द बॉस - The Boss (पर्व 2- भाग 19)

...And The Award Goes To...!!!


आर्या नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये काम करत होती. आज तशी गर्दी कमीच होती. कार्ल त्याच्या टेबलवर कॉफी पीत काम करत होता. मालकाने आज काही माणसांना बोलावलं होतं. हॉटेलचं एक नवीन बॅनर बनवायचं होतं. त्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मालक आणि ती माणसं टेबलवर बसली.मालकाने आर्याला त्यांच्या टेबलवर कॉफी आणण्यास सांगितली.

"हॉटेलचं नाव मोठ्या अक्षरात हवं, खाली आपली टॅगलाईन हवी"

"अच्छा, आणि रंग कुठला हवाय?"

"पिवळा रंग छान दिसेल"

त्यांचं बोलणं सुरू असतानाच आर्या तिथे कॉफी घेऊन येते. त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडतं आणि ती तिथेच थांबते. मालक विचारतो,

"का थांबली आहेस?"

"सर सॉरी पण मी एक बोलू?"

"हो बोल"

"सर रात्री रस्त्यावर पिवळ्या रंगाचे स्ट्रीट लाईट सुरू असतात, त्यात आपलंही नाव पिवळ्या अक्षरात लिहिलं तर ते ब्लर दिसेल

मालक म्हणतो, "अरेच्या, हे तर लक्षातच आलं नाही माझ्या"

"आणि आपल्या हॉटेलची थीम डार्क ग्रीन आहे, म्हणजे इथलं इंटेरिअर ग्रीन, टेबल ग्रीन, मेनू कार्ड ग्रीन, आपला लोगो सुद्धा ग्रीन..तेव्हा या हॉटेलची ओळख लोकांच्या मनात रंगाच्या रूपाने बसलीये. तेव्हा नावही ग्रीन कलर मध्ये हवं. आणि आपला लोगो राहिलाय यात, केवळ टॅगलाईन असून उपयोग नाही"

मालक तिचं हे निरीक्षण बघून खुश झाला. तिच्या सांगण्याप्रमाणे डिझाइनरला मालकाने बॅनर बनवण्यास सांगितलं. डिझाइनर निघून गेल्यानंतर मालक तिला म्हणतो,

"दिसते तेवढी ढ नाहीयेस तू"

आर्या हसायला लागते.कार्ल शेजारच्या टेबलवरून हे सगळं बघत असतो. तिला तो जवळ बोलावतो,

"आर्या, हे सगळं ज्ञान कसं गं तुला?"

"विशेष काही नाही त्यात..हे अगदी बेसिक आहे"

"नाही, पण असं वाटतं की या क्षेत्रात तुझा चांगला अनुभव आहे"

आर्या दीर्घ श्वास घेते आणि सांगते,

"एकेकाळी मी एका मोठ्या पब्लिशिंग इंडस्ट्रीची मालकीण होते"

आर्या एवढं सांगून निघून जाते, पण कार्लला धक्काच बसतो. आर्या साधीसुधी मुलगी नाही, मोठ्या क्षेत्रातील दांडगा अनुभव घेऊन आलेली दिसतेय. त्याच्या मनात काही विचार घोळू लागतात. तो तिला पुन्हा एकदा बोलावतो,

"आर्या...मी एक आर्टिकल लिहिलं आहे. मनाच्या अवस्था म्हणून. एकदा बघून सांगशील का कसं झालंय ते?"

आर्या ते वाचते. वाचून झाल्यानंतर ती हसायला लागते.

"काय झालं?"

"काही नाही.."

"अगं सांग ना"

"आर्टिकल छान आहे पण बऱ्याच गोष्टी मिसिंग आहेत"

"उदाहरणार्थ?"

