलट कधीकधी तर काही सामान कमी पडलं तर स्वतःच्या पैशाने ते शांता आणि रामसाठी खर्च करत.

रामलाही जानकी अगदी बालपणापासून आवडे. लहानपणी भातुकलीच्या खेळात किंवा बाहूला -बाहूली च्या लग्नात रामला जानकीच आपली बायको म्हणून हवी असे. दुसऱ्या कोणाची जानतीला तो बायको होऊच देत नसे. आणि जानकी मुद्दाम दुसऱ्या एखाद्या मित्राची बायको झालीच तर, राम त्या मित्राला चांगला चॉप देत असे.

बालपण संपून राम जानकी आता मोठे झाले होते. शिक्षण पूर्ण करून रामला आर्मीत नोकरी मिळाली होती. त्याचे बालपणापासूनच स्वप्नही तेच होतं. स्वतःच आर्मीच प्रशिक्षण पूर्ण करून राम घरी परतल्यावर, त्यांने शांत आत्याला सखाराम बापूकडे जानकीचा हात मागण्यासाठी पाठवलं. सखाराम बापूंच्याही मनात तेच होतं. त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला.

दोन्ही घरी लग्नाची लगबग सुरू झाली. घरात पाहुणे जमू लागले. थट्टा, मस्करी, गप्पा आणि लटके रुसवे, फुगवे याला जानकीच्या घरी नुसते उधाण आले होते दोन्ही घरी कामाची, खरेदीची, याद्यांची, कार्यक्रमांची नुसती धामधूम आणि गडबड होती.

मैत्रिणींच्या गराड्यात मेहंदी, दागिने, साड्या, मेकअप या साऱ्या गप्पांमध्ये तिला रामची सोबत हवी होती आणि प्रत्येक खरेदीच्या वेळी राम तिच्या सोबत होता.

राम आणि जानकीच लग्न ठरल्यावर जानकीला तर रामशी विवाह म्हणजे एक गोड स्वप्न पूर्ण झाल्याची अनुभूतीच वाटत होती. तिच्या मनात रामच्या अनेक भावमुद्रा उमटत होत्या. बालपणीचा त्याचा राग, त्याच त्रास देणे, तिच्या वेण्या ओढणं, तिची बाहुली लपवणं, तिच्या मागून येऊन अलगद तीचे डोळे झापणं, तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलीला अगदी खेळण्यातही तो बायको म्हणून घेत नसे आणि जानकीला कोणाची बायको होऊ देत नसे.

©® राखी भावसार भांडेकर.
 

🎭 Series Post

View all