A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afed4f77b42a532dbf8559db64fdc2452269aae6f3a): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Bracelet
Oct 31, 2020
प्रेम

ब्रेसलेट (Bracelet)

Read Later
ब्रेसलेट (Bracelet)

अवि आणि मिनू एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. अगदी जेमतेम २ महिन्यांची ओळख त्यांची. ते झालं असं की, पहिले एक वर्ष अवि पूण्याच्या ब्रांचमध्ये होता. पण त्याची बदली २ महिन्यांपूर्वीच मुंबई ब्रांचला झाली. त्याच्यात मिनू त्याच्यापेक्षा सीनियर पोस्टवर असल्यामुळे तो ह्या ऑफिसमध्ये आल्यापासून मिनूच्याचं अवतीभोवती असायचा. कारण त्याने केलेलं कोणतेही काम पहिले मिनू अप्रूव करायची आणि मग ते फायनल व्हायचे.

मिनू दिसायला जेमतेम!! पण स्वभावाने खूप चांगली आणि मनमिळावू असल्यामुळे ती जरी सीनियर असली तरी ती अविला कामाच्या बाबतीत खूप सांभाळून घेत असे. अवि मुळातच हुशार असल्यामुळे तो पटापट त्याचे काम उरकत असे आणि त्यामुळे सर्व कामे वेळेवर होत असतं. अवि आल्यापासून मिनूचा कामाचा भार बराच हलका झाला होता.

पहिले अवीच्या जागी सीमा होती. पण ती लग्न होऊन मुंबई बाहेर शिफ्ट झाली आणि तिने ही नोकरी कायमची सोडून दिली. मग काय सगळे काम एकट्या मिनूवर येऊन पडले. त्यामुळे तिला घरी जायला रोजचं उशीर व्हायला लागला. मग एक दिवशी कंटाळून तिने कुलकर्णी सरांकडे तक्रार केली व तिच्यासोबत काम करायला कोणालातरी अपॉईंट करावे अशी त्यांना विनंती केली आणि मग ह्या ऑफिसमध्ये अविची एंट्री झाली.

तसं बघायला गेलं तर अवघ्या २ महिन्यात अवि स्टार एम्प्लॉयी झाला होता ऑफिसचा. कुलकर्णी सर पण अविच्या कामाच्या पद्धतीवर भरपूर खुश होते. अवि सुट्टीच्या दिवशी पुणे-मुंबई अपडाऊन करत असे. बाकीच्या दिवशी तो कंपनीने दिलेल्या कॉटर्स मध्ये राहत असे आणि दोन्ही वेळेला ऑफिस कॅंटीनमध्ये जेवत असे.

ह्या दोन महिन्यामध्ये अवि आणि मिनूमध्ये खूप चांगली गट्टी जमली होती. इतकी की बऱ्याचवेळा अवि मिनूच्या घरी जेवायला ही जात असे. मिनूच्या घरातले अविला घरचा एक सदस्य मानत असतं.

हळूहळू अविला मिनू आवडायला लागली होती. तो सुट्टीत घरी गेल्यावर त्याच्या आई-बाबांकडे फक्त मिनूचा विषय बोलत असे. पण अजूनतरी ह्या सगळ्यापासून मिनू अनभिज्ञ होती.

अवि आणि मिनूची परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करणे हाच त्यांच्या जगण्याचा उद्देश होता.

अविला हातात ब्रेसलेट घालायची फार हौस होती. तो मिनूला सांगत असे. “सोन्याचे भाव जरा उतरु देत मग बघ कसं छान सोन्याचे ब्रेसलेट करेन मी स्वत:ला.” आणि मग तो शांत होत असे. कारण त्याला ही हे माहीत होते की, घरच्या जवाबदारीमुळे इतक्यात तरी त्याला ते करणे शक्य नव्हते. मग मिनू पण त्याचा मूड ठीक करण्यासाठी उगाचच एखादा जोक सांगून त्याला हसवत असे.

मिनूला ही अवि आवडायला लागला होता. पण तरीही अजून फक्त त्यांची चांगली मैत्रीच होती. असेच जवळजवळ अजून ६ महीने निघून गेले. अविला कुलकर्णी सरांनी दुसऱ्या एका डिपार्टमेंटचा हेड बनविण्याचे ठरविले. पण जोपर्यंत मिनूला असिस्टंट मिळत नाही तोपर्यंत तरी अवि मिनू बरोबरच काम करणार होता. पण त्या आधी त्याला मिनूला लग्नासाठी मागणी घालायची होती. मग तिचे उत्तर काहीही असो. त्याला ते मान्य होते. तसं ही तो काहीच दिवसचं तिच्याबरोबर काम करणार होता.