"मनाच्या अवस्था.. याबद्दल तू वास्तववादी गोष्टी मांडल्या आहेत.पण याला थोडी शास्त्रशुद्ध गोष्टींची जोड द्यायला हवी. जसं ओरिस्टोटलची मानसशास्त्र आधारित प्रमेय, मानसशास्त्र निगडित आधुनिक विचार लिहिणारे विलहेम वूंड..याचा आधार घेऊन लेख लिही. मानसशास्त्राचे बरेच प्रयोग होतात, माणसांच्या वागण्याचा आणि मासिकतेचा अभ्यास केला जातो..त्यातील काही केस स्टडीज मिळवण्याचा प्रयत्न कर..तरच हे आर्टिकल जरा वजनदार वाटेल"

कार्ल हे ऐकून गपगार होतो. त्याला काहीच सुचत नाही. काजवा समजावे अन त्याने सुर्यासारखे चमकून उठावे अशीच काहीशी गट कार्लची झालेली.

"आर्या माझ्याकडे एक ऑफर आहे.."

"कसली?"

"मी एका टीमसोबत काम करतोय..तिथे तुझ्यासारख्या हुशार व्यक्तींची गरज आहे..येशील?"

"कसलं काम आहे?"

"आम्ही मासिक तयार करतो..नुकतंच एक मासिक प्रकाशित केलं आहे..सुरवातच आहे.."

आर्याची कळी खुलते. तिचा ज्यात अनुभव होता तेच काम तिला मिळणार होतं. तिने तात्काळ होकार दिला.

"चालेल की, कधी येऊ तुझ्या ऑफिसमध्ये?"

"सांगतो मी, उद्या आम्ही एका इव्हेंटला जातोय..पब्लिशिंग इंडस्ट्री मध्ये नवोदित मासिकांचा पुरस्कार सोहळा आहे..आमच्याही मासिकाला नामांकन मिळालं आहे..तुही चल सोबत"

आर्या होकार देते.

***

आर्याला आनंद होतो, आज रूम वर गेल्यानंतर तिला शांत झोप लागते. कष्टाची, समाधानाची झोप. एखाद्या एम्प्लॉयीला ऑफर लेटर दिल्यावर तो इतका का खुश होतो हा प्रश्न तिला नेहमी पडायचा. पण आज तो आनंद तिला स्वतःला जाणवत होता. तिला तिच्या लायक काहीतरी काम करायला मिळणार होतं. वेट्रेसच्या कामानेही तिला बरंच काही शिकवलं होतं. पण आता ती जाणार होती कार्ल सोबत.. त्याच्या त्या प्रायव्हेट प्रोजेक्ट मध्ये !

दुसऱ्या दिवशी आर्याने हॉटेलमालकाची परवानगी घेऊन सुट्टी घेतली. कार्ल सोबत तीही निघाली. एका भल्यामोठ्या हॉल मध्ये पुरस्कार सोहळा होता. सर्वत्र सुटाबुटात असलेली माणसं आली होती. अमेरिकेत हा सोहळा म्हणजे एक प्रतिष्ठित सोहळा मानला जात असे. प्रकाशन क्षेत्रातील अनेक दिग्गज तिथे येतात. नवोदित मासिकांना प्रोत्साहन देतात, पण त्याला एक दुसरी बाजूही होती. प्रकाशन क्षेत्रातील दिग्गज तिथे या भीतीने येत की उद्या या मासिकांनी आपल्याला मागे टाकू नये, मग या प्रकाशन कंपन्यांना टेकओव्हर करण्यासाठी, त्यांना आमिष दाखवून आपल्याच प्रकाशन कंपनीत सामील करून घेण्यासाठी. नवोदित मासिकं पैशाच्या शोधात असतात, त्यांना जाहिराती मिळालेल्या नसतात, प्रिंटिंगमध्ये जास्तीत जास्त खर्च व्हायचा, आणि त्याच्या वाटपाचा खर्च वेगळा.नावाजलेल्या मासिकांचा सर्व खर्च जाहिरातींमधूनच निघत होता, त्यामुळे मासिकाची किंमत ते अगदी दुय्यम ठेवत. परिणामी वाचक स्वस्तातले मासिक उचलत. याच परिस्थितीचा फायदा घेऊन तिथे मोठे लोक येऊन या नव्या दमाच्या मासिकांना गिळंकृत करतात.

पुरस्कार सोहळा सुरू झाला. प्रस्तावना झाली. आर्या आणि कार्ल दुसऱ्या रांगेत बसले होते. कार्ल आर्याला म्हणाला,

"तू इथेच बस, मला माझ्या टीम सोबत बसावं लागेल, चालेल ना?"

"हरकत नाही, कार्यक्रम झाला की मला भेटव तुझ्या टीमला"

"नक्की"

कार्ल मागे जाऊन त्याच्या टीम सोबत बसतो. आता मान्यवरांचे भाषण सुरू झाले. एकेकजण पुढे येऊन नवनवीन गोष्टी सांगत होता. मग आले...मिस्टर रॉन ! आपल्या बढाया मारत आणि स्वतःची प्रशंसा करण्यातच पंधरा मिनिटं घालवले.

"तुम्ही बघालच, Face of America ला यावेळी पुन्हा पुरस्कार मिळेल, अल्पावधीतच हे मासिक लोकप्रियता मिळवेल.."

समोर काही पत्रकारही होते. एकाने मध्येच म्हटले,

"पण तुमच्या मासिकाचा सेल कमी होत चाललाय असं समजलं"

"अफवा आहेत या..Face of America ला बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे, आता पुरस्कार जाहीर होतील तेव्हा समजेलच"

मिस्टर रॉन कडे खुप पॉवर असते. ज्युरीला सुद्धा त्यांनी खिशात टाकलं होतं. पुरस्कार आपल्यालाच मिळणार याची सोय करून ठेवली होती त्यामुळेच ते इतक्या आत्मविश्वासाने बोलत होते.
बोलून झाल्यावर ते ज्यूरीशेजारी बसले. हळूच त्यांना म्हणाले,

"कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला डॉलर्स पाठवतो"

आता पुरस्कारांची घोषणा सुरू झाली. Best Cover award, best content award, best editing award, best presentation award असे पुरस्कार दिले गेले. आता वेळ होती मुख्य पुरस्काराची..

"Rising star Magazine of the year"

हा पुरस्कार खूप मानाचा पुरस्कार होता. New York times, feminist यासारखे नावाजलेले मासिकं हाच पुरस्कार घेऊन पुढे गेले होते. त्यामुळे आता ज्याला पुरस्कार मिळेल त्याचं भविष्य उज्ज्वल होणार होतं यात शंकाच नव्हती.

उत्कंठा वाढत चालली होती..सूत्रसंचालक नेहमीप्रमाणे सर्वांच्या हृदयाची धडधड वाढवत होता. उत्सुकता ताणून धरत होता. मागे मुद्दाम हार्टबिट्स चे music लावले गेले. हॉल मध्ये भयाण शांतता पसरली. कार्ल आणि हेझलच्या चेहऱ्यावर सुद्धा उत्सुकता झळकत होती. आणि मग...एक नाव पुकारलं गेलं, गोऱ्यागोमट्या लोकांमधून एक भारतीय नाव...पुरुषांमधून एक स्त्री उठली..

तोच swag.. तीच चाल...तोच आत्मविश्वास..

तिथे बॅकग्राऊंड music सुरू नव्हतं पण भारतीय मनातून एक music वाजत होतं आणि त्या music ला अगदी शोभेल अश्याच तऱ्हेने एका झाशीच्या राणीला सर्वजण वाट करून देत होते.. ते गाणं होतं..

भवानी के वीरों उठा लो भुजा को
सत्यागिनी को मस्तक सज़ा लो
स्वाहा हो शत्रु, प्रचंड मचा दो
शत्रु के लहू से धरती का शृंगार कर
देश पर प्रहार है प्रहार कर, प्रहार कर घमंड कर,

प्रचंड कर तांडव सा युद्ध कर युद्ध कर भयंकर

रा रा रा रा रा रा रा..

घमंड से चलो ना डरो, ना गिरो
काट सबको दिल से जीत की ओर चलो
घमंड की पुकार है ना डरो, ना डरो
दलदल में दम के बढ़ चलो, बढ़ चलो

घमंड ही तेरे शीश का श्रींगार है
चीर शीश सबके बढ़ चलो, बढ़ चलो
घमंड से चलो ना डरो, ना गिरो
काट सबको दिल से जीत की ओर चलो

रक्त गिरेगा माटी तरेगी प्यास बुझेगी हो
दुश्मन कटेगा, धरती सजेगी देश सजेगा हो ??????

रा रा रा रा रा रा रा..


🎭 Series Post

View all