आज अविचा वाढदिवस होता. ऑफिसच्या कामामुळे अविला सुट्टी घेणे शक्य नव्हते आणि त्याचा हा पहिला असा वाढदिवस होता ज्यावेळी त्याचे आई-बाबा त्याच्या जवळ नव्हते. त्यामुळे सकाळपासून अवि थोडा उदास होता.

पण जेव्हा अवि ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा तो चकितच झाला!! त्याचे डेस्क खूप छान सजविले होते आणि त्याच्या डेस्कवर एक फुलांचा गुच्छ ठेवला होता. तो आल्यावर ऑफिसमधले सर्वजण त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या डेस्कजवळ आले. मग मिनूने केक आणला आणि ऑफिसमध्ये खूप मस्त अविचा वाढदिवस साजरा झाला. अविने सगळ्यांना स्नॅक्स पार्टी ही दिली.

मिनूने अविला आधीच सांगून ठेवले होते की, संध्याकाळी त्याला तिच्या घरी जेवायला बोलविले आहे. त्यामुळे दोघेही ऑफिस सुटल्यावर एकत्र मिनूच्या घरी गेले. मिनूच्या घरी पोहोचल्यावर मिनूच्या आई-बाबांनी अवीचे स्वागत केले. मिनूच्या आईने अवीचे औक्षण केले आणि त्यांनंतर अवीच्या आईने!!

हो. सकाळीच अवीचे आई-बाबा पुण्याहून मिनूच्या घरी अविला सरप्राइज द्यायला आले होते. हा सगळा मिनूचा प्लान होता. आई-बाबांना बघितल्यावर अवीच्या आनंदाला पारावार नव्हता. मग मिनूने केक आणला. तो कापून झाल्यावर जेवणे आटोपली आणि मग सगळे गप्पा मारायला बसले. तेव्हा अवीच्या आईने मिनूने ठरवलेल्या सरप्राइजबद्दल अविला सांगितले. अविने मिनूकडे पाहिले, तेव्हा ती मंद हसली.

मग अवि आणि मिनू दोघेही घराजवळ असणाऱ्या दुकानातून सगळ्यांसाठी आइसक्रीम आणायला गेले. अविला मिनूचे काय आणि कसे आभार मानायचे हेच कळतं नव्हते. त्याच क्षणी त्याच्या मनात आले, “हो हीच ती वेळ आहे.”

मग काय!! तो मध्येच थांबला आणि गुडघ्यावर बसून अगदी फिल्मी स्टाइल मध्ये त्याने चक्क मिनूला प्रपोज केले. मिनूला विश्वासच बसत नव्हता. तिला तर हे सर्व स्वप्नचं वाटतं होते. तिने वेळ न गमवता त्याला लागलीच होकार दिला.

तेव्हा कुठेतरी मंद आवाजात गाणे सुरू होते..

♫♪गुमसूम सावली… अलगद धावली
हिरवळली पुन्हा….मखमल प्रेमाची
रिमझिम भासले… रुणझुण वाजले
नकळत झेडीली… सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफिला
हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिरसे गुल खिला… तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला… तू मिला
♫♪ मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे♫♪
प्रेमाचे… प्रेमाचे…♫♪

मग दोघेही हातात हात घालून घरी परतले. लवकरच घरी सांगूयात असेही त्या दोघांनी ठरविले.

त्यानंतर घरी सगळ्यांनी मिळून आइसक्रीमचा आस्वाद घेतला. दोघांचीही नजर एकमेकांपासून हटत नव्हती. हे दोघांच्या आई-बाबांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. अविच्या आई-बाबांच्या परत जाण्याची तयारी मिनूने आधीच करून ठेवली होती. त्याप्रमाणे ते दोघे सकाळीच परतीच्या प्रवासाला निघणार होते. त्यामुळे अवि सगळ्यांचा निरोप घेऊन त्याच्या घरी म्हणजेच ऑफिस कॉटर्सवर जायला निघाला. मिनू त्याला बाहेरपर्यंत सोडायला गेली.

निघता निघता मिनूने अविसाठी घेतलेले गिफ्ट अविला दिले आणि घरी जाऊन उघड असे देखील सांगितले. अविने घरी गेल्या-गेल्या ते गिफ्ट उघडले आणि माहीत आहे त्यामध्ये काय होते??

“२४ कॅरेट सोन्याचे ब्रेसलेट”

त्याच्या डोळ्यात अक्षरक्ष: पानी तरळले. आज खऱ्या अर्थाने अविचा बर्थडे खूपच स्पेशल आणि मेमोरेबल झाला होता.

(हा ब्लॉग कसं वाटला हे नक्की कळवा व आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद)

@preetisawantdalvi

Circle Image

Preeti Dalvi

Writer, Author, Blogger

मला वाचनाची खूप आवड आहे। वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही। मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत। त्या कथांमध्ये "गुंतता हृदय हे। " ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले। ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद। ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले। खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम।।